वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • “त्याची वेळ तोवर आली नव्हती”
    टेहळणी बुरूज—२००० | सप्टेंबर १५
    • १७. (अ) पेरियामध्ये असताना येशूला कोणती बातमी मिळते? (ब) आपल्याला केव्हा काय करायचे आहे हे येशूला ठाऊक होते असे आपण का म्हणू शकतो?

      १७ लाजर आजारी असल्याचा निरोप लाजरच्या बहिणी मरीया आणि मार्था यांनी येशूला पाठवलेला असतो. लाजर आणि त्याच्या बहिणी यहुदियातील बेथानी या नगरात राहतात. लाजरच्या आजाराची बातमी घेऊन येणारा म्हणतो: “प्रभुजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.” ते ऐकून येशू म्हणतो, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्यायोगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे ह्‍यासाठी आहे.” त्यामुळे येशू दोन-तीन दिवस मुद्दाम परियामध्येच राहतो. मग तो आपल्या शिष्यांना म्हणतो: “आपण पुन्हा यहूदीयात जाऊ या.” पण, शिष्य गोंधळात पडतात आणि साशंकपणे त्याला विचारतात: “गुरुजी, यहूदी नुकतेच तुम्हाला दगडमार करावयास पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय?” पण, येशूला या गोष्टीची पूर्ण कल्पना असते की त्याच्याकडे फार कमी वेळ, किंबहुना फक्‍त काही ‘दिवस’ उरले आहेत. आणि उरलेल्या या वेळात आपल्याला काय करायचे आहे आणि ते कशाला करायचे आहे हे देखील त्याला ठाऊक असते.—योहान ११:१-१०.

  • “त्याची वेळ तोवर आली नव्हती”
    टेहळणी बुरूज—२००० | सप्टेंबर १५
    • २१. लाजरचे पुनरुत्थान केल्यानंतर येशूच्या जीवनाला नवे वळण मिळते असे का म्हणता येईल?

      २१ बेथानीला पोहंचण्यास उशीर केल्यामुळेच येशू तिथे असा एक चमत्कार करू शकतो जो सगळ्यांनाच मान्य करावा लागतो. देवाच्या शक्‍तीने तो अशा एका व्यक्‍तीला जिवंत करतो ज्याला मरून चार दिवस झाले आहेत! त्या प्रतिष्ठित यहुदी उच्च न्यायालयालाही हा चमत्कार मान्य करावा लागतो. त्यामुळे ते भयंकर क्रोधित होतात; इतके की ते त्याच्यावर मरणदंडाची शिक्षा ठोठावतात. अशाप्रकारे या चमत्कारानंतर येशूच्या जीवनाला एक नवे वळण मिळते कारण आता त्याची “वेळ आली” आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा