-
कसे मिळवाल जीवनात खरे यश?टेहळणी बुरूज—२०१२ | डिसेंबर १५
-
-
१३. संपत्ती साठवण्याच्या संदर्भात येशूने कोणता सल्ला दिला?
१३ धनसंपत्तीविषयी येशूने म्हटले: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात, आणि चोर घर फोडून चोरी करतात; तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाहीत व चोर घरफोडी करत नाहीत व चोरीही करत नाहीत; कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल.”—मत्त. ६:१९-२१.
-
-
कसे मिळवाल जीवनात खरे यश?टेहळणी बुरूज—२०१२ | डिसेंबर १५
-
-
१५. आपण कशा प्रकारचे यश मिळवण्यास झटले पाहिजे?
१५ काही धर्मपुढारी असा उपदेश देतात की यश मिळवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे आणि असा प्रयत्न केलाच जाऊ नये. पण येशूने मात्र यश मिळवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे असे शिकवले नाही याकडे लक्ष द्या. उलट, या प्रयत्नांना योग्य दिशा देण्याचा, म्हणजे पृथ्वीवर संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी “स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती” साठवण्याचा सल्ला त्याने आपल्या शिष्यांना दिला; कारण ही संपत्ती कधीही नष्ट होणार नाही. तेव्हा, आपण यहोवाच्या दृष्टीत यशस्वी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येशूचे शब्द आपल्याला याची आठवण करून देतात की जीवनात कोणता मार्ग निवडावा हे आपल्या हातात आहे. पण, आपल्या मनात जे असते, म्हणजेच, आपल्याला मनापासून जे मौल्यवान वाटते त्याच्याच मागे आपण लागतो ही एक वस्तुस्थिती आहे.
१६. आपण कोणत्या गोष्टीवर पूर्ण भरवसा ठेवू शकतो?
१६ जर आपल्या मनात खरोखरच यहोवाला आनंदित करण्याची इच्छा असेल, तर आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी तो अवश्य पुरवेल हा भरवसा आपण बाळगू शकतो. कदाचित पौलाप्रमाणेच, तात्पुरत्या काळासाठी तहानभूक यांसारख्या समस्यांना आपल्यालाही तोंड द्यावे लागेल. (१ करिंथ. ४:११) पण येशूने दिलेल्या या सुज्ञ सल्ल्यावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो: “काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्त. ६:३१-३३.
-