वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ‘माझ्या वचनात राहा’
    टेहळणी बुरूज—२००३ | फेब्रुवारी १
    • १६. (अ) कोणत्या प्रकारच्या व्यक्‍ती काटेरी झुडपांच्या जमिनीसारख्या असतात? (ब) तीन शुभवर्तमान वृत्तान्तांनुसार काटे कशास सूचित करतात?—तळटीप पाहा.

      १६ कोणत्या प्रकारच्या व्यक्‍ती काटेरी झुडुपे असलेल्या जमिनीसारख्या आहेत? येशूने याविषयी स्पष्ट केले: “काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की, ते ऐकतात, आणि संसाराच्या चिंता, धन व विषयसुख ह्‍यात आयुष्यक्रमण करीत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्व फळ देत नाहीत.” (लूक ८:१४) पेरणाऱ्‍याचे बी आणि काटे दोन्ही एकाच वेळी जमिनीत वाढत असल्याप्रमाणे काही व्यक्‍ती देवाचे वचन आणि “विषयसुख” या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. देवाच्या वचनाचे सत्य त्यांच्या हृदयात पेरले जाते खरे पण वचनाशी चुरस करणाऱ्‍या इतर गोष्टी त्यांचे लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू लागतात. या लोकांचे लाक्षणिक हृदय विभाजित असते. (लूक ९:५७-६२) यामुळे ते देवाच्या वचनाबद्दल प्रार्थनापूर्वक व अर्थपूर्ण विचार करण्याकरता पुरेसा वेळ देत नाहीत. ते देवाचे वचन पूर्णपणे आत्मसात करत नाहीत आणि त्यामुळे संकटात टिकून राहण्याकरता लागणारी मनःपूर्वक गुणग्राहकता त्यांच्यात नसते. हळूहळू जगिक स्वार्थ त्यांच्या आध्यात्मिक कार्यांवर इतके वरचढ ठरतात की आध्यात्मिकदृष्ट्या त्यांची ‘वाढ खुंटते.’c यहोवावर पूर्ण मनाने प्रेम न करणाऱ्‍यांचा किती दुःखद शेवट होतो!—मत्तय ६:२४; २२:३७.

      १७. येशूच्या दृष्टान्तात उल्लेख केलेल्या लाक्षणिक काट्यांमुळे आपली आध्यात्मिक वाढ खुंटू नये म्हणून आपण जीवनात कोणते निर्णय घेतले पाहिजेत?

      १७ भौतिक चिंतांपेक्षा आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास, जगाच्या सुखदुःखांमुळे आपली आध्यात्मिक वाढ खुंटण्याचे आपण टाळू शकतो. (मत्तय ६:३१-३३; लूक २१:३४-३६) बायबलचे वाचन व आपण जे वाचतो त्यावर विचार करण्याकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये. जीवनातील अनावश्‍यक गोष्टी शक्य तितक्या कमी केल्यामुळे आपल्याला एकाग्र होऊन प्रार्थनापूर्वक मनन करण्याकरता अधिक वेळ मिळेल. (१ तीमथ्य ६:६-८) देवाच्या काही सेवकांनी असेच केले आहे. फलदायी रोपट्याला अधिक पोषण, प्रकाश व जागा मिळावी म्हणून त्यांनी जणू त्यांच्या जमीनसदृश्‍य हृदयातून काटेरी झाडे उपटून टाकली आहेत आणि आज ते यहोवाचे आशीर्वाद अनुभवत आहेत. २६ वर्षांची सॅन्ड्रा म्हणते: “सत्यात असल्यामुळे मला मिळालेल्या आशीर्वादांबद्दल मी मनन करते तेव्हा मला जाणीव होते की जगात मिळवलेल्या कोणत्याच गोष्टीशी त्यांची तुलना करता येणार नाही!”—स्तोत्र ८४:११.

  • ‘माझ्या वचनात राहा’
    टेहळणी बुरूज—२००३ | फेब्रुवारी १
    • c येशूच्या दृष्टान्ताच्या तिन्ही शुभवर्तमान वृत्तान्तांनुसार या जगातील सुखदुःखांमुळे बीजाची वाढ खुंटते: “प्रपंचाची चिंता,” “द्रव्याचा मोह,” “इतर गोष्टींचा लोभ,” व “विषयसुख.”—मार्क ४:१९; मत्तय १३:२२; लूक ८:१४; यिर्मया ४:३, ४.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा