-
मेंढरे आणि शेरडे यांच्यासाठी कोणते भवितव्य आहे?टेहळणी बुरूज—१९९५ | ऑक्टोबर १५
-
-
प्रत्येक गटासाठी काय भवितव्य?
१६, १७. मेंढरांकरता कोणते भवितव्य असेल?
१६ येशूने मेंढरांबद्दल आपला न्यायदंड सुनावला: “अहो माझ्या पित्याचे आशीर्वादितहो या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.” “या,” हे केवढे हार्दिक आमंत्रण! पण कशाचे? सार्वकालिक जीवनाचे, जसे की त्याने सारांशात सांगितले: “नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील.”—मत्तय २५:३४, ४६.
१७ येशूसोबत स्वर्गात राज्य करतील अशांकडून कशाची मागणी केली जाते याबद्दल त्याने रुपयाच्या दाखल्यात दाखवले, पण या दाखल्यात तो राज्याच्या प्रजेकडून कशाची अपेक्षा केली जाते हे दाखवतो. (मत्तय २५:१४-२३) येशूच्या बांधवांनी संपूर्ण अंतःकरणाने दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याच्या राज्याच्या पार्थिव भागात मेंढरे पृथ्वीचे वतन पावतात, हे योग्य आहे. देवाने मुक्त केलेल्या मानवांसाठी “जगाच्या स्थापनेपासून” तयार केलेले भवितव्य—परादीस पृथ्वीवर जीवनाचा आनंद ते घेतील.—लूक ११:५०, ५१.
-
-
मेंढरे आणि शेरडे यांच्यासाठी कोणते भवितव्य आहे?टेहळणी बुरूज—१९९५ | ऑक्टोबर १५
-
-
१९ याचा अर्थ, शेरडासमान लोकांचा अमर जीव अनंतकाळच्या अग्नीत दुःख भोगणार असा होत नाही, हे बायबल विद्यार्थ्यांना माहीत आहे. कारण मानव स्वतः जीव आहेत; त्यांच्याठायी अमर जीव नाही. (उत्पत्ति २:७; उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४) न्यायाधीशाने शेरडांना ‘सार्वकालिक अग्नीची’ शिक्षा देण्याचा अर्थ, भविष्यातील आशेचा समावेश नसलेला नाश तसेच तो दियाबल आणि त्याच्या दुरात्म्यांचा कायमचा शेवट देखील असेल. (प्रकटीकरण २०:१०, १४) या कारणास्तव, यहोवाचा न्यायाधीश विरुद्ध न्यायदंडाची सुरवात करतो. तो मेंढरांना “या;” तर शेरडांना “माझ्यापुढून निघा” असे म्हणतो. मेंढरांना “सार्वकालिक जीवन” मिळेल. शेरडांचा ‘सार्वकालिक नाश’ केला जाईल.—मत्तय २५:४६.b
-
-
मेंढरे आणि शेरडे यांच्यासाठी कोणते भवितव्य आहे?टेहळणी बुरूज—१९९५ | ऑक्टोबर १५
-
-
२१ तथापि, आपल्यासाठी मेंढरे आणि शेरडे या दाखल्याच्या नव्या समजूतीचा अर्थ काय होतो? लोक आधीच कोणती एक बाजू घेत आहेत. काही लोक ‘नाशाकडे जाणाऱ्या पसरट मार्गावर’ आहेत, तर काही ‘जीवनाकडे जाणाऱ्या अरुंद मार्गावर’ राहण्याचा प्रयत्न करत आहेत. (मत्तय ७:१३, १४) परंतु, दाखल्यात वर्णन केल्याप्रमाणे, मेंढरे आणि शेरडे याविषयी येशू अंतीम न्यायदंडाची घोषणा करील, हे अजून भवितव्यात आहे. मनुष्याचा पुत्र न्यायाधीशाच्या भूमिकेत येतो तेव्हा तो अनेक खऱ्या ख्रिश्चनांना—समर्पित लोकांचा वास्तविक ‘मोठा लोकसमुदाय’—‘मोठ्या संकटाच्या’ शेवटल्या भागातून नवीन जगात जाण्याच्या पात्र असल्याचे ठरवील. ते भवितव्य आज आनंदाचा उगम असले पाहिजे. (प्रकटीकरण ७:९, १४) दुसऱ्या बाजूला पाहता, ‘सर्व राष्ट्रातील’ बहुसंख्यांक लोकांनी स्वतःला शेरडासमान हट्टी असल्याचे शाबीत केलेले असेल. त्यांचा ‘सार्वकालिक नाश’ केला जाईल. हा पृथ्वीकरता केवढा दिलासा असेल!
-
-
मेंढरे आणि शेरडे यांच्यासाठी कोणते भवितव्य आहे?टेहळणी बुरूज—१९९५ | ऑक्टोबर १५
-
-
b एल एव्हॉनहेलीयो डी मॉटिओ सांगते: “सार्वकालिक जीवन हे निश्चित जीवन आहे; त्याच्या विपरीत निश्चित शिक्षा आहे. एऑनिअस हे ग्रीक विशेषण प्रामुख्याने अवधी नव्हे तर दर्जा सूचित करते. निश्चित शिक्षा, सार्वकालिक मृत्यू होय.”—सेवानिवृत्त प्राध्यापक युवन मॉटेऑस (पॉन्टिफिकल बिब्लिकल इन्स्टिट्युट, रोम) आणि प्राध्यापक फरनॅन्डो कॉमॉचो मॅड्रीड (थियोलॉजिकल सेंटर, सवील), स्पेन, १९८१.
-