-
“वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका”टेहळणी बुरूज—२००७ | जुलै १
-
-
“सूड उगवू नका”
१५. रोमकर १२:१९ यात बदला न घेण्याचे कोणते कारण सापडते?
१५ आपण कोणाचा बदला का घेऊ नये, याचे आणखी एक पटण्याजोगे कारण पौल सांगतो; कारण हा विनयशीलतेचा मार्ग आहे. पौल म्हणतो: “प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभु म्हणतो.” (रोमकर १२:१९) जो ख्रिस्ती सूड उगवण्याचा प्रयत्न करतो तो गर्विष्ठ आहे. जे काम देवाचे आहे ते तो आपल्या हातात घेतो. (मत्तय ७:१) शिवाय असे करण्याद्वारे, “मी फेड करीन” या यहोवाच्या आश्वासनावरही आपला विश्वास नसल्याचे तो दाखवतो. याउलट, खरे ख्रिस्ती हा भरवसा बाळगतात की यहोवा आपल्या ‘निवडलेल्या लोकांचा न्याय करेल.’ (लूक १८:७,८; २ थेस्सलनीकाकर १:६-८) हा भरवसा असल्यामुळे, ते घडलेल्या वाइटाची फेड करण्याचे काम विनयशीलपणे देवावर सोडून देतात.—यिर्मया ३०:२३,२४; रोमकर १:१८.
-
-
“वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका”टेहळणी बुरूज—२००७ | जुलै १
-
-
१८. बदला न घेणे हा योग्य, प्रेमळपणाचा व विनयशील मार्ग का आहे?
१८ रोमकरांस लिहिलेल्या पत्राच्या १२ व्या अध्यायाचे थोडक्यात परीक्षण करताना “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड” न करण्याची अनेक महत्त्वाची कारणे आपण पाहिली. सर्वात पहिले कारण म्हणजे, बदला घेण्यापासून स्वतःला आवरणे योग्य आहे. देवाने आपल्याप्रती जी करूणा दाखवली आहे ती लक्षात घेऊन आपण स्वतःस यहोवाला समर्पित करणे व आनंदाने त्याच्या आज्ञांचे पालन करणे हे योग्य व रास्त आहे. आणि त्याच्या आज्ञांपैकी एक आज्ञा ही आहे की आपण आपल्या शत्रूंवरही प्रेम केले पाहिजे. दुसरे कारण हे की वाइटाबद्दल वाईट अशी फेड न करणे हे प्रेमळपणाचे आहे. बदला न घेता, शांतीने राहण्याचा प्रयत्न करण्याद्वारे आपण प्रेमळपणे ही आशा बाळगतो की आपला कडा विरोध करणाऱ्यांपैकीही काहीजण यहोवाचे उपासक बनतील. तिसरे कारण म्हणजे वाइटाबद्दल वाईट अशी फेड न करणे हा विनयशीलतेचा मार्ग आहे. सूड उगवणे हे गर्विष्ठपणाचे लक्षण ठरेल कारण यहोवा म्हणतो: “सूड घेणे माझ्याकडे आहे.” शिवाय, देवाचे वचन ही ताकीद देते: “गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.” (नीतिसूत्रे ११:२) घडलेल्या वाइटाबद्दल फेड करणे देवावर सोडून देणे हे शहाणपणाचे आहे आणि यावरून आपली विनयशीलता दिसून येते.
-