-
देवाला कोणत्या प्रकारची उपासना आवडते?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
१. आपली उपासना कशावर आधारित असली पाहिजे?
एकदा येशू प्रार्थनेत देवाला म्हणाला, “तुझं वचन सत्य आहे.” म्हणून आपली उपासना बायबलवर आधारित असली पाहिजे. (योहान १७:१७) देवाचं वचन बायबल हे त्याच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे आणि त्यात सत्य सांगितलं आहे. काही धर्म या सत्याकडे दुर्लक्ष करून मानवांचे विचार आणि परंपरा लोकांना शिकवतात. पण जे अशा प्रकारे देवाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करतात त्यांची उपासना त्याला आवडत नाही. (मार्क ७:९ वाचा.) याउलट, आपण जेव्हा बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याची उपासना करतो आणि त्याच्या सल्ल्यांप्रमाणे वागतो, तेव्हा त्याला आनंद होतो.
-
-
यहोवाचे साक्षीदार खरे ख्रिस्ती आहेत का?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
१. यहोवाच्या साक्षीदारांचे विश्वास कशावर आधारित आहेत?
येशू म्हणाला होता: “[देवाचं] वचन सत्य आहे.” (योहान १७:१७) येशूप्रमाणेच यहोवाचे साक्षीदारसुद्धा जे काही मानतात ते देवाच्या वचनावर आधारित असतं. साक्षीदारांच्या अलीकडच्या काळातल्या इतिहासाचा जरा विचार करा. एकोणीसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी काही बायबल विद्यार्थ्यांनी सोबत मिळून बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांना बायबलमधून जे सत्य समजलं ते त्यांनी मनापासून स्वीकारलं. काही गोष्टी चर्चमध्ये अगदी वेगळ्या शिकवल्या जात होत्या, पण तरीही त्यांनी बायबलमध्ये जे सांगितलंय त्यावरच भरवसा ठेवला. आणि मग त्यांनी हे सत्य इतरांनाही सांगायला सुरुवात केली.a
-