-
“यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडो”देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
-
-
प्रे. कार्यं २१:१-१७ वर आधारित
१-४. पौल यरुशलेमला का निघाला आहे, आणि तिथे त्याच्यासोबत काय होणार आहे?
पौल आणि लूक मिलेता इथून निघाल्यामुळे बांधव खूप दुःखी आहेत. त्या दोघांच्याही मनात इफिसच्या मंडळीतल्या या वडिलांबद्दल खूप जिव्हाळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या वडिलांना सोडून जाणं त्यांनाही खूप कठीण वाटत आहे. जड मनाने ते दोघं जहाजावर चढतात. प्रवासात लागणाऱ्या सर्व गोष्टी बांधवांनी त्यांना दिल्या आहेत. यहूदीयाच्या गरीब बांधवांसाठी गोळा केलेल्या देणग्याही त्यांच्यासोबत आहेत. या देणग्या लवकरात लवकर बांधवांकडे पोहोचवण्यासाठी पौल आणि त्याचे साथीदार उत्सुक आहेत.
२ हलकेच वाहणाऱ्या वाऱ्याने जहाजाची शिडं फडफडू लागतात आणि जहाज बंदराच्या गोंधळापासून दूर जाऊ लागतं. पौल व लूक आणि त्यांच्या सात साथीदारांच्या नजरा बंदरावर उभ्या असलेल्या बांधवांच्या उदास चेहऱ्यांवर खिळल्या आहेत. (प्रे. कार्यं २०:४, १४, १५) त्यांचे चेहरे दिसेनासे होईपर्यंत ते हात हलवून त्यांचा निरोप घेतात.
-
-
“यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडो”देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
-
-
५. पौल आणि त्याचे साथीदार कोणत्या मार्गाने सोर इथे गेले?
५ पौल आणि त्याच्या साथीदारांचं “जहाज वेगाने” निघालं. वारा चांगला असल्यामुळे ते दिशा न बदलता त्याच दिवशी कोस इथे पोहोचलं. (प्रे. कार्यं २१:१) जहाजाने तिथेच रात्रभर नांगर टाकला असावा. त्यानंतर ते रुदा आणि पातरा इथे गेलं. आशिया मायनरच्या दक्षिण किनाऱ्याला असणाऱ्या पातरा इथून बांधव माल वाहून नेणाऱ्या एका मोठ्या जहाजावर चढतात. हे जहाज त्यांना सरळ फेनिकेमधल्या सोर इथे घेऊन जातं. जाताना त्यांना “डावीकडे [बंदर होतं त्या दिशेला] कुप्र बेट दिसलं.” (प्रे. कार्यं २१:३, तळटीप) प्रेषितांची कार्यं पुस्तकाचा लेखक लूक याने इथे ही खास माहिती का दिली?
-