तुमची आशा—देव की संपत्ती?
“कित्येक वर्षे ती तिच्या तारेचे कुंपण सभोवार असणाऱ्या दोन बंदिस्त लोखंडी फाटकांच्या भपकेदार घरात दुखाःने होती.”
अशाप्रकारे या वृत्ताने लुटारूंनी जिच्या घरातून १ दशलक्ष डॉलर्स व जवाहिरे लुटली व त्यांच्या हातून ठार झाली त्या श्रीमंत विधवेचे वर्णन केले. तिचा मृतदेह सापडल्यानंतर पोलीसांनी तिच्या घरातून आणखीन ५ दशलक्ष डॉलर रोख घेऊन जाण्यासाठी माल वहातूक गाडीचा उपयोग केला. तसेच पोलीसांना हजारो “वाढदिवस भेटी” ज्याला “येशू ख्रिस्ताला” व “देवाला” अशी कार्डे जोडली होती त्या मिळाल्या.
या स्त्री वारसदारास कोणीही मित्र नसल्याचे दिसते व ती गर्भगळीत जीवन कंठीत होती. स्वतःस विचारा, तिने अतिशय मौल्यवान समजलेले ते लक्ष्यावधी पैसे खरोखर केवढे मौल्यवान होते? याहून अधिक, ती देवाबाबत केवढी श्रीमंत होती? तुम्हास खात्रीने माहीत असेल की देवास “वाढदिवस भेटी” ने मिळवता येत नाही किंवा देवाची शांती ही मालमत्तेच्या श्रीमंतपणाने मिळत नाही. हेच त्या पवित्र शास्त्रीय सुचनेतून दिसू शकते की आम्ही ‘चंचल धनावर नव्हे तर जो देव आपणास उपभोगासाठी सर्व कांही विपुल देतो त्यावर आशा ठेवतो.”—१ तिमथ्यी ६:१७.
संपत्ती एवढी चंचल का? तुम्हास कदाचित येशूचे शब्द केवढे सत्य आहेत ते माहीत असेल: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात, चोर घर फोडून चोरी करतात.” (मत्तय ६:१९) तुम्हास जाणीव आहेत की अग्नी घरास भस्म करण्याचा धोका नेहमीच आहे. कांही लोक त्यांच्या मौल्यवान गोष्टी बँकेत ठेवतात, परंतु लुटारू त्या चोरी करीत नाहीत का? एवढेच काय नविन मोटरही गंजून जाईल.
राष्ट्रांच्या अर्थ व्यवस्थेबाबत काय? कांही राष्ट्रात चलन फुगवटा चोराप्रमाणे आहे तो व्यक्तीच्या चिजवस्तुंचे मोल कमी करतो. “जर्मनीस १९२०च्या सुरुवातीत चलन फुगवट्याने तडाखा दिल्यानंतर, खरेदीकरांना . . . माल खरेदीसाठी जणू टोपलीभर पैश्यांची मोठी किंमत मोजावी लागली . . . जर्मनी मधील किंमती ऑगस्ट १९२२ ते नोव्हेंबर १९२३ पर्यंत १ कोटी टक्क्यांनी भडकल्या.” (द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडीया) संपत्तीवरील भाव केवढा निराशमय होऊ शकतो!
येशूने सूज्ञ सल्ला दिला: “तर स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करून चोरी करीत नाहीत.” (मत्तय ६:२०) ही “संपत्ती” काय आहे? यात आमच्या व्यक्तीगत सत्कर्माचा अहवाल, देवाबाबत श्रीमंत असणे आहे. ‘मला यासाठी काय करावे लागेल?’ असे कदाचित तुम्ही विचाराल. अंशतः पवित्रशास्त्र उत्तर देते “चांगले ते करावे, सत्कर्मावषियी धनवान असावे, परोपकारी, दानशूर असावे.”—१ तीमथ्यी ६:१८.
सध्या पृथ्वीभरात लाखो यहोवाचे साक्षीदार आहेत जे प्रामाणिकपणे पुरावा देतात की आत्मीक व भौतिक गोष्टीची इतरासोबत सहभागी करणे—खासरित्या प्रचार, शिक्षण व शिष्य बनविण्याच्या हालचालीत उतरून लोकांना राज्य आशेविषयी शिकण्यास मदत करणे—सत्कर्म आहे, ज्यास यहोवाची पसंती असून ते खरे समाधान आणविते. मृत्यु सुद्धा स्वर्गात साठविलेल्या अशा प्रकारच्या संपत्तीच्या आशीर्वादापासून कोणाला वंचित करू शकत नाही. ते असे का आहे? येशूने अभिवचन दिले: “पुनरूत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.”—योहान ११:२५.
सध्या आम्ही आनंद लुटू शकतो असा अमोल ठेवा
आम्ही आमचा विश्वास देवावर ठेवण्यास हवा असे म्हटल्यानंतर पौल पुढे म्हणतो की ‘देव सर्व कांही आमच्या उपभोगासाठी देतो.’ (१ तिमथ्यी ६:१७) दैनंदीन गरजांच्याही पुढे देव प्रेमळपणे ज्यांना जो पसंत करतो त्यांना अमोल ठेवा पुरवितो. ही ठेव काय आहे?
नीतिसूत्रे ३:१३–१८ काय म्हणते त्याची दखल घ्या: “ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करितो, तो मनुष्य धन्य होय, कारण त्याचा सौदा रूप्याच्या सौदापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तु त्याच्याशी तुल्य नाही. त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत. . . . जे त्याला धरून राहतात त्यास ते जीवनवृक्षरूपी आहे, जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य होय.” यास्तव “सुज्ञता” ही जगाच्या सर्व संपत्ती पेक्षा बहुतोल आहे.
सुज्ञता म्हणजे ज्ञानाचा उपयोग योग्य मार्गी करणे. होय, ती समस्यांचे निरसन करणे, त्या टाळणे, किंवा धोके होऊ न देणे, विशिष्ठ ध्येय प्राप्त करणे किंवा इतरांना तसे करण्यास मदत करण्यासाठी समज व ज्ञानाचा यशस्वीपणे उपयोग करण्याची क्षमता आहे. आम्हास जीवनातील परिक्षांना यशस्वीपणे तोंड देण्यास व देवासोबतची आमची भूमिका चांगली राखण्यास अशा प्रकारच्या सुज्ञतेची गरज आहे, याजसोबत तुम्ही सहमत नाही का?
सुज्ञतेचे वर्णन करताना नीतिसूत्रे ३:१३–१८ सौख्यानंदास ठळकपणे सामोरे आणते. आनंद हा ठेवा नाही का जो आम्हातील सर्वांना हवासा वाटतो? इश्वरी सुज्ञता तो आनंद देईल कारण खरा आनंद केवळ त्याचा स्रोत यहोवा देवापासूनच मिळू शकतो. अनुभवांनी हे शाबीत केले आहे की खरा आनंद सर्वोच्च देव यास व त्याच्या आत्म्याच्या कार्यवहनाचा अवमान करून मिळू शकत नाही. पवित्रशास्त्रात अभिवचन दिलेला आनंद आमच्या स्वर्गीय पित्यासोबतचे योग्य नातेसंबध व स्विकृत भूमिकेवर अवलंबून आहे. (मत्तय ५:३–१०) यास्तव, पवित्र शास्त्राभ्यासातून आम्ही शिकलेल्या गोष्टी आचरणात आणण्याकडून आम्ही “वरून येणारे ज्ञान” प्रदर्शित करू. ते आम्हास असा आनंद देईल जो जगातील संपत्तीने मिळविता येऊ शकत नाही.
तरीपण, याचीही आठवण करा की नीतिसूत्रे ३:१६ म्हणते: “त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे.” हे समजण्यासारखे आहे की उजवा हात संरक्षण देणारा म्हणून संदर्भित आहे जो व्यक्तीला कठीण समयी संरक्षण देण्यास व मदत करण्यास तयार असतो. सध्या पुष्कळजण स्वैराचार, लैंगिक अनीती, मादक औषधांचा दुरुपयोग व इत्यादी मध्ये गढले आहेत. तुम्ही कदाचित एड्स (अख़यर्ड इम्यून डीफिसिन्सी सिन्ड्रोम) विषयी वाचले असेल ज्याचा संबंध या वर्तणुकीसोबत आहे. तुम्ही या पासून जे निरीक्षिले आहे, त्या प्रमाणे या गोष्टीचा सराव करणारे खरेच आनंदी आहेत का? किंवा ते त्यांच्या वर व इतरावर पुष्कळ दुखः व वेदनाच काय पण मृत्यु ही आणतात?
याच्या विरोधात, देव वचनातील सुज्ञ सूचनांचे कार्यवहन हे नेहमीच आमच्या “उजव्या हाता”कडे, अशा धोक्यापासून संरक्षण देण्यासाठी असते. यास्तव, सूज्ञता आमचे आयुष्य वाढवू शकते व अकाली मृत्युकडे निरविणाऱ्या मार्गापासून आमचे रक्षण करू शकते. अशाप्रकारे, इश्वरी सुज्ञता ही खात्रीने आमचे सद्य जीवन अधिक आनंदी बनवू शकते.
आता सुज्ञतेने वागा
आम्हा सभोवतालचे पुरावे हे दाखवितात की आम्ही या व्यवस्थीकरणाच्या “शेवटच्या दिवसात” जीवन कंठत आहोत. (२ तिमथ्यी ३:१–५) म्हणून, या जगाच्या आत्म्यात स्वतःस बळी पडू देण्यावर अंकूश ठेवणे महत्वाचे आहे. अशा प्रकारचा आत्मा स्वार्थी इच्छांना आर्जवून भौतिक गोष्टींवर जोर देतो. इयोब पवित्रशास्त्र अहवालातील एक विश्वासू मनुष्य, त्याजविषयी एक आरोप करण्यात आला होता की, हा मनुष्य देवाची सेवा स्वार्थ पुर्ति व भौतिक प्राप्तीसाठी करतो. (इयोब १:९–११) अशाप्रकारचा आरोप खरेपणाने आम्हाविरूद्ध लादला जावू शकतो का?
आम्ही नाही असे उत्तर देतो तर आम्ही यशस्वीपणे आजच्या भौतिकवादास टक्कर देऊ, परंतु हा धोका, भौतिकवाद हा अति कपटातील एक ज्यास आम्ही तोंड देतो असा आहे. येशू ख्रिस्ताने म्हटले की “या व्यवस्थीकरणाची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात.” (मत्तय १३:२२) स्पष्टपणे आम्ही सतत “द्रव्याचा मोह” याच्या विरूद्ध जागृत राहिले पाहिजे, कारण तो खरोखर मौल्यवान नाही.
आम्ही स्वतःस भौतिक गोष्टीच्या तुलनात्मक मोलाची आठवण दिली पाहिजे. देवाचे वचन म्हणते: “धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे, त्याच्या मते ते उंच तटासारखे आहे.’” (नीतिसूत्रे १८:११) होय, संपत्ती पुरवू शकते ती सुरक्षितता केवळ कल्पना, फसवणूक आहे. भौतिक गोष्टी वाईट आहेत असे नाही. चूक ही आहे की देवाची कृपापसंती मिळविण्याच्या ऐवजात आमचे जीवन त्या सभोवताली केंद्रीत करणे होय. येशू ज्यास इतिहासातील सुज्ञ शिक्षक म्हणून ओळखले होते तो मार्मिकपणे म्हणाला: “कोणा जवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन हाते असे नाही.”—लूक १२:१५.
यास्तव “देवाबाबत धनवान” बनविणाऱ्या जीवनीमार्गाचा पाठलाग करू या. (लूक १२:२१) निर्माणकर्त्यासोबतची कृपापसंतीची भूमिका या पेक्षा अधिक मौल्यवान काहींच नाही. ते टिकविण्याचे आमचे सर्व परिश्रम ‘जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करण्यास’ हातभार लावतील.—१ तीमथ्यी ६:१९.