वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोवाची मर्जी कोणावर बसेल?
    टेहळणी बुरूज—१९८९ | ऑगस्ट १
    • २ योहानाने ती विनंती मान्य केली आणि येशूचा बाप्तिस्मा झाला. येशू पाण्यातून वर येत असता असे झाले की, “आकाश उघडले; तेव्हा त्याने परमेश्‍वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला.” याशिवाय, “आकाशातून अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’” (मत्तय ३:१६, १७; मार्क १:११) केवढी ही उदात्त घोषणा! आम्हाला ज्यांच्याविषयी आदर वाटतो त्यांना संतुष्ट करावे असे आपल्याला मनापासून वाटत असते. (प्रे. कृत्ये ६:३-६; १६:१, २; फिलिप्पैकरांस २:१९-२२; मत्तय २५:२१) तर मग, सर्वसमर्थ देवाने तुम्हालाच म्हटले की, ‘माझी मर्जी तुझ्यावर आहे’, तेव्हा तुम्हाला कसे वाटेल याचा विचार करा!

  • यहोवाची मर्जी कोणावर बसेल?
    टेहळणी बुरूज—१९८९ | ऑगस्ट १
    • त्याच्या शब्दांचा काय अर्थ होतो?

      ४. (अ) देवाच्या घोषणेत “संतुष्ट”ता हा जो शब्द वापरण्यात आला आहे त्या ग्रीक शब्दाचा काय अर्थ होतो? (ब) या विशिष्ट प्रकारात त्या शब्दाचा केलेला वापर मनोवेधक का आहे?

      ४ “मी [येशू]विषयी संतुष्ट आहे,” या देवाच्या शब्दांच्या शुभवर्तमानातील लिखाणात यु·डो·केʹओ या ग्रीक क्रियापदाचा वापर आहे. (मत्तय ३:१७; मार्क १:११; लूक ३:२२) याचा अर्थ, “संतुष्ट होणे, मर्जी दाखविणे, विषयी आनंद पावणे” असा आहे आणि याच्या नामाच्या प्रकारात “सदिच्छा, संतुष्टता, मर्जी, इच्छा, मनोभावना” हा अर्थ येतो. यु·डो·केʹओ केवळ ईश्‍वरी मर्जीपुरताच मर्यादित नाही. उदाहरणार्थ, मासेदोनियातील ख्रिस्तीजनांना इतरांसोबत आर्थिक सहभागी करण्याचे “बरे वाटले.” (रोमकर १०:१; १५:२६; २ करिंथकर ५:८; १ थेस्सलनीकाकर २:८; ३:१) येशूला ही पसंती माणसांकडून नव्हे तर देवाकडून मिळाली होती. आणि ती संज्ञा येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर वापरण्यात आली. (मत्तय १७:५; २ पेत्र १:१७) मनोवेधक गोष्ट ही की, लूक २:५२ जेव्हा येशूविषयी भाष्य करते की तो बाप्तिस्मा न झालेला युवक असताना त्याला देव व माणसांची ‘कृपा लाभली’, तेव्हा ते खा’रीस हा वेगळाच शब्दप्रयोग वापरते.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा