-
कोणतीही गोष्ट आपल्याला ‘देवाच्या प्रीतीपासून विभक्त करावयाला समर्थ’ आहे का?टेहळणी बुरूज—२००८ | ऑक्टोबर १
-
-
देवाच्या जवळ या
कोणतीही गोष्ट आपल्याला ‘देवाच्या प्रीतीपासून विभक्त करावयाला समर्थ’ आहे का?
आपल्यात कोण आहे ज्याला, इतरांनी आपल्यावर प्रेम करावे असे वाटत नाही? कुटुंबातील सदस्य, आपले मित्रजन आपल्यावर प्रेम करतात तेव्हा आपण बहरतो. परंतु, मानवी नातेसंबंध अतिशय नाजूक व अनिश्चित असतात. ते सहजरीत्या तुटू शकतात किंवा विविध परिस्थितींमध्ये बदलू शकतात. आपण ज्यांच्यावर जिवापाड प्रेम करतो ते कदाचित आपले मन दुखावतील, आपल्याला सोडून जातील, आपला त्याग करतील. पण असा कोणी तरी आहे ज्याचे प्रेम अबाधीत आहे. तो आहे मानवजातीचा सृष्टीकर्ता, यहोवा देव. यहोवा देवाचे आपल्या उपासकांवर किती प्रेम आहे याचे सुरेख वर्णन रोमकर ८:३८, ३९ मध्ये करण्यात आले आहे.
-
-
कोणतीही गोष्ट आपल्याला ‘देवाच्या प्रीतीपासून विभक्त करावयाला समर्थ’ आहे का?टेहळणी बुरूज—२००८ | ऑक्टोबर १
-
-
“उंची खोली.” यहोवाच्या लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही उतार-चढावांचा सामना करावा लागत असला तरी, त्यांच्यावरील त्याचे प्रेम अटळ आहे.
“दुसरी कोणतीहि सृष्ट वस्तु.” सर्व सृष्टीचा समावेश असलेली अक्षरशः कोणतीही गोष्ट, यहोवाच्या एकनिष्ठ उपासकांना त्याच्या प्रेमापासून विभक्त करू शकत नाही.
प्रेम दाखवण्याच्या बाबतीत लोक बदलू शकतात. परंतु देवावर विश्वास टाकणाऱ्यांप्रती त्याचे प्रेम अबाधीत राहते. ते चिरकाल टिकते. ही जाणीव आपल्याला यहोवाच्या आणखी जवळ आणते आणि आपले देखील त्याच्यावर प्रेम आहे हे सिद्ध करण्याचा आपण आपल्या परीने होता होईल तो प्रयत्न करतो. (w०८ ८/१)
-