वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ९/१५ पृ. ३२
  • पाखरे व फुले यांवरून धडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पाखरे व फुले यांवरून धडा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ९/१५ पृ. ३२

पाखरे व फुले यांवरून धडा

आज पुष्कळदा लोकांची सर्वात मोठी विवंचना काय असते? अधिकांश लोकांना, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा आपले राहणीमान सुधारण्याकरता पुरेसे धन असणे ही असते.

येशू पृथ्वीवर होता तेव्हा देखील खर्चाची तोंडमिळवणी करणे ही प्रमुख चिंता होती. परंतु, त्याने ताकीद दिली की ही ग्राह्‍य चिंता आध्यात्मिक बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावयास लावणारी मुख्य काळजी बनू शकते. त्याचा मुद्दा उदाहरण देऊन स्पष्ट करण्यासाठी, येशूने त्याच्या शिष्यांना पाखरे व फुले यांच्याकडे निरखून पाहावयास सांगितले.

त्यांच्या चयापचयाच्या तीव्र प्रमाणामुळे पाखरांना आम्हापेक्षा कितीतरी अधिक अन्‍न—दररोज खावे लागते. शिवाय, ते बी पेरणे, कापणी करणे किंवा भविष्यासाठी अन्‍न साठवणे यांपैकी काहीही करू शकत नाहीत. तरीसुद्धा, येशूने निरीक्षल्याप्रमाणे, आमचा “स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो.” (मत्तय ६:२६) त्याचप्रमाणे, देव ‘रानांतील सुंदर फुलांना’ सर्वोत्तम पोषाख घालतो.—मत्तय ६:२८-३०.

येशू आम्हास हमी देतो की जर आम्ही भौतिक गरजांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगला व आध्यात्मिक बाबींना प्राथमिकता दिली, तर आम्हाला पुरेसे अन्‍न व वस्त्र आहे याची खात्री देव करील. जर यहोवा देव पाखरे व फुले यांची काळजी वाहतो, तर जे त्याजवर प्रेम करतात व ‘पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटतात’ त्यांची तो निश्‍चितच काळजी वाहील. (मत्तय ६:३३) तुम्ही देवाच्या राज्याच्या आस्थांना जीवनात प्रथम स्थान देत आहात का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा