नोव्हेंबर—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
५-११ नोव्हेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|योहान २०-२१
“तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?”
nwtsty अभ्यासासाठी माहिती-योह २१:१५, १७
येशू शिमोन पेत्रला म्हणाला: पेत्रने येशूला तीन वेळा नाकारलं, त्याच्या काही वेळानंतरच येशू आणि पेत्रमध्ये हे संभाषण झालं. आपल्याबद्दल पेत्रच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी येशूने त्याला तीन प्रश्न विचारले. या प्रश्नांमुळे “पेत्र दुःखी” झाला. (योह २१:१७) योह २१:१५-१७ मध्ये दिलेल्या अहवालात दोन ग्रीक क्रियापदांचा, म्हणजे अगापे आणि फिलिया यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मराठीमध्ये या दोन्ही शब्दांसाठी प्रेम असं भाषांतर करण्यात आलं आहे. तीन वेळा येशूने पेत्रला विचारलं: “तू माझ्यावर प्रेम करतोस का?” प्रत्येक वेळी पेत्रने त्याचं येशूवर मनापासून प्रेम आहे असं सांगितलं. येशूची इच्छा होती की यामुळे पेत्रने प्रेरीत होऊन येशूच्या “लहान मेंढरांची” “काळजी” घ्यावी आणि त्यांना अन्न पुरवावं. (योह २१:१६, १७; १पेत्र ५:१-३) येशूने पेत्रला तीन वेळा त्याचं प्रेम व्यक्त करण्याची संधी दिली आणि त्यानंतर त्याने पेत्रवर मेंढरांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली. असं केल्यामुळे, येशूने स्पष्टपणे दाखवून दिलं की पेत्रने केलेल्या चुकीसाठी येशूने त्याला मनापासून माफ केलं आहे.
तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?: मूळ भाषेतील व्याकरण लक्षात घेता ‘यांच्यापेक्षा जास्त’ या शब्दांचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. काही विद्वान याचा अर्थ पुढीलप्रमाणे सांगतात, “तू इतर शिष्यांवर जितकं प्रेम करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम माझ्यावर करतो का?” किंवा “तू माझ्यावर या शिष्यांपेक्षा जास्त प्रेम करतो का?” पण या शब्दांचा खरा अर्थ “तू या गोष्टींपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतो का?” असा होऊ शकतो. ‘या गोष्टी’ पेत्रने पकडलेल्या माशांना आणि मासेमारीशी संबंधी इतर गोष्टींना लागू होऊ शकतात. त्यामुळे या वचनाचा एकंदरीत अर्थ, ‘तू भौतिक गोष्टींपेक्षा किंवा त्या मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतो का? करत असशील तर माझ्या मेंढरांना चार,’ असा आहे. पेत्रचं आधीचं जीवन लक्षात घेता येशूने विचारलेला प्रश्न योग्य होता असं दिसतं. हे खरं आहे की पेत्र येशूच्या सुरुवातीच्या शिष्यांपैकी एक होता, (योह १:३५-४२) पण तो लगेच आपलं सर्व काम सोडून येशूच्या मागे गेला नाही. याउलट, तो काही काळाने आपल्या मासेमारीच्या कामात परतला. काही महिन्यांनंतर येशूने पेत्रला त्याच्या मोठ्या व्यवसायातून बाहेर येण्यास सांगितलं आणि “माणसे धरणारा” बनवलं. (मत्त ४:१८-२०; लूक ५:१-११) पण येशूच्या मृत्यूच्या काही वेळानंतरच पेत्रने इतरांना सांगितलं की तो मासेमारीच्या व्यवसायात परत जात आहे आणि काही शिष्यही त्याच्यासोबत गेले. (योह २१:२, ३) या सर्व गोष्टींचा विचार केला तेव्हा आपल्याला कळतं की या वचनात येशू समोर असलेल्या माशांकडे पेत्रचं लक्ष वेधून त्याला निर्णायक निवड करायला सांगत आहे. ती निवड म्हणजे, तो आपल्या मासेमारीच्या व्यवसायाला जीवनात पहिल्या स्थानी ठेवणार, की येशूच्या मेंढरांना आध्यात्मिक अन्न पुरवण्याच्या कामाला.—योह २१:४-८.
तिसऱ्यांदा: पेत्रने आपल्या प्रभूला तीन वेळा नाकारलं होतं. या प्रसंगी येशूने पेत्रला तीन वेळा आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली. पेत्रने आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर येशूने त्याला आध्यात्मिक गोष्टींना जीवनात सर्वात जास्त महत्त्व देण्याद्वारे त्याचं प्रेम व्यक्त करायला सांगितलं. पेत्रला इतर जबाबदार बांधवांसोबत मिळून येशूच्या विश्वासू अनुयायांना आध्यात्मिक अन्न पुरवायचं होतं, त्यांना विश्वासात मजबूत करायचं होतं आणि त्यांची काळजी घ्यायची होती. हे सर्व अनुयायी अभिषिक्त असले तरीही त्यांना आध्यात्मिक अन्नाची गरज होती.—लूक २२:३२.
आध्यात्मिक रत्नं शोधा
nwtsty अभ्यासासाठी माहिती-योह २०:१७
मला बिलगू नकोस: इथे वापरण्यात आलेले ग्रीक क्रियापद हॅपटोमाइ याचा अर्थ “स्पर्श करणं” किंवा “बिलगणं; धरून राहणं” असा होऊ शकतो. या शब्दांसाठी काही भाषांतरांमध्ये “मला स्पर्श करू नकोस” असं म्हटलं आहे. पण मग्दालीया मरीयाने येशूला स्पर्श केल्यामुळे तो हे शब्द बोलला नाही. कारण एका प्रसंगी जेव्हा येशूचं पुनरुत्थान झाल्यावर इतर स्त्रियांनी त्याला पाहून “त्याचे पाय धरले,” तेव्हा त्याने त्यावर आक्षेप घेतला नाही. (मत्त २८:९) मग्दालीया मरीयाला कदाचित अशी भीती होती की येशू आता स्वर्गात जाणार. येशूसोबत राहण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे ती येशूला बिलगत होती. तिला त्याला जाऊ द्यायचं नव्हतं. पण तो आताच स्वर्गात जाणार नाही याची खातरी करून देण्यासाठी, येशूने तिला ‘मला बिलगू नकोस’ असं म्हटलं आणि तिला सांगितलं की तिने जाऊन त्याच्या पुनरुत्थानाबद्दल इतर शिष्यांना सांगावं.
nwtsty अभ्यासासाठी माहिती-योह २०:२८
माझ्या प्रभू, माझ्या देवा!: काही विद्वानांच्या मते हे शब्द आश्चर्याचे उद्गार आहेत आणि ते येशूला उद्देशून असले तरी, ते मुळात त्याच्या पित्यासाठी, देवासाठी आहेत. इतर विद्वान दावा करतात की मूळ ग्रीक शब्द लक्षात घेता हे शब्द येशूलाच उद्देशून आहेत. असं असलं तरीही, “माझ्या प्रभू, माझ्या देवा!” या शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला शास्त्रवचनांतील त्यांचा संदर्भ समजून घेणं गरजेचं आहे. या वचनाचा संदर्भ बघता, येशूने शिष्यांना असा निरोप पाठवला होता, की “जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.” यामुळे थोमाने असा विचार मुळीच केला नसेल की येशू हा सर्वसमर्थ देव आहे. थोमाने येशूला, आपल्या “पित्याला” प्रार्थना करताना ‘एकच खरा देव’ असा उल्लेख करताना ऐकलं होतं. (योह १७:१-३) यामुळे थोमाने येशूला “माझ्या देवा” असं पुढील कारणांमुळे संबोधलं असेल: कदाचित तो येशूला ‘देव’ मानायचा, पण ‘सर्वसमर्थ देव’ नाही. किंवा कदाचित इब्री शास्त्रवचनांत यहोवाच्या विश्वासू सेवकांनी देवाच्या दूतांना जसं संबोधलं, तसं तो येशूला संबोधत असावा. थोमा बायबलमधील अशा अहवालांशी नक्कीच परिचित असावा जिथे एका व्यक्तीने, किंवा काही वेळा बायबल लेखकाने, देवाचा संदेश सांगणाऱ्या स्वर्गदूतांना जणू ते यहोवा देव आहेत असं संबोधलं होतं. (उत्प १६:७-११, १३; १८:१-५, २२-३३; ३२:२४-३०; शास ६:११-१५; १३:२०-२२ पडताळून पाहा.) या कारणांमुळे आपण असं म्हणू शकतो की जेव्हा थोमाने येशूला “माझ्या देवा” असं म्हटलं, तेव्हा तो येशूला खऱ्या देवाचा प्रतिनिधी आणि संदेश सांगणारा म्हणून संबोधत होता.
१२-१८ नोव्हेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|प्रेषितांची कार्ये १-३
“ख्रिस्ती मंडळीवर पवित्र आत्मा ओतण्यात आला”
टेहळणी बुरूज८७ ९/१ पृ. २८ परि. ४-५, ७
अंतःकरण आनंदी बनविणारे अनुदान
इ.स. ३३ मध्ये ख्रिस्ती मंडळीचा जन्म झाला त्या पहिल्याच दिवशी ३,००० नवीन बाप्तिस्मा पावलेल्या धर्मपरिवर्तीत लोकांनी ‘एकमेकांसोबत सहभागीपणा, भाकर मोडणे, व प्रार्थना’ ह्या गोष्टी आचरणात आणल्या. ते कोणत्या चांगल्या कारणासाठी? प्रेषितांच्या शिक्षणात तत्पर राहून त्यांच्या नवीन विश्वासास आधार देण्यासाठी.—प्रे. कृत्ये २:४१, ४२.
पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत थांबण्याच्या विचाराने यहूदी व धर्मपरिवर्तित यरूशलेमेत राहाण्यास आले होते. परंतु जे ख्रिस्ती बनले त्यांची, अधिक काळ राहून त्यांचा नवा विश्वास मजबूत करण्याची इच्छा झाली. ह्यामुळे अन्न व राहण्याची तातडीची समस्या निर्माण झाली. काही पाहुण्या मंडळीकडे पुरेसा पैसा नव्हता तर काहींकडे अधिक होता. म्हणून तात्पुरते भौतिक गोष्टींचे एकत्रीकरण केले गेले व ज्यांना आवश्यकता आहे अशांना त्यांचे वाटप करण्यात आले.—प्रे. कृत्ये २:४३-४७.
खरोखरच्या मालमत्तेची विक्री व सर्व गोष्टीचे समान वाटप हे केवळ स्वयं स्फूर्तीनेच होत असे. कोणालाही विक्री करण्यास व दान करण्यास भाग पाडले जात नव्हते, ना की दारिद्रयाची वाढ करावी असा त्यात हेतू होता. ह्या ठिकाणी जी कल्पना व्यक्त केली ती ही नव्हती की श्रीमंत सदस्यांनी सर्व मालमत्ता विकली व अशा प्रकारे दरिद्री झाले. परंतु त्या वेळेच्या परिस्थितितील समाविश्वासूंच्या दयेखातर त्यांनी मालमत्ता विकली व ते मोल राज्य आस्था वाढविण्यास ज्याची गरज होती ती भागविण्यास अनुदान दिले.—पडताळा २ करिंथ. ८:१२-१५.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ पृ. ६१ परि. १
येशू ख्रिस्त
“जीवन देणारा मुख्य प्रतिनिधी.” आपल्या पित्याची मानवजातीवर असलेली अपार दया दाखवण्यासाठी ख्रिस्त येशूने त्याचं परिपूर्ण जीवन बलिदान म्हणून अर्पण केलं. यामुळे ख्रिस्ताच्या निवडलेल्या अनुयायांना त्याच्यासोबत स्वर्गात एकत्र मिळून राज्य करणं शक्य झालं. तसंच, त्याच्या राज्यामध्ये पृथ्वीवरील प्रजेशी संबंधित व्यवस्था करणंही शक्य झालं. (मत्त ६:१०; योह ३:१६; इफि १:७; इब्री २:५; खंडणी पाहा.) यामुळे तो संपूर्ण मानवजातीसाठी “जीवन देणारा मुख्य प्रतिनिधी” बनला. (प्रेका ३:१५) इथे जो ग्रीक शब्द वापरण्यात आला आहे त्याचा मूळ अर्थ “प्रमुख नेता” असा होतो. हा शब्द, इस्राएलमध्ये मोशेला (प्रेका ७:२७, ३५) “अधिकारी” बोललं जायचं त्याच्याशी संबंधित आहे.
यहोवा के करीब अध्या. २६ परि. १४
परमेश्वर जो “क्षमा करने को तत्पर” रहता है
१४ यहोवा की माफी के बारे में प्रेरितों ३:१९ में और ज़्यादा बताया गया है: “मन फिराओ और लौट आओ कि तुम्हारे पाप मिटाए जाए।” (तिरछे टाइप हमारे।) इस आयत के ये आखिरी शब्द एक ऐसी यूनानी क्रिया का अनुवाद हैं, जिसका मतलब “पोंछ देना, . . . रद्द या नष्ट, करना” हो सकता है। कुछ विद्वानों के मुताबिक, यहाँ जो तसवीर पेश की गयी है, वह है किसी की लिखावट को मिटाना। यह कैसे मुमकिन था? प्राचीनकाल में जो स्याही आम तौर पर इस्तेमाल होती थी, वह कोयले, गोंद और पानी का मिश्रण होती थी। ऐसी स्याही से लिखने के फौरन बाद, एक इंसान चाहे तो उस लिखाई को गीले स्पंज से मिटा सकता था। यह, यहोवा की दया की एक बढ़िया तसवीर पेश करता है। जब वह हमारे पाप माफ करता है, तो मानो वह स्पंज लेकर इन्हें पूरी तरह मिटा देता है।
सेवाकार्यासाठी तयार व्हा
इन्साइट-१ पृ. १२९ परि. २-३
यहूदा इस्कर्योतने येशूसोबत विश्वासघात केला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर फक्त ११ प्रेषित उरले होते. येशूच्या पुनरुत्थानापासून ते त्याच्या स्वर्गात जाण्यापर्यंतच्या ४० दिवसांत त्याने कोणालाही यहूदाच्या जागी नेमलं नाही. येशू स्वर्गात गेला त्याच्या १० दिवसानंतर पेन्टेकॉस्टचा दिवस आला. या १० दिवसांदरम्यान, असं समजलं गेलं की यहूदाच्या ठिकाणी दुसऱ्याला प्रेषित म्हणून नेमणं गरजेचं आहे. हे यहूदाचा मृत्यू झाला म्हणून करण्यात आलं नाही, तर त्याने येशूचा विश्वासघात केला म्हणून करण्यात आलं. पेत्रने ज्या वचनांचा संदर्भ दिला त्यावरून आपण असं म्हणू शकतो. (प्रेका १:१५-२२; स्तो ६९:२५; १०९:८; प्रक ३:११ पडताळून पाहा.) याच्या अगदी उलट जेव्हा विश्वासू शिष्य याकोबला मारण्यात आलं, तेव्हा त्याच्या जागी दुसऱ्याला प्रेषित म्हणून नेमण्याबद्दल चर्चा झाली असा उल्लेख कुठेच आढळत नाही.—प्रेका १२:२.
पेत्रच्या शब्दांवरून येशूचा प्रेषित बनण्यासाठी कोणत्या पात्रता असणं गरजेचं आहे ते स्पष्ट होतं. जी व्यक्ती येशूशी चांगली परिचित आहे, त्याच्या संपर्कात आहे, तिने त्याचे काम, त्याचे चमत्कार आणि खासकरून त्याचं पुनरुत्थान प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं आहे तीच व्यक्ती येशूचा प्रेषित बनण्याच्या पात्रतेची असणार होती. या पात्रता लक्षात घेता काही वर्षांनी असं कोणीच उरलं नसतं जी या पात्रता पूर्ण करू शकेल. अर्थात जर स्वतः देवाने त्या व्यक्तीच्या निवडीबद्दल स्पष्ट माहिती दिली असती तर हे शक्य झालं असतं. पेन्टेकॉस्टच्या दिवसाच्या आधीच्या काळात असे लोक होते जे ही पात्रता पूर्ण करत होते. त्यामुळे अविश्वासू असलेल्या यहूदाच्या जागी दोन जणांची प्रेषित म्हणून शिफारस करण्यात आली. नीतिसूत्रे १६:३३ या वचनातील तत्त्व लक्षात घेऊनच त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि मत्थियाच्या नावाची चिठ्ठी निघाली. अशा प्रकारे “अकरा जणांसोबत त्याचाही प्रेषितांमध्ये समावेश करण्यात आला.” (प्रेका १:२३-२६) नंतर ग्रीक भाषा बोलणाऱ्यांमध्ये जेव्हा समस्या उद्भवली तेव्हा ती सोडवण्यात “बारा” प्रेषितांनी सहभाग घेतला होता आणि त्यात मत्थियाचाही समावेश होता. (प्रेका ६:१, २) तसंच, १ करिंथकर १५:४-८ मध्ये पौलने उल्लेख केल्याप्रमाणे येशू १२ जणांना दिसला. त्या बारा जणांमध्ये मत्थियाचाही समावेश होता. नंतर जेव्हा पेन्टेकॉस्टचा दिवस उजाडला तेव्हा आध्यात्मिक इस्राएल ज्यावर उभारली जाणार होती त्याचे १२ पाये तिथे होते.
१९-२५ नोव्हेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं| प्रेषितांची कार्ये ४-५
“ते देवाचं वचन धैर्याने सांगत राहिले”
टेहळणी बुरूज०८-E ९/१ पृ. १५ वरील चौकट
बोली भाषेतल्या शब्दांपासून ते पवित्र शब्दांपर्यंत—लिखाण आणि आरंभीचे ख्रिस्ती
प्रेषित निरक्षर होते का?
जेव्हा यरुशलेममधल्या अधिकाऱ्यांनी व वडिलांनी “पेत्र व योहान किती धैर्याने बोलत आहेत हे त्यांनी पाहिले, आणि खरेतर ते अशिक्षित व साधारण आहेत हे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले.” (प्रेका ४:१३) प्रेषित खरोखर निरक्षर किंवा अज्ञानी होते का? अधिकाऱ्यांच्या व वडिलांच्या या वाक्याबद्दल द न्यू इंटरप्रीटर्स बायबल यामध्ये असं म्हटलं आहे: “या शब्दांचा असा अर्थ घेणं चुकीचं ठरेल की पेत्र [आणि योहान] अडाणी होते आणि त्यांना वाचता-लिहिता येत नव्हतं. हे शब्द फक्त न्याय करणाऱ्यांच्या आणि प्रेषितांच्या समाजातल्या स्थानात असलेला मोठा फरक सांगण्यासाठी म्हटले गेले होते.”
टेहळणी बुरूज०८ ५/१५ पृ. ३० परि. ६
प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील ठळक मुद्दे
४:१३—पेत्र व योहान निरक्षर व अज्ञानी होते असे लोकांनी का म्हटले? कारण धार्मिक शिक्षण मिळण्याकरता पेत्राने व योहानाने रब्बींच्या शाळेत शिक्षण घेतले नव्हते.
इन्साइट-१ पृ. १२८ परि. ३
प्रेषित
ख्रिस्ती मंडळीतल्या घडामोडी. पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रेषितांवर पवित्र आत्मा ओतण्यात आल्यामुळे त्यांचा विश्वास मजबूत झाला. प्रेषितांची कार्ये पुस्तकाच्या पहिल्या पाच अध्यायांवरून आपल्याला याचा पुरावा मिळतो. प्रेषितांना जरी तुरुंगात टाकण्यात आलं, मारहाण करण्यात आली आणि अधिकाऱ्यांकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्या, तरी त्यांनी निर्भयपणे आणि धैर्याने आनंदाच्या संदेशाबद्दल व येशूच्या पुनरुत्थानाबद्दल साक्ष दिली. पेन्टेकॉस्ट नंतरच्या काळात पवित्र आत्म्याच्या मदतीने प्रेषितांनी ज्या प्रकारे नेतृत्व केलं त्यामुळे ख्रिस्ती मंडळीत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. (प्रेका २:४१; ४:४) सुरुवातीला त्यांचं सेवाकार्य फक्त यरुशलेमपुरतं सीमित होतं. पण नंतर ते शोमरोनापर्यंत आणि पुढे चालून त्या काळातील जवळजवळ सर्व लोकांपर्यंत पसरलं.—प्रेका ५:४२; ६:७; ८:५-१७, २५; १:८.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ५१४ परि. ४
कोनशिला
स्तोत्र ११८:२२ आपल्याला सांगतं की बांधणाऱ्यांनी नाकारलेला दगड, हा “कोनशिला” बनेल. (हिब्रू शब्द, रोश पिनाह) येशूने या भविष्यवाणीचा उल्लेख करून ती स्वतःवर लागू केली. त्याने म्हटलं की तो “कोपऱ्याचा मुख्य दगड बनला आहे.” (ग्रीक शब्द, केफॅले गोनियास) (मत्त २१:४२; मार्क १२:१०, ११; लूक २०:१७) जसं इमारतीचा सर्वात वरचा दगड कोणापासूनही लपून राहत नाही, तसंच येशू ख्रिस्त हा अभिषिक्त ख्रिश्चनांनी बनलेल्या मंडळीचा मुख्य दगड आहे. इथे मंडळीची तुलना आध्यात्मिक मंदिराशी करण्यात आली आहे. पेत्रनेही स्तोत्र ११८:२२ मधील शब्द ख्रिस्तावर लागू केले. त्याने म्हटलं की तो माणसांनी नाकारलेला “दगड” होता, पण देवाने त्याला “कोनशिला” बनण्यासाठी निवडलं.—प्रेका ४:८-१२; १पेत्र २:४-७ पाहा.