-
देवाच्या नजरेत आपण शुद्ध कसं राहू शकतो?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
४. व्यसनांवर विजय मिळवा
यहोवाच्या मदतीने आपण कोणत्याही वाईट सवयीवर विजय मिळवू शकतो
जर तुम्ही सिगरेट ओढत असाल किंवा दुसरी एखादी नशा करत असाल, तर हे व्यसन सोडणं किती कठीण आहे हे तुम्हाला माहीत असेल. पण ही व्यसनं सोडायला तुम्हाला कशामुळे मदत मिळू शकते? व्यसनाचा तुमच्यावर काय परिणाम होतो यावर विचार करा. मत्तय २२:३७-३९ वाचा, आणि खाली दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग करून, तंबाखू किंवा इतर व्यसनांमुळे काय होऊ शकतं याबद्दल चर्चा करा:
यहोवासोबतच्या मैत्रीवर होणारा परिणाम.
कुटुंबावर आणि इतरांवर होणारा परिणाम.
तुमच्या व्यसनावर विजय मिळवण्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलाल हे ठरवा.b व्हिडिओ पाहा.
फिलिप्पैकर ४:१३ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
नियमितपणे प्रार्थना आणि बायबल अभ्यास केल्यामुळे तसंच, सभांना हजर राहिल्यामुळे एका व्यक्तीला व्यसन सोडायला मदत कशी मिळू शकते?
५. अशुद्ध विचार आणि सवयींविरुद्ध लढा
कलस्सैकर ३:५ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
पोर्नोग्राफी, अश्लील मेसेज आणि हस्तमैथुन या गोष्टी यहोवाच्या नजरेत अशुद्ध आहेत हे आपल्याला कसं कळतं?
यहोवाच्या अपेक्षेप्रमाणे आपल्या विचारांत आणि वागण्या-बोलण्यात शुद्ध राहणं शक्य आहे का? तुम्हाला असं का वाटतं?
अशुद्ध विचारांविरुद्ध आपण कसं लढू शकतो हे जाणून घ्या. व्हिडिओ पाहा.
येशूने एक उदाहरण देऊन सांगितलं की मनाने शुद्ध राहण्यासाठी आपण आवश्यक पावलं उचलायला मागेपुढे नाही पाहिलं पाहिजे. मत्तय ५:२९, ३० वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
आपण स्वतःच्या शरीराला इजा करावी असं येशू इथे सांगत नव्हता. तर पावलं उचलणं किती महत्त्वाचं आहे यावर तो भर देत होता. अशुद्ध विचार टाळण्यासाठी एक व्यक्ती कोणती पावलं उचलू शकते?c
जर तुम्ही अशुद्ध विचारांपासून दूर राहण्याचा मनापासून प्रयत्न करत असाल, तर यहोवा याची कदर करतो. स्तोत्र १०३:१३, १४ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
हे वचन अशुद्ध सवयीविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तीला हार न मानण्याचं प्रोत्साहन कसं देतं?
पुन्हा चुकलात, तरी हार मानू नका!
आपल्या मनात असा विचार येऊ शकतो, की ‘इतके प्रयत्न करूनही ही सवय सुटत नाही. मग प्रयत्न करून काय उपयोग?’ पण जरा विचार करा. शर्यतीत भाग घेणारा धावक फक्त अडखळून खाली पडला म्हणून तो शर्यत हरतो का? किंवा मग त्याला शर्यत पुन्हा सुरू करावी लागते का? नाही. तसंच, एखाद्या वाईट सवयीविरुद्ध लढताना तुमच्या हातून पुन्हा तीच चूक झाली, तर तुम्ही या लढाईत हरलात असा याचा अर्थ होत नाही. तसंच, तुमचे आजपर्यंतचे सगळे प्रयत्न वाया गेले असाही याचा अर्थ होत नाही. एखाद्या वाईट सवयीविरुद्ध लढताना चुका होणं साहजिक आहे. स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी सहसा वेळ लागू शकतो. म्हणून हार मानू नका! यहोवाच्या मदतीने तुम्ही तुमच्या वाईट सवयीवर नक्कीच मात करू शकता!
-
-
मद्यपानाबद्दल बायबलमध्ये काय म्हटलंय?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
६. दारूच्या व्यसनावर मात कशी करता येईल?
दारूच्या आहारी गेलेल्या एका माणसाला ही सवय सोडायला कशामुळे मदत झाली ते पाहा. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा.
प्यायच्या सवयीमुळे दिमित्रीच्या वागण्या-बोलण्यावर काय परिणाम झाला?
त्याला लगेच दारू सोडता आली का?
त्याने हे व्यसन पूर्णपणे कसं सोडलं?
१ करिंथकर ६:१०, ११ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
दारूच्या व्यसनामुळे काय नुकसान होऊ शकतं?
जास्त पिण्याची सवय असलेली व्यक्तीसुद्धा बदलू शकते, हे कशावरून दिसून येतं?
मत्तय ५:३० वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
हात कापून टाकण्याच्या उदाहरणावरून हे दिसून येतं, की यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी आपल्याला आवडणाऱ्या काही गोष्टी पूर्णपणे सोडाव्या लागू शकतात. जास्त पिण्याच्या सवयीवर मात करायचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्ही काय करू शकता?a
१ करिंथकर १५:३३ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
ज्यांचं पिण्यावर नियंत्रण नाही अशांसोबत जर तुम्ही मैत्री केली तर काय होऊ शकतं?
-