वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • तुम्ही समर्पण करून बाप्तिस्मा घेणं का महत्त्वाचं आहे?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • २. बाप्तिस्मा घेतलेल्या आपल्या सेवकांना यहोवा कोणते आशीर्वाद देतो?

      तुम्ही बाप्तिस्मा घ्याल तेव्हा तुम्ही यहोवाच्या आनंदी कुटुंबाचे सदस्य बनाल. मग तुम्ही बऱ्‍याच मार्गांनी यहोवाचं प्रेम अनुभवाल आणि त्याच्या आणखी जवळ याल. (मलाखी ३:१६-१८ वाचा.) तुम्हाला यहोवाचं पित्यासारखं प्रेम अनुभवता येईल. यासोबतच, त्याच्यावर प्रेम करणारे जगभरातले तुमचे भाऊबहीणसुद्धा तुमच्यावर प्रेम करतील. (मार्क १०:२९, ३० वाचा.) पण बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्ही काही पावलं उचलली पाहिजेत. तुम्ही यहोवाबद्दल शिकून घेतलं पाहिजे, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि त्याच्या मुलावर विश्‍वास ठेवला पाहिजे. यानंतर तुम्ही यहोवाला तुमचं जीवन समर्पित केलं पाहिजे. जर तुम्ही ही सगळी पावलं उचलून बाप्तिस्मा घेतला, तर कायम जीवनाचा आनंद घेण्याची तुमची आशा आणखी पक्की होईल. कारण देवाचं वचन सांगतं की ‘बाप्तिस्मा आपल्याला वाचवतो.’—१ पेत्र ३:२१.

  • छळ झाला तरी धीर सोडू नका!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • येशूने सांगितलं होतं की जेव्हा आपण यहोवाची उपासना करायचा निर्णय घेतो, तेव्हा आपल्या कुटुंबातल्या काही सदस्यांना कदाचित ते आवडणार नाही. मत्तय १०:३४-३६ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

      • कुटुंबातला एक जण यहोवाची उपासना करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा काय होऊ शकतं?

      व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

      व्हिडिओ: यहोवाने आम्हाला त्याच्या कुटुंबात घेतलं  (५:१३)

      • तुमच्या एखाद्या नातेवाइकाने किंवा मित्राने यहोवाची उपासना करण्यापासून तुम्हाला रोखायचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल?

      स्तोत्र २७:१० आणि मार्क १०:२९, ३० वाचा. प्रत्येक वचन वाचून झाल्यावर या प्रश्‍नावर चर्चा करा:

      • कुटुंबाकडून किंवा मित्रांकडून तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागला तर या वचनातले शब्द तुम्हाला कशी मदत करतील?

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा