वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • “जोराचा यत्न करा”
    टेहळणी बुरूज—१९८६ | नोव्हेंबर १
    • २. (अ) तारण प्राप्त करून का घेता येऊ शकत नाही? (ब) तारणासाठी काय करणे जरूरीचे आहे असे येशूचे लूक १३:२४ मधील शब्द सांगतात?

      २ सभेला उपस्थित राहून किंवा कोणा अन्य मार्गाद्वारे तारणाची प्राप्ती करता येऊ शकत नाही. ते मोफत असून देवाकडील देणगी आहे. तरीपण देवाकडील हे सार्वकाळच्या जीवनाचे बक्षीस मिळावयाचे आहे तर त्यासाठी तो आम्हाकडून काही हालचाल अपेक्षून आहे. (रोमकर ६:२३) ती काय आहे? यापैकीची एक आहे, त्याच्या सेवेतील जोराचा यत्न! ही हालचाल खऱ्‍या रसिकतेने उद्‌भवली पाहिजे. एका माणसाने एकदा देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताला विचारले: “प्रभुजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” येशूने आपल्या उत्तरात केवळ प्रश्‍नकर्त्याचा नव्हे तर तारणाविषयक आस्थेवाईक असणाऱ्‍या इतर सर्वांचा व आमचाही समावेश केला. त्याने म्हटले: अरूंद दरवाजाने आत जावयाला जोराचा यत्न करा. कारण मी तुम्हास सांगतो की, पुष्कळ लोक आत जावयास पाहतील परंतु त्यांच्याने आत जाववणार नाही.”—लूक १३:२३, २४.

      ३. (अ) त्या माणसाचा प्रश्‍न असाधारण का होता? (ब) येशूने त्याच्या उत्तरात आमचा सुद्धा कसा समावेश केला?

      ३ त्या निनावी माणसाचा प्रश्‍न असाधारण होता. त्याने ‘तारणप्राप्ती होत असलेल्या थोड्या लोकात मी आहे का?’ किंवा ‘माझे कसे तारण होईल’ असे न विचारता “तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” असे विचारले. कदाचित त्या माणसाला, केवळ थोड्या लोकांना तारण मिळणार असे यहुदी तत्वज्ञान माहीत असावे व यामुळेच कदाचित तो प्रश्‍न त्याने विचारला असावा.a या प्रश्‍नाचा उगम कसला असला तरी येशूने त्या प्रश्‍नाला तात्विक साच्यातून बाहेर काढून त्याविषयीचा व्यवहारिक अवलंब—व्यक्‍तीगत अवलंब स्पष्ट केला. त्याने प्रश्‍न विचारणाऱ्‍याला तारणाकरता त्याने स्वतः काय करणे जरूरीचे आहे त्याचा विचार करायला लावले. यापेक्षा अधिक म्हणजे, “जोराचा यत्न करा” हे येशूचे शब्द अनेकवचनी असल्यामुळे त्यांनी आम्हाला, आमच्या उपासनेच्या पद्धतीसंबंधाने गंभीर विचार करायला लावले पाहिजे.

  • “जोराचा यत्न करा”
    टेहळणी बुरूज—१९८६ | नोव्हेंबर १
    • a  किती जणांना तारणप्राप्ती होणार याविषयी रब्बीत फार मोठा तात्विक वाद होता. एक पवित्र शास्त्र सांदर्भिक पुस्तक म्हणते: “रब्बीत दिसणारा विचित्रपणा हा होता की ते या किंवा त्या वचनातील अक्षरांकरवी आकड्याच्या रूपात किती लोकांना तारणप्राप्ती होणार त्याची संख्या ठरवीत होते.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा