-
यहोवाचा आशीर्वाद समृद्धी देतोटेहळणी बुरूज—१९८७ | मे १
-
-
५. येशूने धनाढ्यतेविषयी कोणता दृष्टीकोण राखला?
५ धनाढ्यता केवढी जोखीम आणते त्याविषयी येशूने वेळावेळी बोलणी केली, कारण याचा धोका प्रत्येकाला, मग तो श्रीमंत असो वा नसो त्याला असतो. (मत्तय ६:२४–३२; लूक ६:२४; १२:१५–२१) स्वपरिक्षणाचा आधार ठरावा याकरता येशूने एके प्रसंगी जे म्हटले व जे मत्तय १९:१६–२४, मार्क १०:१७–३० व लूक १८:१८–३० मध्ये लिखित आहे त्याचा विचार करा. खरे म्हणजे थोडा वेळ थांबून या अहवालाचे वाचन का करू नये?
६, ७. (अ) येशू व एक तरुण मनुष्य यात कोणते संभाषण झाले? (ब) त्यानंतर येशूने कोणती सूचना दिली?
६ एका तरूण अधिकाऱ्याने येशूकडे येऊन विचारले: “काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” येशूने नियमशास्त्राकडे निर्देश करून हे स्पष्ट केले की जे काही जरूरीचे आहे ते सर्व काही यहोवाने सांगितलेच होते. तो तरूण उत्तरला की, “आपल्या तरूणपणापासून” तो ह्या गोष्टींचे पालने करीत आला होता. तो जणू जीवनप्राप्तीच्या दारापाशीच येऊन पोहचला होता, पण अद्याप आपणात कशाची तरी उणीव आहे हे त्याने हेरले असावे. त्याला वाटले असावे की आणखी एखादे सत्कृत्य वा कोणतीतरी महशूर कामगिरी ही त्याला सार्वकालिक जीवनाच्या दारातून प्रवेश मिळवून देईल. तथापि, येशूने दिलेल्या उत्तरात मोठा अर्थ ध्वनित होत होता. त्याने म्हटले: ‘तुझे असेलनसेल ते विकून गोरगरीबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल. आणि चल, माझ्यामागे ये.” तेव्हा काय घडले? “हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता [वा त्याचापाशी खूप सांपत्तिक ठेवा होता.]” यामुळेच तो निघून गेला.—लूक १८:१८, २१–२३; मार्क १०:२२.
-
-
यहोवाचा आशीर्वाद समृद्धी देतोटेहळणी बुरूज—१९८७ | मे १
-
-
८. (अ) तो तरूण अधिकारी कोणासारखा होता? (ब) त्याच्यामध्ये कोणता दोष होता व त्याबद्दल आम्हास चिंता का वाटावी?
८ तुम्हाला त्या तरूण अधिकाऱ्याच्या परिस्थितीची कल्पना करता येईल. याकरता तुम्ही स्वतःपुढे एका तरूण ख्रिश्चनाचे चित्र उभे करा, ज्याला चांगले पवित्र शास्त्रीय ज्ञान आहे, चांगली नीतीमत्ता आहे व तो श्रीमंत घराण्याचा आहे. अशा या व्यक्तिचा तुम्हाला हेवा वाटू लागेल. पण येशूला त्या तरूण यहुदी मनुष्याबद्दल मोठी उणीव आढळली होती: त्याची संपत्ती वा मालमत्ता ही त्याच्या जीवनात फारच मोलाची होती. याकारणास्तव येशूने वर असणारी सूचना दिली. याद्वारे तुम्हाला हे दिसेल की आम्ही धनवान वा गरीब असलो तरी हा पवित्र शास्त्रीय अहवाल आम्हा सर्वानाच का महत्वपूर्ण आहे. आमच्यापाशी संपत्ती असली किंवा ती आम्हास हवीशी वाटली तरी ही संपत्ती वा मालमत्ता आमच्याही जीवनात अति महत्वाच्या जागी येऊ शकते.
-