-
रक्त–जीवनासाठी अत्यावश्यकरक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
-
-
येशूच्या मृत्युच्या अनेक वर्षांनी, ख्रिस्ती बनणाऱ्या माणसाने इस्राएलांचे सर्व नियम पाळलेच पाहिजेत किंवा नाही याबद्दल प्रश्न उभा राहिला असताना जे घडले त्याकडे लक्ष द्या. प्रेषितांचा समावेश असलेल्या शासकीय नियमन मंडळाच्या कार्यकारी समितीमध्ये त्याची चर्चा झाली. येशूचा सावत्र भाऊ याकोब याने रक्ताबद्दल नोहा व इस्राएल राष्ट्राला दिलेल्या देवाच्या नियमांचा अंतर्भाव असलेल्या ग्रंथांचा उल्लेख केला. ते ख्रिस्ती लोकांवर बंधनकारक असणार का?—प्रे. कृत्ये १५:१-२१.
त्या कार्यकारी समितीने त्यांचा निर्णय सर्व मंडळ्यांना पाठवलाः ख्रिस्ती लोकांनी मोशेला दिलेले नियमशास्त्र पाळण्याची गरज नाही, पण “मूर्तीला अर्पिलेल्या वस्तु व रक्त व गुदमरून मेलेली जनावरे [रक्त न काढलेले मांस] व जारकर्म” ही वर्ज्य करणे त्यांना “अगत्याचे” आहे. (प्रे. कृत्ये १५:२२-२९) ते प्रेषित केवळ धार्मिक विधि वा आहारविषयक नियम देत नव्हते. त्या निवाड्यात मूलभूत नैतिक आदर्श घालून देण्यात आला. आणि सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांनी तो पाळला. त्यापुढे एका दशकानंतरही “मूर्तीला अर्पिलेल्या वस्तु व रक्त . . . व जारकर्म यापासून त्यांनी” आपल्याला राखले पाहिजे असे त्यांनी मान्य केले होते.—प्रे. कृत्ये २१:२५.
लाखो लोक चर्चला जातात हे तुम्हाला माहीतच आहे. मूर्तीची उपासना न करणे तसेच निःसंकोचपणे अनैतिकतेत सहभागी न होणे या गोष्टी ख्रिस्ती नैतिकतेत गोवलेल्या आहेत याच्याशी त्यातील अनेक बहुधा सहमत होतील. परंतु, प्रेषितांनी, रक्तापासून अलिप्त राहणे हे सुद्धा, या चुका टाळण्याच्या उच्च नैतिक पातळीवरच मानले हे आपण लक्षात घेण्याजोगे आहे. या निवाड्याच्या शेवटी म्हटले होतेः “ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशल असो.”—प्रे. कृत्ये १५:२९.
प्रेषितांचा हा निवाडा पूर्वीपासून बंधनकारक मानला गेला. ख्रिस्ती लोकांना “निर्बुद्ध प्राण्यांचे रक्त खाण्याचीही परवानगी नाही.” ही गोष्ट दुसऱ्या शतकामध्ये, छळामुळे मरताना एका तरुण मुलीने सिद्ध केली असे युसेबियस सांगतो. ती मरणाचा हक्क बजावीत नव्हती. तिला जगण्याची इच्छा होती, परंतु ती आपले तत्त्व सोडण्यास तयार नव्हती. वैयक्तीक लाभापेक्षा तत्त्वाला अधिक महत्त्व देणाऱ्यांबद्दल तुम्हाला आदर वाटत नाही का?
जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने अनुमान काढलेः “रक्त खाण्यावरील बंदीविषयी नोहाला दिलेला नियम त्याच्या सर्व वंशजांवर बंधनकारक होता असे दिसते. . . . प्राचीन ख्रिस्ती लोकांना प्रेषितांच्या मनाई हुकुमाचे स्वरुप व मर्यादा योग्य रितीने समजली नसेल असे मानता येणार नाही. त्यांच्या व्यवहारावरुन त्या हुकुमाचा अर्थ आपण लावल्यास तो अमर्याद व कायमचा असावा असा उद्देश होता अशाच निर्णयाप्रत आपण येतो; कारण अनेक शतकांपर्यंत कोणाही ख्रिस्ती माणसाने रक्त खाल्ले नाही.”
-
-
रक्त–जीवनासाठी अत्यावश्यकरक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
-
-
[४ पानांवरील चौकट]
“दक्षतेने व पद्धतशीरपणे मांडण्यात आलेले ते निर्बंध [प्रे. कृत्ये १५ व्या अध्यायातील] अत्यावश्यक ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेषितांच्या मनात ती तात्पुरती व्यवस्था किंवा तेवढ्यापुरता उपाय नव्हता याचा भक्कम पुरावा मिळतो.”—प्राध्यापक एडोआर्ड रियुस, स्ट्रासबर्ग विश्वविद्यालय.
-