-
ख्रिस्ती नैतिकता शिका व शिकवाटेहळणी बुरूज—२००२ | जून १५
-
-
६, ७. (अ) आपण आधी स्वतःला का शिकवले पाहिजे? (ब) पहिल्या शतकातील यहुदी इतरांना शिक्षण देण्यात का अपयशी ठरले?
६ आपण स्वतःला आधी शिकवले पाहिजे असे का म्हटले आहे? कारण आपण स्वतःला शिकवले नसेल तर साहजिकच आपण इतरांना चांगल्याप्रकारे शिकवू शकणार नाही. पौलाने ही गोष्ट कशाप्रकारे स्पष्ट केली हे पुढील उताऱ्यावरून कळून येते; हा उतारा त्या काळातील यहुद्यांकरता तर अर्थपूर्ण होताच पण आज ख्रिस्ती लोकांकरताही यात एक महत्त्वाचा धडा आहे. पौलाने असे विचारले: “तर मग दुसऱ्याला शिकविणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करितोस काय? व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करितोस काय? मूर्तीचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय? नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करितोस काय?”—रोमकर २:२१-२३.
७ उत्तरे अभिप्रेत असणारे हे प्रश्न विचारण्याद्वारे पौलाने दहा आज्ञांमध्ये स्पष्ट उल्लेख असलेल्या दोन बाबींकडे लक्ष वेधले: चोरी करू नको, आणि व्यभिचार करू नको. (निर्गम २०:१४, १५) पौलाच्या काळात काही यहुद्यांना आपल्याकडे देवाचे नियमशास्त्र असण्याचा खूपच अभिमान होता. त्यांना ‘नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे ते आंधळ्यांचे वाटाडी, अंधारात असलेल्यांचा प्रकाश, बाळकांचे गुरू आहेत, अशी त्यांची खात्री झाली होती.’ (रोमकर २:१७-२०) पण यांपैकी काहीजण ढोंगी होते कारण दुसरीकडे ते चोरी किंवा व्यभिचारही करत होते. हे नियमशास्त्राचा आणि ज्याने ते दिले त्या स्वर्गातील देवाचाही अनादर करण्यासारखे होते. इतरांना शिकवण्यास ते पात्र नव्हते हे तर उघड होते आणि खरे पाहता ते स्वतःलाही शिकवत नव्हते.
८. पौलाच्या काळातील काही यहुदी कोणत्या अर्थाने ‘देवळे लुटत’ होते?
८ पौलाने देवळे लुटण्याविषयी उल्लेख केला. काही यहुदी खरोखर असे करत होते का? मग पौलाच्या मनात काय होते? स्पष्ट सांगायचे झाल्यास, या उताऱ्यातील मर्यादित माहितीवरून यहुदी कोणत्या अर्थाने ‘देवळे लुटत’ होते हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. याआधी नगराच्या शिरस्तेदाराने असे घोषित केले होते की पौलाचे साथीदार ‘देवळे लुटणारे’ नव्हते, यावरून काही प्रमाणात यहुद्यांविषयी निदान काही लोक असा आरोप करत होते असे भासते. (प्रेषितांची कृत्ये १९:२९-३७) विजयी सैन्याने किंवा धार्मिक जहालमतवाद्यांनी मूर्तिपूजक देवळांमधून लुटलेल्या वस्तूंचा ते वैयक्तिक वापर किंवा व्यापार करत असावेत का? देवाच्या नियमशास्त्रानुसार मूर्तींवरील सोनेरूपे नष्ट करायचे होते, वैयक्तिक वापराकरता त्यांचा मोह धरू नका असे यहुद्यांना सांगण्यात आले होते. (अनुवाद ७:२५)a तेव्हा, पौल कदाचित अशा यहुद्यांविषयी बोलत असावा जे देवाच्या या आज्ञेकडे दुर्लक्ष करत होते आणि मूर्तिपूजक देवळांतून आलेल्या वस्तूंचा एकतर वापर करत होते किंवा त्यांतून नफा मिळवत होते.
९. जेरूसलेमच्या मंदिरात कोणत्या अयोग्य गोष्टी चालत होत्या ज्या एका अर्थाने मंदिर लुटण्यासारख्या होत्या?
९ दुसरीकडे पाहता जोसीफसने रोममध्ये घडलेल्या एक निंद्य घटनेचा अहवाल दिला; या घटनेमागे चार यहुद्यांचा हात होता आणि त्यांचे नेतृत्व करणारा नियमशास्त्राचा शिक्षक होता. या चार यहुद्यांनी यहुदी मतानुसारी असणाऱ्या एका रोमी स्त्रीला तिच्या मालकीचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू जेरूसलेममधील मंदिराला देणगी देण्याकरता पटवले. या सर्व वस्तू तिच्याकडून मिळवल्यानंतर त्यांनी ते धन स्वतःत वाटून घेतले. हे एका अर्थाने मंदिर लुटण्यासारखेच होते.b इतर काहीजण दोषपूर्ण अर्पणे वाहून व मंदिराच्या परिसरात व्यापार करून मंदिराला “लुटारूंची गुहा” बनवण्याद्वारे देवाचे मंदिर लुटत होते.—मत्तय २१:१२, १३; मलाखी १:१२-१४; ३:८, ९.
-
-
ख्रिस्ती नैतिकता शिका व शिकवाटेहळणी बुरूज—२००२ | जून १५
-
-
a यहुदी लोक पवित्र वस्तूंचा अनादर करत नव्हते असे त्यांच्याविषयीचे चित्र रेखाटताना जोसीफसने देवाचा हा विशिष्ट नियम अशाप्रकारे विदित केला: “इतर शहरांत पुजल्या जाणाऱ्या देवांची कोणीही निंदा करू नये, परदेशीयांची देवळे लुटू नये किंवा कोणत्याही देवाला वाहिलेल्या खजिन्याचा मोह धरू नये.” (तिरपे वळण आमचे.)—ज्युइश ॲन्टीक्विटीज, ४ था ग्रंथ, अध्याय ८, परिच्छेद १०.
-