येशूचे जीवन व उपाध्यपण
एका कुष्ठरोग्याला दाखविलेला दयाळूपणा
येशू आणि त्याचे चौघे शिष्य गालील शहरी असता, संपूर्ण प्रांतात तो ज्या अद्र्भित गोष्टी करीत होता त्यांची वार्ता पसरते. एका गावातील कुष्ठरोगाने आजारी असलेल्या माणसाला त्याच्या अद्भुत कृत्यांची बातमी कळते. वैद्य लूक सांगतो की तो मनुष्य “कुष्ठरोगाने संपूर्ण व्याप्त” असा होता. हा रोग पुढे पुढे शरीरातील वेगवेगळे भाग अगदी विद्रुप बनवतो त्यामुळे कुष्ठरोगी हा अगदी दारूण परिस्थितीत येतो.
येशू शहरातून जात असता तो कुष्ठरोगी त्याच्या जवळ येतो. खरे पहाता, देवाच्या नियमाप्रमाणे सूचना म्हणून कुष्ठरोग्यास तोंडाने ‘अशुद्ध अशुद्ध’ असे ओरडत जावे लागे, जेणे करून इतरांना या संसर्गजन्य रोगापासून संरक्षण मिळे. आता तर तो कुष्ठरोगी येशुसमोर पालथा पडतो व विनंती करतो: “प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहां.”
येशूवरील त्या मनष्याचा केवढा हा विश्वास! तथापि, त्या रोगाने देखिल त्याची किती दारूण अवस्था बनविली होती! मग आता येशू काय करील? तुम्ही काय केले असते? अगदी दयाळुपणे येशू हात पुढे करून त्याला स्पर्श करीत म्हणतो: “माझी इच्छा आहे, शुद्ध हो,” आणि लागलेच त्याचे कुष्ठ जाते.
अशा प्रकारचा कोणीतरी प्रेमळ आपला राजा असावा असे तुम्हास आवडेल का? कुष्ठरोग्याशी केलेले येशूचे वर्तन आमचा आत्मविश्वास वाढवतात की त्याच्या राज्य अधिकारामध्ये देखिल तो पवित्रशास्त्राची ही भविष्यवाणी पूर्ण करील जी म्हणते: “दुबळा व दरिद्री यांच्यावर तो दया करील.” होय, सर्व पीडितांना मदत करावी ही येशूच्या अंतःकरणातील इच्छा तो तेव्हा पूर्ण करील.
कुष्ठ रोग निवारण्याआधी सुद्धा, येशूच्या कार्याची लोकांमध्ये खूपच खळबळ निर्माण होते. शिवाय यशयाच्या भविष्यवादाच्या पूर्णतेप्रमाणे, येशू त्या मनुष्यास आज्ञा करतो: “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतःस मोशाने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर.”
पण तो मनुष्य इतका आनंदी झाला होता की हा चमत्कार तो लपवून ठेवू शकला नाही. त्याने सगळीकडे ही बातमी पसरवली व लोकांमध्ये इतके कुतूहल निर्माण केले की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून येशू अरण्यात जाऊन राहू लागला. पण तरीही चहुंकडून लोक त्याचे ऐकावयास व रोग बरे करून घ्यावयास जमू लागले. लूक ५:१२–१६; मार्क १:४०–४५; मत्तय ८:२–४; लेवीय १३:४५, १४:१०–१३; स्तोत्र ७२:१३; यशया ४२:१, २.
◆ कुष्ठरोगाचा कोणता परिणाम होतो, आणि कुष्ठरोग्यास कोणती सुचना द्यावी लागे?
◆ कुष्ठरोग्याने येशूला कशी विनंती केली, आणि येशूने केलेल्या प्रतिसादाने आम्ही काय शिकतो?
◆ रोगमुक्त झालेल्या मानसाने येशूच्या आज्ञा पालनात कशी न्यूनता दाखवली आणि त्याचा परिणाम काय झाला?