अध्याय ४
येशू ख्रिस्त देवाबद्दलच्या ज्ञानाची गुरुकिल्ली
१, २. देवाविषयीच्या ज्ञानाबद्दल असणाऱ्या गुरुकिल्लीला जगातील धर्मांनी कसे पायाखाली तुडवले आहे?
तुम्ही दरवाजावर आहात व आपल्या किल्ल्यांनी लडफडत आहात. ती खूपच गारठलेली व काळोखी रात्र आहे. तुम्हाला कधी घरात जाऊ असे वाटत आहे—पण तुमच्याजवळ असणारी किल्ली लागतच नाही. ती योग्य किल्ली असल्याचे दिसते; पण त्यामुळे कुलूप उघडत नाही. केवढा हा त्रागा! तुम्ही तुमच्या किल्ल्यांकडे परत एकदा बघता. तुम्ही बरोबरचीच किल्ली वापरत आहात ना? कोणी तरी ती किल्ली खराब केली आहे का?
२ देवाविषयीच्या ज्ञानाबद्दल जगाच्या धार्मिक गोंधळाने काय केले आहे त्याचे हे चांगले उदाहरण आहे. याचा परिणाम हा झाला आहे की, आमची समज उकलणारी जी खरी किल्ली आहे तिचीच बहुतेकांनी पायमल्ली केली आहे. येशू ख्रिस्त, ती गुरुकिल्ली आहे. काही पंथांनी येशूकडे सर्वतोपरी दुर्लक्ष करून ही किल्ली काढून टाकली आहे. इतरांनी येशूची सर्वसमर्थ देव म्हणून भक्ती करून त्याची भूमिका विद्रुप केली आहे. काहीही असले तरी, आपल्यासाठी येशू ख्रिस्त या प्रमुख व्यक्तीबद्दलच्या अचूक ज्ञानाशिवाय देवाविषयीचे ज्ञान जणू बंदच आहे.
३. देवाविषयीच्या ज्ञानाबद्दल येशू गुरुकिल्ली आहे असे का म्हणता येईल?
३ “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे ज्ञान त्यांनी प्राप्त करावे,” असे येशूने म्हटल्याचे तुम्हाला आठवतच असेल. (योहान १७:३, NW) असे म्हणण्यामागे येशूचा कोणताही गर्व दिसत नव्हता. खरे म्हणजे, ख्रिस्ताचे अचूक ज्ञान घ्यावे अशाप्रकारे शास्त्रवचने वारंवार ठासून सांगतात. (इफिसकर ४:१३; कलस्सैकर २:२; २ पेत्र १:८; २:२०) “सर्व संदेष्टे त्याच्याविषयी [ख्रिस्त येशू] साक्ष देतात,” असे प्रेषित पेत्राने निरीक्षिले. (प्रेषितांची कृत्ये १०:४३) तसेच प्रेषित पौलाने लिहिले: “त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधि गुप्त आहेत.” (कलस्सैकर २:३) पौलाने असे सुद्धा म्हटले की, येशूमुळेच यहोवाची सर्व अभिवचने खरी होतात. (२ करिंथकर १:२०) यास्तव, येशू ख्रिस्त हाच देवाच्या ज्ञानाची खरी गुरुकिल्ली आहे. आपले येशूबद्दलचे ज्ञान हे, त्याचा स्वभाव व देवाच्या व्यवस्थेमधील त्याची भूमिका याचा विपर्यास करणाऱ्या सर्व गोष्टींपासून मुक्त असले पाहिजे. पण येशूचे अनुयायी, तो देवाच्या उद्देशांमधील प्रमुख व्यक्ती असल्याचे का मानतात?
वचनदत्त मशीहा
४, ५. मशीहावर कोणत्या आशा केंद्रित झाल्या आणि येशूच्या शिष्यांनी त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने बघितले?
४ हाबेल या विश्वासू पुरुषाच्या काळापासून देवाच्या सेवकांनी, यहोवा देवाने स्वतइब्रीयांस भाकीत केलेल्या संतानाला पाहण्याची मोठी उत्कंठा बाळगली. (उत्पत्ति ३:१५; ४:१-८; इब्रीयांस ११:४) हे संतान मशीहा म्हणजे “अभिषिक्त” या नात्याने देवाच्या उद्देशांनुरूप सेवा करील असे प्रकट करण्यात आले. तो “पातकांचा अंत” करणार होता; त्याच्या राज्याच्या वैभवाबद्दल स्तोत्रांमध्ये भाकीत करण्यात आले आहे. (दानीएल ९:२४-२६; स्तोत्र ७२:१-२०) हा मशीहा कोण असल्याचे दिसणार होते?
५ आंद्रिया या यहूदी तरुणाने जेव्हा येशू नासरेथकराचे बोलणे ऐकले तेव्हा तो किती अचंबित झाला होता त्याची कल्पना करा. आंद्रिया घाईने त्याचा भाऊ शिमोन पेत्राकडे गेला व त्याला म्हणाला: “मशीहा आम्हाला सापडला आहे.” (योहान १:४१) येशू हाच वचनदत्त मशीहा आहे अशी येशूच्या शिष्यांची खात्री झाली. (मत्तय १६:१६) शिवाय खरे ख्रिश्चन, येशू हाच खरा भाकीत करण्यात आलेला मशीहा किंवा ख्रिस्त आहे या विश्वासाकरता आपले जीवन पणाला लावण्यासाठीही तयार होते. त्यांच्यापाशी असा कोणता पुरावा होता? आपण आता पुराव्याचे तीन प्रकार पाहू या.
येशू हा मशीहा होता याबद्दलचा पुरावा
६. (अ) कोणती वंशावळ वचनदत्त संतानाला पुढे आणणार होती आणि त्या कुटुंबातून येशू सामोरा आला हे आपण कसे जाणतो? (ब) सा. यु. ७० नंतरच्या कोणालाही मशीहा असल्याचा दावा सिद्ध करण्याचे का जमणार नव्हते?
६ येशूची वंशावळ तो वचनदत्त मशीहा असल्याची ओळख देण्याचा पहिला आधार देते. यहोवाने त्याचा सेवक अब्राहाम याला, वचनदत्त संतान त्याच्या कुळातून येणार असे म्हटले होते. अब्राहामाचा मुलगा इसहाक, इसहाकाचा मुलगा याकोब आणि याकोबाचा मुलगा यहूदा या प्रत्येकांना अशीच अभिवचने मिळाली. (उत्पत्ति २२:१८; २६:२-५; २८:१२-१५; ४९:१०) यानंतर जेव्हा दावीद राजाला सांगण्यात आले की, हा मशीहा त्याच्या घराण्यातून येणार तेव्हा मशीहा येणाऱ्या वंशाची मालिका शतकानंतर निमुळती बनली. (स्तोत्र १३२:११; यशया ११:१, १०) मत्तय व लूक यांनी लिहिलेले शुभवर्तमान अहवाल येशू त्या कुटुंबमालिकेतून आल्याची पुष्टी देतात. (मत्तय १:१-१६; लूक ३:२३-३८) येशूचे पुष्कळ कट्टर शत्रू होते, तरी त्यापैकी एकाला देखील त्याच्या सुपरिचित वंश मालिकेबद्दल आव्हान करता आले नाही. (मत्तय २१:९, १५) यास्तव, त्याची वंशावळ खरी असल्याचे निर्विवाद आहे. तथापि, रोमी लोकांनी सा. यु. ७० मध्ये जेरुसलेमला लुटले तेव्हा यहूद्यांच्या कौटुंबिक याद्या नष्ट झाल्या. त्यानंतर, वचनदत्त मशीहा असल्याचे कोणीही दाव्याने सिद्ध करू शकला नाही.
७. (अ) येशू हा मशीहा होता याबद्दल दुसऱ्या क्रमांकाचा कोणता पुरावा आहे? (ब) मीखा ५:२ ची येशूसंबंधाने कशी पूर्णता घडली?
७ पूर्ण झालेली भविष्यवाणी हा दुसऱ्या क्रमांकाचा पुरावा आहे. इब्री शास्त्रवचनातील शेकडो भविष्यवाण्या मशीहाच्या जीवनाच्या विविध गोष्टींचे वर्णन देतात. सा. यु. पू. आठव्या शतकात मीखा संदेष्ट्याने हा मोठा अधिपती बेथलहेम या साधारण गावी जन्मेल असे भाकीत केले. इस्राएलात दोन बेथलहेम शहरे होती, पण या भविष्यवाणीने ते नेमके कोणते शहर असेल त्याचा स्पष्ट निर्देश केला: जेथे दावीद राजाचा जन्म झाला होता ते बेथलहेम एफ्राथा. (मीखा ५:२) येशूचे पालक, योसेफ व मरीया बेथलहेमाच्या उत्तरेकडे साधारण १५० किलोमीटर दूर असलेल्या नासरेथ गावी राहात होते. तथापि, मरीया गर्भवती होती तेव्हा कैसर औगुस्त या रोमी अधिपतीने सर्व लोकांना आपापल्या गावी जाऊन तेथे नावनिशी करण्याची आज्ञा दिली.a या कारणामुळे योसेफला आपली गर्भवती पत्नी मरीया हिला बेथलहेमाला घेऊन जावे लागले व येथेच येशूचा जन्म झाला.—लूक २:१-७.
८. (अ) ६९ “सप्तके” केव्हा व कोणत्या घटनेने सुरू झाली? (ब) ६९ “सप्तके” केवढ्या लांबीची होती व ती संपली तेव्हा काय घडले?
८ सा. यु. पू. ६ व्या शतकात दानीएल संदेष्ट्याने, जेरूसलेमाचे पुनर्वसन व जीर्णोद्धार होण्याची आज्ञा झाल्यापासून ६९ ‘सप्तकांनी’ “अभिषिक्त, अधिपति” येईल असे भाकीत केले. (दानीएल ९:२४, २५) या ‘सप्तकांपैकी’ प्रत्येक सप्तक सात वर्ष लांबीचे होते.b बायबल तसेच प्रापंचिक इतिहासानुसार जेरुशलेमाचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा सा. यु. पू. ४५५ मध्ये काढण्यात आली. (नहेम्या २:१-८) यास्तव, मशीहा सा. यु. पू. ४५५ नंतर ४८३ (७ च्या ६९ वेळा) वर्षांनी प्रकट होणार होता. हे आपल्याला सा. यु. २९ मध्ये आणते. यहोवाने येशूचा याच वर्षी पवित्र आत्म्याने अभिषेक केला. अशाप्रकारे, येशू “ख्रिस्त” (म्हणजे, “अभिषिक्त”) किंवा मशीहा बनला.—लूक ३:१५, १६, २१, २२.
९. (अ) स्तोत्र २:२ ची कशी पूर्णता झाली? (ब) आणखी कोणत्या भविष्यवाण्या येशूमध्ये पूर्ण झाल्या? (तक्ता पाहा.)
९ अर्थात, सर्वांनी येशूचा वचनदत्त मशीहा म्हणून स्वीकार केला नाही आणि शास्त्रवचनांनी हे आधीच भाकीत केले होते. स्तोत्र २:२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दावीद राजाला हे भाकीत करण्याची प्रेरणा देण्यात आली होती: “परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत.” यहोवाच्या अभिषिक्ताविरूद्ध किंवा मशीहाविरुद्ध हल्ला करण्यामध्ये एकापेक्षा अधिक देशातील सत्ताधीश एकत्र होतील असे या भविष्यवाणीत सांगण्यात आले आहे आणि अगदी तसेच घडले. यहूदी धर्मपुढारी, हेरोद राजा आणि रोमी सुभेदार पंतय पिलात या सर्वांनी येशूला ठार मारण्यात भाग घेतला. तेव्हापासून पूर्वीचे दोघे शत्रू, हेरोद व पिलात खास दोस्त बनले. (मत्तय २७:१, २; लूक २३:१०-१२; प्रेषितांची कृत्ये ४:२५-२८) येशू हा मशीहा होता याच्या आणखी पुराव्याकरता कृपया सोबत असलेला “काही उल्लेखनीय मशीही भविष्यवाण्या” हा तक्ता पहा.
१०. येशू हा त्याचा वचनदत्त अभिषिक्त जन आहे याची यहोवाने कोणकोणत्या प्रकाराने साक्ष दिली?
१० यहोवा देवाची साक्ष हा येशूच्या मशीहापदाला आधार देणारा तिसरा पुरावा आहे. येशू हा वचनदत्त मशीहा होता हे लोकांना माहीत होण्यासाठी यहोवाने देवदूतांना पाठवले. (लूक २:१०-१४) खरे म्हणजे, येशूच्या पृथ्वीवरील जीवनात यहोवाने स्वतइब्रीयांस स्वर्गातून बोलून येशूबद्दलची आपली पसंती व्यक्त केली. (मत्तय ३:१६, १७; १७:१-५) यहोवाने येशूला चमत्कार करण्याचे सामर्थ्य दिले. यापैकीचा प्रत्येक चमत्कार येशू हा मशीहा होता याचा ईश्वरी पुरावा होता कारण देव कोणा भोंदू माणसाला अद्भुत कृत्ये करण्याचे कधीच सामर्थ्य देणार नाही. यहोवाने शुभवर्तमानाच्या अहवालांना प्रेरित करण्याकरता त्याच्या पवित्र आत्म्याचा उपयोग केला. ज्यामुळे येशूच्या मशीहापदाचा पुरावा, इतिहासात अगदी विस्तारीत रूपात भाषांतरीत व वितरीत झालेल्या बायबलचा एक भाग बनू शकेल.—योहान ४:२५, २६.
११. येशू मशीहा होता याबद्दलचा केवढा पुरावा उपलब्ध आहे?
११ या सर्व पुराव्यामध्ये एकंदरपणे येशू हा वचनदत्त मशीहा आहे अशी ओळख देणारी शेकडो विधाने आहेत. या कारणास्तव, खऱ्या ख्रिश्चनांनी त्याच्याबद्दल “सर्व संदेष्टे साक्ष देतात,” तसेच तो देवाविषयीच्या ज्ञानाची गुरूकिल्ली आहे असा बरोबरचा दृष्टिकोन राखला आहे. (प्रेषितांची कृत्ये १०:४३) तथापि, येशू ख्रिस्त हा मशीहा होता या वस्तुस्थितीपेक्षाही त्याच्याबद्दल अधिक शिकून घेण्याजोगे आहे. त्याचा मुळारंभ कोठून आहे? तो कसा होता?
येशूचे मानवी प्रकृतीपूर्वीचे अस्तित्व
१२, १३. (अ) येशू पृथ्वीवर येण्याआधी स्वर्गात होता हे आपल्याला कसे कळते? (ब) “शब्द” कोण आहे व तो मनुष्य होण्याआधी काय करीत होता?
१२ येशूचा जीवनक्रम तीन टप्प्यात विभागला जाऊ शकतो. पहिला टप्पा त्याचा पृथ्वीवर जन्म होण्याच्या बऱ्याच काळाआधी सुरु झाला. मीखा ५:२ ने म्हटले की, मशीहाचा उद्भव “प्राचीन काळापासून, अनादि काळापासून” आहे. शिवाय, येशूने साधेपणात म्हटले की तो ‘वरून’ म्हणजे स्वर्गातून आला होता. (योहान ८:२३; १६:२८) पण, पृथ्वीवर येण्याआधी तो स्वर्गात किती काळापासून अस्तित्वात होता?
१३ येशूला देवाचा “एकुलता एक पुत्र” असे म्हणण्यात आले, कारण यहोवाने त्याची थेट निर्मिती केली होती. (योहान ३:१६) तो “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ” असल्यामुळे देवाने इतर गोष्टींची निर्मिती करण्यामध्ये येशूचा उपयोग केला. (कलस्सैकर १:१५; प्रकटीकरण ३:१४) योहान १:१ म्हणते की, “शब्द” (मानवी अस्तित्वापूर्वीचा येशू) “प्रारंभी” देवासोबत होता. यास्तव, यहोवाने “आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली,” तेव्हा हा शब्द त्याच्यासोबत होता. देवाने याच शब्दाला संबोधून असे म्हटले: “आपल्या प्रतिरूपाचा . . . मनुष्य आपण करू.” (उत्पत्ति १:१, २६) याचप्रमाणे, हा शब्द देवाचा प्रिय “कुशल कारागीर” असावा ज्याचे वर्णन नीतिसूत्रे ८:२२-३१ मध्ये ज्ञानाचे प्रत्यक्ष रूप असे केले असून तो सर्व गोष्टींची निर्मिती करण्यात यहोवाच्या बाजूला राहून काम करत असल्याचे दाखवले आहे. यहोवाने त्याला उत्पन्न केल्यावर त्याने मानव म्हणून पृथ्वीवर येण्याआधी देवासोबत स्वर्गात अनेक युगे घालवली.
१४. येशूला “अदृश्य देवाचे प्रतिरूप” का म्हणण्यात आले?
१४ या कारणामुळे, येशूला कलस्सैकर १:१५ “अदृश्य देवाचे प्रतिरूप” म्हणते ते काही आश्चर्याचे नव्हे! अगणित युगांच्या जवळच्या सहवासामुळे हा आज्ञाधारक पुत्र आपला पिता यहोवा याच्यासारखाच बनला. हे, देवाविषयीच्या जीवनदायी ज्ञानाची गुरुकिल्ली देव का आहे त्याचे आणखी एक कारण आहे. येशूने पृथ्वीवर असताना जे केले ते यहोवा येथे असता तर त्यानेही अगदी तसेच केले असते. यास्तव, येशूची माहिती मिळवून घेणे म्हणजे यहोवाबद्दल आपले ज्ञान वाढवणे होय. (योहान ८:२८; १४:८-१०) यास्तव, येशू ख्रिस्ताबद्दल अधिक शिकून घेणे महत्त्वपूर्ण आहे.
येशूचा पृथ्वीवरील जीवनक्रम
१५. येशूचा परिपूर्ण बालक म्हणून कसा जन्म होऊ शकला?
१५ येशूच्या जीवनाचा दुसरा टप्पा येथे पृथ्वीवर होता. देवाने त्याचे जीवन स्वर्गातून काढून विश्वासू यहूदी कुमारी मरीया हिच्या उदरात स्थलांतरीत केले तेव्हा तो स्वेच्छेने अधीन राहिला. यहोवाच्या सामर्थ्यशाली पवित्र आत्म्याने, किंवा क्रियाशील शक्तीने मरीयेवर ‘छाया’ केली व तिला गर्भवती बनवले आणि परिपूर्ण बाळाचा जन्म घडवला. (लूक १:३४, ३५) येशूचे जीवन परिपूर्ण उगमापासून असल्यामुळे त्याच्याठायी अपूर्णतेचा वारसा नव्हता. त्याची योसेफ सुताराच्या गरीब घरी त्याचा दत्तकपुत्र म्हणून वाढ झाली व तो त्या कुटुंबात इतर मुलांमध्ये ज्येष्ठ होता.—यशया ७:१४; मत्तय १:२२, २३; मार्क ६:३.
१६, १७. (अ) येशूला चमत्कार करण्यासाठी कोठून सामर्थ्य मिळाले आणि त्यांच्यापैकीचे काही चमत्कार कोणते होते? (ब) येशूने कोणते गुण प्रदर्शित केले?
१६ येशूठायी यहोवा देवाबद्दल गाढ निष्ठा होती हे तो १२ वर्षांचा असतानाच प्रकट झाले. (लूक २:४१-४९) मोठा झाल्यावर आणि वयाच्या ३० व्या वर्षी त्याने त्याचे सेवकपण सुरू केल्यावर येशूने इतर मानवांबद्दल देखील अस्सीम प्रीती दाखवली. देवाच्या पवित्र आत्म्याने त्याला अद्भुत कृत्ये करण्यासाठी समर्थ केले तेव्हा त्याने अगदी कनवाळूपणे आजारी, लंगडे, लुळे, अंधळे, बहिरे, कुष्ठरोगी यांना बरे केले. (मत्तय ८:२-४; १५:३०) येशूने हजारो भुकेलेल्यांना अन्न दिले. (मत्तय १५:३५-३८) त्याने त्याच्या मित्रांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या वादळाला शांत केले. (मार्क ४:३७-३९) खरे म्हणजे, त्याने मृतांचे पुनरुत्थान देखील घडवले. (योहान ११:४३, ४४) हे चमत्कार इतिहासात सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. येशूच्या शत्रूंनी देखील त्याने ‘पुष्कळ चिन्हे केल्याची’ कबुली दिली.—योहान ११:४७, ४८.
१७ येशूने स्वतःच्या देशात यात्रा करून लोकांना देवाच्या राज्याचे शिक्षण दिले. (मत्तय ४:१७) त्याने सहनशीलता व समंजसपणाचे उत्कृष्ट प्रतीचे उदाहरण घालून दिले. त्याच्या शिष्यांनी देखील जेव्हा त्याला निराश केले तेव्हा त्याने सहानुभूतीने म्हटले: “आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे.” (मार्क १४:३७, ३८) तरीही, ज्यांनी सत्याला तुच्छ मानले आणि असहाय्य लोकांना जाचले त्यांच्याशी येशू निर्भिडपणे व सरळपणे वागला. (मत्तय २३:२७-३३) खासपणे, त्याने त्याच्या पित्याच्या प्रेमाचे उदाहरण परिपूर्णतेने अनुसरले. अपरिपूर्ण मानवजातीला भविष्यात आशा मिळावी म्हणून येशूची मरण्याची देखील तयारी होती. या कारणास्तव, येशू देवाविषयीच्या ज्ञानाची गुरुकिल्ली आहे असे त्याला संबोधणे खरेच आश्चर्याचे नाही! होय, तो जिवंत किल्ली आहे! जिवंत किल्ली, असे आम्ही का म्हणतो? या गोष्टीमुळेच आपण त्याच्या जीवनाच्या तिसऱ्या टप्प्यात येतो.
सध्याचा येशू
१८. आपण येशू ख्रिस्ताबद्दल आज कोणता दृष्टिकोन ठेवावा?
१८ बायबल येशूच्या मृत्यूबद्दल कळवत असले तरी तो सध्या जिवंत आहे! खरे म्हणजे, सा. यु. पहिल्या शतकात जिवंत असलेले शेकडो लोक, त्याचे पुनरुत्थान झालेले आहे याचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. (१ करिंथकर १५:३-८) मग, भाकीत केल्यानुसार तो त्याच्या पित्याच्या उजव्या बाजूला जाऊन बसला आणि स्वर्गात राज्याचे आधिपत्य मिळण्याची वाट पाहत राहिला. (स्तोत्र ११०:१; इब्रीयांस १०:१२, १३) तेव्हा, आपण आज येशूला कोणत्या दृष्टीने बघावे? त्याला गव्हाणीतील एक असहाय्य बाळ म्हणून समजावे का? किंवा मृत्युदंड मिळालेला यातना सहन करत असलेला मनुष्य? नाही, तो सध्या सामर्थ्यशाली, राज्य करीत असलेला राजा आहे! आणि लवकरच तो आपले आधिपत्य आमच्या त्रस्त पृथ्वीवर प्रदर्शित करणार आहे.
१९. नजीकच्या भविष्यात येशू कोणती हालचाल करील?
१९ प्रकटीकरण १९:११-१५ मध्ये राजा येशू ख्रिस्ताचे मोठ्या सामर्थ्यानिशी दुष्टांचा नाश करण्याकरता पुढे सरसावत असल्याचे व्यापकपणे वर्णन देण्यात आले आहे. आज लाखो लोकांना जो त्रास ग्रासून आहे त्याचा अंत करण्यासाठी हा प्रेमळ स्वर्गीय अधिपती किती उत्सुक असेल! शिवाय तो, पृथ्वीवर होता त्याप्रमाणे, त्याचे परिपूर्ण उदाहरण अनुसरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मदत देण्यासाठी तितकाच उत्सुक आहे. (१ पेत्र २:२१) तो अशांना, त्वरेने येत असलेल्या हर्मगिदोन म्हटल्या गेलेल्या ‘सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईमधून,’ वाचवू इच्छितो, म्हणजे ते देवाच्या स्वर्गीय राज्याची पार्थिव प्रजा म्हणून चिरकालपणे जिवंत राहू शकतील.—प्रकटीकरण ७:९, १४; १६:१४, १६.
२०. येशू त्याच्या हजार वर्षांच्या कारकिर्दीत मानवजातीसाठी काय करील?
२० भाकीत करण्यात आलेल्या येशूच्या हजार वर्षांच्या शांतीच्या कारकिर्दीत तो मानवजातीसाठी चमत्कार करील. (यशया ९:६, ७; ११:१-१०; प्रकटीकरण २०:६) येशू सर्व रोग बरे करील व मृत्यूला संपुष्टात आणील. तो करोडोंचे पुनरुत्थान घडवील, म्हणजे यांना देखील पृथ्वीवर चिरकाल राहण्याची संधी मिळेल. (योहान ५:२८, २९) त्याच्या मशीही राज्याबद्दल नंतरच्या अध्यायात अधिक शिकण्यास तुम्ही नक्कीच रोमांचित व्हाल. याची खात्री राखा: त्या राज्याच्या अधिपत्याखाली आपले जीवन किती अद्भुत असेल त्याची कल्पना सुद्धा सध्या करता येत नाही. त्यामुळे येशू ख्रिस्ताचा अधिक परिचय करून घेणे हे किती महत्त्वाचे आहे! होय, येशू हा सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या देवाविषयीच्या ज्ञानाची जिवंत गुरुकिल्ली आहे ही गोष्ट आम्ही कधीही दृष्टीआड होऊ न देणे अत्यावश्यक आहे.
[तळटीप]
a या नावनिशीमुळे रोमी साम्राज्याला कराची वसूली करण्यात चांगली मदत मिळाली. याद्वारे औगुस्तने ‘देशात कर वसूल करणाऱ्या’ अधिपतीबद्दल करण्यात आलेली भविष्यवाणी नकळतपणे पूर्ण केली. या अधिपतीच्या वारसाच्या काळात “करार केलेल्या सरदाराचा” किंवा मशीहाचा “नाश होईल” असे याच भविष्यवाणीत भाकीत करण्यात आले. औगुस्तचा वारस तिबिर्य याच्या काळी येशूचा वध करण्यात आला.—दानीएल ११:२०-२२.
b प्राचीन यहूदी लोक सप्तकांची वर्षे या परिभाषेत सहसा विचार करीत असत. उदाहरणार्थ, जसा प्रत्येक सातवा दिवस शब्बाथाचा दिवस होता, तसेच प्रत्येक सातवे वर्ष शब्बाथ वर्ष होते.—निर्गम २०:८-११; २३:१०, ११.
तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा
येशू मशीहा असल्याच्या दाव्यास त्याची वंशावळ कशी सबळ करते?
येशूमध्ये पूर्ण झालेल्या काही मशीही भविष्यवाण्या कोणत्या आहेत?
देवाने येशू त्याचा अभिषिक्त होता हे कसे प्रत्यक्ष दाखवले?
येशू देवाविषयीच्या ज्ञानाची जिवंत गुरुकिल्ली का आहे?
[३७ पानांवरील चौकट]
काही उल्लेखनीय मशीही भविष्यवाण्या
भविष्यवाणी घटना पूर्णता
त्याचे आरंभीचे जीवन
यशया ७:१४ कुमारीद्वारे जन्म मत्तय १:१८-२३
यिर्मया ३१:१५ त्याच्या जन्मानंतर बालकांचा मृत्यू मत्तय २:१६-१८
त्याचे सेवकपण
यशया ६१:१, २ त्याची देवाकडून नियुक्ती लूक ४:१८-२१
यशया ९:१, २ सेवकपणामुळे लोकांना मोठा प्रकाश दिसला मत्तय ४:१३-१६
स्तोत्र ६९:९ यहोवाच्या मंदिरासाठी आवेशी योहान २:१३-१७
यशया ५३:१ विश्वास ठेवला नाही योहान १२:३७, ३८
जखऱ्या ९:९; गाढवीच्या शिंगरावर बसून जेरुसलेमात प्रवेश; मत्तय २१:१-९
स्तोत्र ११८:२६ यहोवाच्या नामाने येणारा व राजा म्हणून गौरवला गेला
त्याचा विश्वासघात व मृत्यू
स्तोत्र ४१:९; १०९:८ एक प्रेषित बेईमान; प्रेषितांची कृत्ये १:१५-२०
येशूचा विश्वासघात करतो
व नंतर बदलला जातो
जखऱ्या ११:१२ चांदीच्या ३० तुकड्यांसाठी विश्वासघात मत्तय २६:१४, १५
स्तोत्र २७:१२ त्याच्याविरुद्ध खोटे साक्षी उभे केले मत्तय २६:५९-६१
स्तोत्र २२:१८ वस्त्रावर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या योहान १९:२३, २४
यशया ५३:१२ अपराध्यात गणना मत्तय २७:३८
स्तोत्र २२:७, ८ मरताना निंदा केली गेली मार्क १५:२९-३२
स्तोत्र ६९:२१ आंब दिली मार्क १५:२३, ३६
यशया ५३:५; भोसकले योहान १९:३४, ३७
यशया ५३:९ धनवानांसोबत दफन केले मत्तय २७:५७-६०
स्तोत्र १६:८-११तळटीप कुजण्याआधी पुनरुत्थान प्रेषितांची कृत्ये २:२५-३२; १३:३४-३७
[३५ पानांवरील चित्र]
देवाने येशूला आजाऱ्यांना बरे करण्याचे सामर्थ्य दिले