-
“आनंदाने आणि पवित्र शक्तीने भरून गेले”देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
-
-
७ बर्येशू हा राज्याच्या संदेशाचा विरोधक होता. याचं कारण म्हणजे, तो राज्यपाल सिर्ग्य पौल याचा सल्लागार होता आणि त्याचा हा मोठा हुद्दा टिकवून ठेवण्याचा फक्त एकच मार्ग होता. तो म्हणजे, सिर्ग्य पौल याला “प्रभूवर विश्वास” ठेवण्यापासून रोखणं. (प्रे. कार्यं १३:८) म्हणून तो सिर्ग्य पौल याचं राज्याच्या संदेशावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत होता. पण शौलही शांत बसणार नव्हता. मग त्याने काय केलं? अहवालात म्हटलं आहे, “शौल ज्याला पौल असंही म्हटलं जातं, तो पवित्र शक्तीने भरून गेला. त्याने अलीम जादूगाराकडे रोखून पाहिलं आणि तो म्हणाला: ‘अरे सर्व प्रकारच्या कपटाने आणि सर्व प्रकारच्या लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या मुला, सर्व नीतिमत्त्वाच्या वैऱ्या, तू यहोवाच्या सरळ मार्गांचा विरोध करायचं सोडून देणार नाहीस का? पाहा! यहोवाचा हात तुझ्याविरुद्ध उठलाय. तू आंधळा होशील आणि काही काळापर्यंत तुला सूर्यप्रकाश दिसणार नाही.’ इतक्यात त्याच्या डोळ्यांसमोर दाट धुकं आणि अंधार पसरला आणि कोणीतरी आपल्याला हात धरून न्यावं म्हणून तो चाचपडत फिरू लागला.”f या चमत्काराचा परिणाम काय झाला? “जे काही घडलं होतं ते पाहून राज्यपालाने प्रभूवर विश्वास ठेवला. कारण यहोवाबद्दलच्या शिकवणीने तो थक्क झाला होता.”—प्रे. कार्यं १३:९-१२.
-
-
“आनंदाने आणि पवित्र शक्तीने भरून गेले”देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
-
-
f यापुढे शौल याचा पौल असा उल्लेख करण्यात आला आहे. काहींचं असं म्हणणं आहे, की त्याने सिर्ग्य पौल याचा सन्मान म्हणून पौल हे नाव स्वीकारलं. पण त्याने कुप्र सोडल्यावरही पौल हेच नाव वापरलं, यावरून असं दिसतं की यामागे वेगळं कारण असावं. आपल्याला “प्रेषित म्हणून विदेशी लोकांकडे पाठवण्यात” आलं आहे हे माहीत असल्यामुळे, त्याने पुढेही पौल हे रोमन नाव वापरण्याचं ठरवलं असेल. त्याने पौल हे नाव वापरण्यामागे आणखी एक कारण असावं. त्याच्या शौल या हिब्रू नावाचा ग्रीक उच्चार, वाईट अर्थ असलेल्या एका ग्रीक शब्दासारखा आहे.—रोम. ११:१३.
-