-
येशू जेव्हा राज्य वैभवात येईलटेहळणी बुरूज—१९९७ | मे १५
-
-
४ तीन प्रेषितांनी नक्की काय पाहिले? घडलेल्या घटनेचे लूकने केलेले वर्णन पुढील प्रमाणे आहे: “[येशू] प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. आणि पाहा, मोशे व एलीया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करीत होते; ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते.” मग, “मेघ उतरून [प्रेषितांवर] छाया करू लागला; आणि ते मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे; ह्याचे तुम्ही ऐका.”—लूक ९:२९-३१, ३४, ३५.
-
-
येशू जेव्हा राज्य वैभवात येईलटेहळणी बुरूज—१९९७ | मे १५
-
-
५. प्रेषित पेत्रावर रूपांतराचा काय परिणाम झाला?
५ प्रेषित पेत्राने येशूची “ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र” अशी आधीच ओळख करून दिली होती. (मत्तय १६:१६) स्वर्गातून आलेल्या यहोवाच्या वाणीने या ओळखीची पुष्टी दिली व येशूच्या रूपांतराचा दृष्टान्त, कालांतराने ख्रिस्ताचे राज्य सामर्थ्यात व वैभवात येऊन मानवजातीचा न्याय करण्याबद्दलची आगाऊ सूचना होती. रूपांतर होऊन ३० पेक्षा अधिक वर्षे उलटल्यावर पेत्राने लिहिले: “चातुर्याने कल्पिलेल्या कथांस अनुसरुन आम्ही आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्यांसंबंधाने तुम्हांस कळविले असे नाही; तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली.”—२ पेत्र १:१६-१८; १ पेत्र ४:१७.
-