वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • आपल्या विश्‍वासाचे समर्थन करणे
    टेहळणी बुरूज—१९९८ | डिसेंबर १
    • १२. कोणत्या परिस्थितीमुळे पौल आणि बर्णबा इकुन्यात धैर्याने बोलण्यास प्रवृत्त झाले?

      १२ पौल आणि बर्णबाच्या उदाहरणाचा देखील विचार करा. प्रेषितांची कृत्ये १४:१, २ म्हणते: “इकुन्यात यहूदी लोकांच्या सभास्थानात ते दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले, की यहूदी व हेल्लेणी ह्‍यांच्या मोठ्या लोकसमुदायाने विश्‍वास ठेवला; परंतु विरोधी यहूद्यांनी परराष्ट्रीयांचे मन बंधुजनांविरुद्ध चेतवून कलुषित केले.” पंडिता रमाबाई भाषांतरात असे म्हटले आहे: “परंतु जे यहुदी अविश्‍वासी होते त्यांनी राष्ट्रांच्या लोकांची मने भावांविरुद्ध चेतवून बिघडविली.” स्वतः संदेश नाकारून ते शांत बसले नाहीत तर, ख्रिश्‍चनांवर काळीमा फासण्याची मोहीमच त्यांनी हाती घेतली; विदेशी लोकांची मने ख्रिश्‍चनांविरुद्ध कलुषित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.a म्हणजे त्यांना ख्रिस्ती धर्माविषयी किती द्वेष होता! (पडताळा प्रेषितांची कृत्ये १०:२८.) हा समय, पौल आणि बर्णबा यांना, या जाहीर निंदेमुळे नवीन शिष्यगण निराश होऊ नये म्हणून “बोलण्याचा समय” आहे असे वाटले. यास्तव, अद्‌भुत कृत्ये दाखवण्याकरता त्यांना साहाय्य करण्याद्वारे आपली स्वीकृती दाखवणाऱ्‍या ‘प्रभूविषयी निर्भीडपणे बोलत [पौल आणि बर्णबा] बरेच दिवस तेथे राहिले.’ याचा परिणाम असा झाला की काहींनी “यहूद्यांची बाजू धरली तर कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली.”—प्रेषितांची कृत्ये १४:३, ४.

  • आपल्या विश्‍वासाचे समर्थन करणे
    टेहळणी बुरूज—१९९८ | डिसेंबर १
    • a मॅथ्यू हेन्रीज कॉमेंट्री ऑन द होल बायबल स्पष्टीकरण देते, की यहुदी विरोधक, “थोडीफार ओळख असलेल्या अशांकडे [विदेशी लोकांकडे] मुद्दामहून गेले व त्यांना जितक्या दुष्ट चहाड्या सुचत गेल्या त्या सर्व त्यांना सांगत राहिले आणि ख्रिस्ती धर्माविषयी त्यांच्या मनात विष कालवले.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा