वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • धार्मिकता तोंडी संप्रदायाने नव्हे
    टेहळणी बुरूज—१९९१ | नोव्हेंबर १
    • १२. (अ) इब्री शास्त्रवचनांचा संदर्भ दर्शवताना येशूने नेहमीच्या पद्धतीपेक्षा कोणत्या वेगळ्या पद्धतीचा अवलंब डोंगरावरील प्रवचनाच्या बाबतीत केला, व का? (ब) “सांगितले होते,” या शब्दप्रयोगाच्या सहाव्या वापराकडून आम्ही काय शिकू शकतो?

      १२ आधी येशूने इब्री शास्त्रवचनांचा संदर्भ घेतला होता तेव्हा तो “असे लिहिले आहे,” असे म्हणाला. (मत्तय ४:४, ७, १०) पण, डोंगरावरील प्रवचनात त्याने इब्री शास्त्रवचनातील अवतरणे सांगताना सहा वेळा “सांगितले होते,” असे म्हटले. (मत्तय ५:२१, २७, ३१, ३३, ३८, ४३) असे का? कारण यावेळी तो, देवाच्या नियमांचे उल्लंघन करणारे परुशी, संप्रदायांच्या प्रकाशात शास्त्रवचनांचा जसा अर्थ करीत असत त्याचा उल्लेख करीत होता. (अनुवाद ४:२; मत्तय १५:३) हे, येशूने शेवटल्या सहाव्या संदर्भात जे म्हटले त्यावरुन दिसून येते. तो म्हणालाः “‘आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्‍याचा द्वेष कर,’ असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे.” पण, “आपल्या वैऱ्‍याचा द्वेष कर” असे कोणताही मोशेचा नियम म्हणत नाही. ते, शास्त्री व परुशी म्हणत असत. त्यांनी नियमशास्त्राचा तसा अर्थ लावला होता—आपले यहुदी शेजारी यांच्यावरच केवळ प्रीती दाखवा, इतरांवर नव्हे.

  • धार्मिकता तोंडी संप्रदायाने नव्हे
    टेहळणी बुरूज—१९९१ | नोव्हेंबर १
    • १६. यहुद्यांच्या कोणत्या प्रघातामुळे शपथ घेणे निरर्थक बनले होते, आणि येशूने याबद्दल कोणती भूमिका ग्रहण केली?

      १६ येशूने अगदी त्याच सुरात पुढे म्हटलेः “‘खोटी शपथ वाहू नको,’ . . .  म्हणून प्राचीन लोकांस सांगितले होते हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, ‘शपथ म्हणून वाहूच नका.” या काळापावेतो यहुदी शपथेचा भंग करीत होते आणि काहीही न करता येणाऱ्‍या युक्‍तीबाज गोष्टीसाठी ते खूप शपथा घेत. पण येशूने म्हटलेः “शपथ म्हणून वाहूच नका . . . तुमचे बोलणे होय तर होय, किंवा नाही तर नाही, एवढेच असावे.” त्याने दाखविलेला नियम सरळ होताः सर्वदा सत्य असा, आपल्या शब्दांची खात्री देण्यासाठी शपथेची पुष्टी जरुरीची नाही. महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी शपथा राखून ठेवा.—मत्तय ५:३३-३७; पडताळा करा २३:१६-२२.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा