वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • “जे मागतात त्यांस” यहोवा पवित्र आत्मा देतो
    टेहळणी बुरूज—२००७ | जानेवारी १
    • ४ येशूने म्हटले: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ काही नाही; आणि तो आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नको; आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत; मी उठून तुला देऊ शकत नाही. मी तुम्हास सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्‍यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल.” मग येशूने हा दृष्टान्त प्रार्थनेशी कशाप्रकारे संबंधित आहे हे समजावून सांगितले. तो म्हणाला: “मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हास सापडेल; ठोका म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.”—लूक ११:५-१०.

  • “जे मागतात त्यांस” यहोवा पवित्र आत्मा देतो
    टेहळणी बुरूज—२००७ | जानेवारी १
    • ६. येशूच्या काळात, पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याविषयी लोकांचा कसा दृष्टिकोन होता?

      ६ येशूने केवळ पुन्हा पुन्हा व सतत प्रार्थना करावी इतकेच शिकवले नाही तर आपण का प्रार्थना करावी हे देखील त्याने स्पष्ट केले. आपल्याकडे आलेल्या पाहुण्याचा आतिथ्यसत्कार करण्याकरता मित्राकडे पुन्हा पुन्हा भाकरी मागणाऱ्‍या माणसाचा दृष्टान्त येशूने सांगितला तेव्हा तो ऐकणाऱ्‍या येशूच्या श्रोत्यांचा आतिथ्यसत्काराविषयी कसा दृष्टिकोन होता हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण यामुळे आपल्याला येशूने दिलेला धडा आणखी स्पष्टपणे समजून घेण्यास मदत होईल. शास्त्रवचनांतील बऱ्‍याच अहवालांवरून हे दिसून येते की बायबल लिहिण्यात आले होते त्या काळात, घरी आलेल्या पाहुण्याची चांगल्याप्रकारे काळजी घेणे ही एक अतिशय महत्त्वाची परंपरा होती. विशेषतः देवाच्या सेवकांमध्ये, पाहुण्यांच्या आदरसत्काराला विशेष महत्त्व दिले जाई. (उत्पत्ति १८:२-५; इब्री लोकांस १३:२) एखाद्याला पाहुण्यांचे आदरातिथ्य करता आले नाही तर ती लाजिरवाणी गोष्ट समजली जायची. (लूक ७:३६-३८, ४४-४६) हे लक्षात घेऊन, आता पुन्हा एकदा येशूने सांगितलेल्या गोष्टीकडे वळुया.

      ७. येशूच्या दृष्टान्तातला माणूस कशाचीही पर्वा न करता आपल्या मित्राला झोपेतून का उठवतो?

      ७ या दृष्टान्तातल्या माणसाच्या घरी मध्यरात्री एक पाहुणा येतो. तेव्हा साहजिकच त्या माणसाला आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचे आगतस्वागत करावेसे वाटते, पण ‘त्याला वाढावयास त्याच्याजवळ काही नसते.’ साहजिकच, तो काळजीत पडतो! कसेही करून, आलेल्या पाहुण्याच्या जेवणाची व्यवस्था त्याला करायची असते. त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. म्हणून तो आपल्या मित्राकडे जातो आणि कसलीही पर्वा न करता त्याला झोपेतून उठवतो. आपल्या मित्राला हाक मारीत तो म्हणतो, “मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे.” आणि त्या भाकरी मिळेपर्यंत तो पुन्हा पुन्हा विनवणी करत राहतो. शेवटी, भाकरी मिळाल्यावर त्याला हायसे होते, कारण आता तो आपल्या पाहुण्याचा व्यवस्थित आतिथ्यसत्कार करू शकतो.

      जितकी जास्त गरज—तितकी जास्त विनवणी

      ८. पवित्र आत्म्याकरता सतत प्रार्थना करत राहण्याकरता कोणती गोष्ट आपल्याला प्रवृत्त करेल?

      ८ या दृष्टान्तावरून आपण सतत प्रार्थना का करावी याचे कोणते कारण आपल्याला सापडते? तो माणूस भाकरी मागत राहिला कारण आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा आतिथ्यसत्कार करण्यासाठी त्याच्या मते, त्या भाकरी मिळवणे अत्यावश्‍यक होते. (यशया ५८:५-७) भाकरींशिवाय तो आपल्या पाहुण्याचा चांगल्यारितीने पाहुणचार करू शकत नव्हता. त्याचप्रकारे, खरे ख्रिस्ती या नात्याने आपले सेवाकार्य पार पाडण्याकरता देवाचा आत्मा अत्यावश्‍यक आहे याची आपल्याला जाणीव असल्यामुळे आपण देवाला सतत प्रार्थना करत राहतो आणि पुन्हा पुन्हा त्याच्या आत्म्याकरता विनवणी करत राहतो. (जखऱ्‍या ४:६) त्याच्या आत्म्याच्या साहाय्याशिवाय आपण आपले सेवाकार्य व्यवस्थित पार पाडू शकणार नाही. (मत्तय २६:४१) या दृष्टान्तावरून आपण कोणता महत्त्वाचा निष्कर्ष काढू शकतो हे तुमच्या लक्षात आले का? देवाच्या आत्म्याची आपल्याला अत्यंत गरज आहे असा जर आपला दृष्टिकोन असेल, तर आपोआपच आपण सतत, पुन्हा पुन्हा, त्याच्याकरता विनंती करत राहू.

      ९, १०. (क) देवाला आपण त्याच्या आत्म्याकरता वारंवार प्रार्थना का केली पाहिजे हे उदाहरण देऊन सांगा. (ख) आपण स्वतःला कोणता प्रश्‍न विचारावा व का?

      ९ हाच दृष्टान्त सध्याच्या परिस्थितीतल्या एखाद्या दृश्‍यात बसवून पाहायचे झाल्यास, अशी कल्पना करा की तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याची मध्यरात्री तब्येत बिघडली. तुम्ही मदतीकरता एखाद्या डॉक्टरला झोपेतून उठवाल का? जर रुग्णाची साधीशीच तक्रार असेल तर तुम्ही असे करणार नाही. पण समजा त्याला हृदयविकाराचा झटका आला असेल तर निश्‍चितच तुम्ही डॉक्टरला बोलवायला संकोचणार नाही. का? कारण ही आणीबाणीची परिस्थिती आहे. डॉक्टरची मदत मिळणे अत्यावश्‍यक आहे हे तुम्हाला माहीत आहे. जर तुम्ही मदत मागितली नाही तर रुग्णाचा जीव जाऊ शकतो. त्याचप्रकारे, खरे ख्रिस्ती सध्याच्या काळात एकार्थाने सतत आणीबाणीच्या परिस्थितीत जगत आहेत. सैतान “गर्जणाऱ्‍या सिंहासारखा” आपल्याला गिळंकृत करण्याकरता फिरत आहे. (१ पेत्र ५:८) आध्यात्मिकरित्या जिवंत राहण्याकरता देवाच्या आत्म्याचे साहाय्य अत्यावश्‍यक आहे. देवाच्या मदतीची विनंती न केल्यास आपल्याला आध्यात्मिक मृत्यू येऊ शकतो. म्हणूनच आपण कोणताही संकोच न बाळगता देवाकडे त्याचा पवित्र आत्मा देण्याची सतत विनंती करतो. (इफिसकर ३:१४-१६) असे केल्यानेच केवळ आपल्याला ‘शेवटपर्यंत टिकून राहण्याचे’ सामर्थ्य मिळू शकेल.—मत्तय १०:२२; २४:१३.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा