वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकाशाचे चकाकणे—प्रखर आणि सौम्य भाग दोन
    टेहळणी बुरूज—१९९५ | मे १५
    • ‘उच्च शक्‍तींचे’ स्पष्टीकरण

      ४, ५. (अ) बायबल विद्यार्थी रोमकर १३:१ ला कोणत्या दृष्टिकोनातून पाहत होते? (ब) “उच्च शक्‍ती” यांच्या बाबतीत शास्त्रवचनीय भूमिका काय असल्याची नंतर दिसून आली?

      ४ रोमकर १३:१ च्या संबंधी १९६२ मध्ये लख्ख प्रकाशाचे चकाकणे दिसून आले: “प्रत्येक जणाने उच्च शक्‍तींच्या [“वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या,” मराठी, आर. व्ही. रेफरन्स] अधीन असावे.” (किंग जेम्स व्हर्शन) प्रारंभिक बायबल विद्यार्थ्यांना, येथे उल्लेखिलेल्या “उच्च शक्‍ती” जागतिक अधिकाऱ्‍यांना सूचित करत असल्याचे समजले. या वचनाचा अर्थ, एखाद्या ख्रिश्‍चनाला युद्धकाळात भरती करण्यात आल्यावर, गणवेश चढवणे, खांद्यावर बंदूक घेणे आणि युद्धादरम्यान खंदकांकडे जाणे असा असल्याचा त्यांना वाटले. ख्रिस्ती आपल्या सहमानवाला ठार मारू शकत नसल्याने बिकट परिस्थिती आलीच तर त्याला हवेत गोळीबार करण्यास भाग पाडले जाईल असे त्यांना वाटले.a

      ५ नोव्हेंबर १५ आणि डिसेंबर १, १९६२ च्या टेहळणी बुरुजने मत्तय २२:२१ मधील येशूच्या शब्दांची चर्चा करून त्या विषयावर स्पष्ट प्रकाश पाडला: “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.” प्रेषितांची कृत्ये ५:२९ मधील प्रेषिताचे शब्द याजशी निगडित होते: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” ख्रिस्ती लोक कैसराच्या—‘उच्च शक्‍तींच्या’—अधीन आहेत, केवळ ख्रिश्‍चनाला देवाच्या नियमाच्या विरूद्धतेत जावयाचे नाही. कैसराला अधीन राहणे पूर्ण नव्हे तर सापेक्ष असल्याचे दिसून आले. ज्या गोष्टी देवाच्या अपेक्षांच्या विरोधात जात नाहीत केवळ त्याच गोष्टी ख्रिस्ती लोक कैसराला देतात. त्या विषयावर, स्पष्ट प्रकाश प्राप्त करणे किती समाधानकारक होते!

  • प्रकाशाचे चकाकणे—प्रखर आणि सौम्य भाग दोन
    टेहळणी बुरूज—१९९५ | मे १५
    • a या दृष्टिकोनाला प्रतिसाद देऊन, जून १ आणि जून १५, १९२९ च्या टेहळणी बुरुज नियतकालिकाने या “उच्च शक्‍ती” यहोवा देव व येशू ख्रिस्त आहेत असा अर्थ लावला. मूलतः, हाच दृष्टिकोन १९६२ मध्ये सुधारण्यात आला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा