वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • “हिंमत धर!”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
    • १०. पौलवर कोणते गंभीर आरोप करण्यात आले?

      १० पौलवर आरोप करणारे यरुशलेमहून कैसरीयाला येईपर्यंत, त्याला “हेरोदच्या वाड्यात पहाऱ्‍याखाली” ठेवण्यात आलं. (प्रे. कार्यं २३:३५) ते पाच दिवसांनी तिथे आले. त्यांच्यात महायाजक हन्‍ना, तिर्तुल्ल नावाचा एक जाहीर वक्‍ता आणि काही वडीलही होते. तिर्तुल्लने सर्वातआधी, फेलिक्स यहुद्यांसाठी जे करत होता त्यासाठी त्याची स्तुती केली. तो साहजिकच फेलिक्सची मर्जी मिळवण्याच्या हेतूने त्याची वाहवा करत होता.b मग मुख्य विषयावर येत, तिर्तुल्लने पौलविषयी म्हटलं, की “हा माणूस खूप त्रासदायक आहे आणि तो संपूर्ण जगातल्या सगळ्या यहुद्यांना बंड करायला चिथवतोय. शिवाय, तो नासरेथकरांच्या पंथाचा पुढारी आहे. त्याने मंदिरही दूषित करायचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्ही त्याला धरलं.” तेव्हा इतर यहुदीही “त्याच्या विरोधात बोलू लागले आणि या सगळ्या गोष्टी खऱ्‍या आहेत असं ठामपणे म्हणू लागले.” (प्रे. कार्यं २४:५, ६, ९) इतरांना विद्रोह करायला चिथावणं, एका धोकादायक पंथाचा पुढारी असणं आणि मंदिर दूषित करण्याचा प्रयत्न करणं हे सर्व खूप गंभीर आरोप होते आणि त्यांसाठी एका व्यक्‍तीला मृत्युदंडही दिला जाऊ शकत होता.

  • “हिंमत धर!”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
    • b फेलिक्सने देशात “फार शांतता” आणल्याबद्दल तिर्तुल्लने त्याचे आभार मानले. पण खरं पाहता, इतर कोणत्याही राज्यपालाच्या शासनकाळाच्या तुलनेत फेलिक्सच्या शासनकाळात यहूदीयात सर्वात जास्त अशांती होती आणि शेवटी यहुदी लोकांनी रोमविरुद्ध बंड केलं. तसंच, फेलिक्सने केलेल्या सुधारणांबद्दल यहुदी लोक त्याचे “खूप आभारी” आहेत, असं जे तिर्तुल्लने म्हटलं तेसुद्धा अगदी खोटं होतं. खरंतर, बहुतेक यहुदी लोक फेलिक्सचा तिरस्कार करायचे कारण तो त्यांच्यावर खूप अत्याचार करायचा. तसंच, बंड करणाऱ्‍यांविरुद्धही तो खूप क्रूरतेने कारवाई करायचा.​—प्रे. कार्यं २४:२, ३.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा