-
तो जिवंत नसला, तरी आज आपल्याशी बोलतोत्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा
-
-
५. हाबेल ‘जगाच्या स्थापनेच्या’ वेळी जगत होता असं येशूनं कोणत्या अर्थानं म्हटलं? (तळटीपही पाहा.)
५ हाबेलाचा जन्म मानव इतिहासाच्या अगदी सुरुवातीच्या काळात झाला होता. येशूनं हाबेलाविषयी म्हटलं, की तो ‘जगाच्या स्थापनेच्या’ वेळी जगत होता. (लूक ११:५०, ५१ वाचा.) इथं येशूनं ‘जग’ हा शब्द कोणत्या अर्थानं वापरला? तो पापापासून सुटका मिळण्यास योग्य असलेल्या मानवांच्या जगाविषयी बोलत होता. हाबेल हा सर्व मानवांमध्ये चौथा असला, तरी देवाच्या दृष्टीने तो पापापासून सुटका मिळवण्यास योग्य असलेला पहिलाच मानव होता.a साहजिकच, लहानाचा मोठा होत असताना हाबेलापुढं कोणाही मानवाचं चांगलं उदाहरण नव्हतं.
-
-
तो जिवंत नसला, तरी आज आपल्याशी बोलतोत्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा
-
-
a मूळ भाषेत, ‘जगाची स्थापना’ या शब्दांचा संबंध संतती उत्पन्न करण्याशी आहे. त्यामुळे हे शब्द सगळ्यात पहिल्या मानवी संततीला सूचित करतात. पण, आदाम आणि हव्वेचा पहिला मुलगा तर काइन होता. मग, येशूनं ‘जगाच्या स्थापनेचा’ संबंध हाबेलाशी का जोडला? कारण काइनानं त्याच्या निर्णयांद्वारे व कार्यांद्वारे यहोवा देवाविरुद्ध जाणूनबुजून बंड केलं. त्यामुळे त्याच्या आईवडिलांप्रमाणेच तोसुद्धा पापापासून सुटका मिळण्यास किंवा पुनरुत्थान होण्यास योग्य नाही असं म्हणता येईल.
-