-
प्रत्यक्ष पाहिल्यावरच खात्री पटतेटेहळणी बुरूज—२००८ | जुलै १
-
-
देव आहे आणि त्याला, लोकांमध्ये आस्था आहे, हे पौल इतक्या खात्रीनिशी कसे काय बोलत होता? रोममधील सहख्रिश्चनांना लिहिलेल्या पत्रात त्याने याचे एक कारण सांगितले आहे. त्या पत्रात देवाविषयी त्याने असे म्हटले: “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी . . . निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.”—रोमकर १:२०.
पुढील लेखांत, देवाने निर्मिलेल्या गोष्टींवरून ज्ञात होत असलेल्या त्याच्या तीन गुणांवर चर्चा करण्यात आली आहे. या उदाहरणांचे परीक्षण करताना स्वतःला विचारा: ‘देवाच्या या गुणांविषयी मी शिकून घेतले तर माझ्यावर काय परिणाम होईल?’ (w०८ ५/१)
-
-
निर्सगात दिसणारी देवाची बुद्धीटेहळणी बुरूज—२००८ | जुलै १
-
-
निर्सगात दिसणारी देवाची बुद्धी
“[तो] आम्हास पृथ्वीवरील पशूहून अधिक शिकवितो, आणि आकाशातील पक्ष्यांहून अधिक ज्ञान देतो.”—ईयोब ३५:११.
पक्ष्यांमध्ये विलक्षण क्षमता आहेत. आकाशात संथपणे व कुठल्याही परिश्रमाविना उडणाऱ्या पक्ष्यांना पाहून विमान बनवणारे चाट पडतात. काही जातींचे पक्षी, हजारो किलीमीटरचा महासागर पार करून न चुकता इच्छित स्थळी पोहचतात. महासागरावरून उडत असताना, आपण योग्य दिशेने उडत आहोत याची खात्री करण्यासाठी अधेमधे त्यांना कसल्याच निशाणीची किंवा खुणांची गरज पडत नाही.
एकमेकांना साद घालून व गाणे गाऊन संवाद साधण्याची आणखी एक विलक्षण क्षमता पक्ष्यांमध्ये आहे. यावरूनही त्यांच्या निर्माणकर्त्याची बुद्धी दिसून येते. याविषयी पुढे काही उदाहरणे देण्यात आली आहेत.
पक्ष्यांची भाषा
काही जातींचे पक्षी अंड्यातून बाहेर येण्याआधीपासूनच एकमेकांशी बोलू लागतात. उदाहरणार्थ, लावा (क्वेल) पक्ष्यांची मादी दररोज एक, अशी जवळपास आठ अंडी घालते. पण मग, जर दिवसाला एक अंडे पक्व होऊन त्यातून पिल्लू बाहेर पडू लागले, तर त्याला सांभाळण्यात आणि उरलेली अंडी उबविण्यात आईची खूप दमछाक होऊ शकते; कारण अंड्यातून निघालेली पिल्ले अतिशय चपळ असतात. पण असे होत नाही. त्याऐवजी, सहा तासांच्या अवधीत आठही पिल्ले एकाच वेळी अंड्यातून बाहेर निघतात. हे कसे शक्य आहे? संशोधक याचे एक मुख्य कारण सांगतात. अंड्यांतील भ्रूण अंड्यांतूनच एकमेकांशी संवाद साधून, एकाच वेळी सर्वांनी सोबत बाहेर पडायचे, असे ठरवतात.
प्रौढावस्थेत पोहचल्यावर सहसा नर पक्षी गाणे गातो. विणीच्या हंगामात, आपले क्षेत्र दर्शवण्यासाठी किंवा मादीला आकर्षित करण्यासाठी तो खासकरून गाणे गातो. हजारो प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रत्येक जातीची एक निराळी भाषा असते. यामुळे मादी आपल्या जातीचे नर ओळखू शकते.
पक्षी सहसा पहाटे आणि सूर्यास्ताच्या वेळी गातात आणि यामागे एक चांगले कारण आहे. पहाटे आणि सूर्यास्ताच्या वेळी वारा कमी असतो आणि आजूबाजूलाही शांतता असते. संशोधकांच्या पाहण्यात असे आले आहे, की पक्ष्यांचे सकाळ-संध्याकाळचे गाणे हे दुपारच्या गाण्यापेक्षा २० पटीने अधिक चांगले असते.
पक्षी जगतात सहसा नर गायक असला तरी, नर आणि मादी दोघेही वेगवेगळे किंवा कधी अल्प अथवा दीर्घकाळपर्यंत आवाज काढतात व प्रत्येक आवाजाचा अर्थ वेगळा असतो. जसे की, चॅफिन्च पक्षी नऊ वेगवेगळे आवाज काढतात. आकाशात एखादी घार अथवा बहिरी ससाणा उडत असेल तर सावधगिरीसाठी त्यांचा एक आवाज असतो; पण जमिनीवर त्यांना काही धोका असेल, तर धोक्याची सूचना देण्यासाठी ते वेगळा आवाज काढतात.
एक सर्वोत्कृष्ट देणगी
पक्ष्यांची उपजत बुद्धी सर्वांनाच तोंडात बोट घालायला लावते. परंतु, मानव एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरत असलेली कौशल्ये त्याहूनही अधिक उल्लेखनीय आहेत. देवाने मानवांना “आकाशातील पक्ष्यांहून अधिक ज्ञान” दिले आहे, असे ईयोब ३५:११ मध्ये म्हटले आहे. केवळ मानवामध्येच, जटील विचार व कल्पना, कंठातील स्वरतंतूमुळे उत्पन्न होणाऱ्या आवाजाद्वारे अर्थात शब्दांद्वारे किंवा हावभावाद्वारे व्यक्त करण्याची क्षमता आहे.
मानवी शिशुंमध्ये जन्मतःच कठीणातली कठीण भाषा शिकण्याची कुवत असते जी प्राण्यांमध्ये नसते. इंटरनेटवरील अमेरिकन सायंटिस्ट या नियतकालिकात असे म्हटले आहे: “लहान मुलं, पालक त्यांच्याशी थेट बोलत नसले तरीसुद्धा भाषा शिकतात; आणि कर्णबधीर मुलं तर, घरात कोणत्याही प्रकारची साईन लँग्वेज अर्थात संकेत भाषा वापरली जात नसली तरीसुद्धा स्वतःचीच एक संकेत भाषा तयार करतात.”
-
-
निर्सगात दिसणारी देवाची बुद्धीटेहळणी बुरूज—२००८ | जुलै १
-
-
तुमच्यावर कसा परिणाम होतो?
तुम्ही एखाद्या पक्ष्याचे मधूर गाणे ऐकता किंवा बाळाचे पहिले शब्द ऐकता तेव्हा तुम्हाला कसे वाटते? देवाने बनवलेल्या सृष्टीतून तुम्हाला त्याची बुद्धी दिसून येते का?
आपल्या शरीराच्या घडणेवर मनन केल्यावर स्तोत्रकर्ता दावीद देवाला असे म्हणू शकला: “भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.” (स्तोत्र १३९:१४) सृष्टीत दिसणाऱ्या देवाच्या बुद्धीचे तुम्ही कृतज्ञतेने मनन केले तर, सर्वोत्तम मार्गदर्शन देण्याची देवामध्ये ताकद आहे, हा तुमचा भरवसा आणखी वाढेल. (w०८ ५/१)
-
-
ताऱ्यांच्या निर्मितीवरून दिसणारी देवाची शक्तीटेहळणी बुरूज—२००८ | जुलै १
-
-
ताऱ्यांच्या निर्मितीवरून दिसणारी देवाची शक्ती
“आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो; तो त्या सर्वास नावांनी हाका मारितो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यापैकी कोणी उणा पडत नाही.”—यशया ४०:२६.
आपला सूर्य हा केवळ एक सामान्य तारा आहे. तरी तो पृथ्वीपेक्षा ३,३०,००० पटीने विशाल आहे. पृथ्वीजवळचे बहुतेक तारे सूर्यापेक्षा आकाराने लहान आहेत. पण, इतर तारे आपल्या सूर्याच्या आकारापेक्षा किमान २७ पटीने विशाल आहेत, यापैकी एक म्हणजे, V382 सीग्नी नाव असलेला तारा.
आपल्या सूर्यातून किती उर्जा बाहेर पडते? अशी कल्पना करा, की एखाद्या ठिकाणी खूप मोठी आग लागली आहे आणि त्या ठिकाणापासून तुम्ही १५ किलोमीटर दूर आहात तरीही त्या आगीची झळ तुम्हाला लागत आहे. म्हणजे त्या आगीची उष्णता किती असावी याचा विचार करा! सूर्याचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर सुमारे १५ कोटी किलोमीटर इतके आहे. तरीसुद्धा, बाहेर तळपत्या उन्हात जर तुम्ही गेलात तर उष्णतेमुळे तुमच्या अंगावर फोड येऊ शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सूर्याच्या उर्जेच्या शंभर कोटीतील केवळ एक अंश उर्जा पृथ्वीपर्यंत पोहचते. तरी, सूर्याच्या उर्जेतील फक्त हा अल्पांश, पृथ्वीवरील जीवसृष्टीला टिकवून ठेवण्यास पुरेसा आहे.
खरे तर, शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे, की आपल्या सूर्यातून उत्सर्जित होणारी एकूण उर्जा, पृथ्वीसारख्या सुमारे ३१ महापद्म ग्रहांना टिकवून ठेवण्यास पुरेशी आहे. किंवा, ही महाकाय उर्जा मापण्याची दुसरी एक पद्धत म्हणजे, सूर्याची सर्व शक्ती फक्त एक सेकंदापुरती वापरली तर, “अमेरिका सध्या जितक्या उर्जेचा वापर करत आहे तितकी उर्जा पुढील ९०,००,००० वर्षांपर्यंत चालेल,” असे वेबसाईटवरील स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटर (एसडब्ल्यूपीसी) म्हणते.
सूर्याच्या गाभ्यातून केंद्रक संमीलनामुळे प्रचंड उर्जा उत्सर्जित होते. सूर्याचे आकारमान इतके विशाल आहे आणि त्याचा गाभा इतका दाट आहे, की गाभ्यातील उर्जा पृष्ठभागापर्यंत येण्याकरता लक्षावधी वर्षे लागतात. “सूर्याने जर आज उर्जा उत्सर्जित करण्याचे थांबवले तर पृथ्वीवर याचे परिणाम दिसण्याकरता ५,००,००,००० वर्षे लागतील,” असे वेबसाईटवरील एसडब्ल्यूपीसी म्हणते.
आता या वस्तुस्थितीचा विचार करा: निरभ्र काळोख्या रात्री तुम्ही आकाशात अगणित लुकलुकणारे तारे पाहता. प्रत्येक तारा सूर्याप्रमाणेच प्रचंड प्रमाणात उर्जा उत्सर्जित करत असतो. आणि शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे, की विश्वात असे लक्षावधी तारे आहेत.
हे सर्व तारे कोठून आले? बहुतेक संशोधक आता असे मानू लागले आहेत, की सुमारे १४ अब्ज वर्षांपूर्वी हे विश्व अचानक अस्तित्वात आले असा आपण विश्वास करत असलो तरी, हा विश्वास आपण का करतो त्याचे कारण मात्र आपल्याला अद्यापही उमगलेले नाही. पण बायबल अगदी साध्यासोप्या शब्दात म्हणते की “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.” (उत्पत्ति १:१) प्रचंड उर्जा उत्पन्न करणाऱ्या मशीनी अर्थात तारे ज्याने बनवले तो “प्रबळ” आहे, असे आपण मनात कसलीही शंका न बाळगता म्हणू शकतो.—यशया ४०:२६.
-