-
वाचकांचे प्रश्नटेहळणी बुरूज—१९८९ | फेब्रुवारी १
-
-
हे खरे की, देवाकडील क्षमा आणि सार्वकालिक जीवन, मग ते स्वर्गातील असो की नंदनवनमय पृथ्वीवरील असो, यासाठी येशूच्या यज्ञार्पणावर विश्वास ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे. हे ख्रिस्ताने योहान ६:५१-५४ मध्ये दाखवून दिलेः “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ वाचेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती [मानवजातीच्या उद्धरलेल्या] जगाच्या जीवनासाठी आहे. . . . जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे.”
येशूने हे भाषण आपल्या शिष्यांसमवेत आणखी इतरांना उद्देशून केले हे लक्षणीय आहे. हजारो जणांना अद्भुतरित्या भरविल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठा जमाव कफर्णहुमात येशूकडे आला. या समुदायासोबत संभाषण करताना येशूने योहान ६:५१-५४ मध्ये असणारे शब्द उद्गारले. अशाप्रकारे येशूने जेव्हा म्हटले की, तो ‘स्वर्गातून उतरलेली [लाक्षणिक] भाकर’ आहे आणि ही भाकर अरण्यात जो मान्ना लोकांनी खाल्ला त्यापेक्षा अधिक टिकाऊ जीवन प्रदान करु शकते, तेव्हा तो प्रामुख्यत्वे आपल्या शिष्यांसोबतच बोलत नव्हता.—योहान ६:२४-३४.
अरण्यातील त्या प्राचीन अनुभवाचा विचार करताना कोण कोण मिसरातून बाहेर पडून या अरण्यात आले होते ते विचारात घ्या. हे सहा लाख ‘इस्त्राएल लोक’ होते व यात मुलेबाळे वेगळीच होती व शिवाय “एक मोठा मिश्र समुदाय” देखील होता. हे सर्वजण पायीच आले. (निर्गम १२:३७, ३८; १६:१३-१८) या ‘मिश्र समुदायात’ असे मिसरी होते ज्यांनी इस्त्राएलांशी विवाह संपादिले होते आणि बाकीच्या इतर मिसऱ्यांनी आपणाला इस्त्राएलांसोबत राखले होते. अरण्यात जिवंत राहण्यासाठी इस्त्राएल लोक आणि “मिश्र समुदाय” या दोघांनाही मान्न्याची जरुरी होती. पण, “मिश्र समुदाया”ला इस्त्राएलांसारखेच हक्क होते का? नाही, त्यांना ते नव्हते. त्यांना इस्त्राएलांसोबत भक्ती करण्याची मुभा होती व शिवाय वचनयुक्त देशात प्रवेश मिळविण्याची आशा होती, तरी ते नियमशास्त्रानुसार राजे आणि याजक कधीच बनू शकत नव्हते. अशाप्रकारे खरोखरीचा मान्ना खाण्यामुळे प्रत्येकाला सारखेच हक्क मिळाले नाहीत.
-
-
वाचकांचे प्रश्नटेहळणी बुरूज—१९८९ | फेब्रुवारी १
-
-
देवाच्या राज्य अधिपत्याखाली पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा राखणाऱ्या आजच्या सर्व ख्रिश्चनांना हे माहीत आहे की येशूच्या यज्ञार्पणावर विश्वास प्रदर्शित केल्यामुळे याची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. येशूने समुदायाला म्हटलेच होते की तो “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर” होता. (योहान ६:५१) तथापि, पृथ्वीवर राहण्याची आशा जोपासणाऱ्यांनी खरोखरीच्या स्मारक बोधचिन्हात सहभागिता घेतली पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही, कारण हे “नवा करार” आणि येशूबरोबर ‘त्याच्या राज्यात राजासनावर बसण्याच्या’ करारात नाहीत.
-