-
ख्रिस्ताच्या राज्य शासनाची शंभर वर्षं!टेहळणी बुरूज—२०१५ | नोव्हेंबर १५
-
-
२. मत्तय २८:१९, २० मध्ये दिलेली आज्ञा किती जणांनी ऐकली, आणि आपण असं का म्हणू शकतो?
२ पुनरुत्थान झाल्यानंतर येशू ५०० पेक्षा जास्त लोकांच्या एका गटाला भेटला. हे लोक पुढे जाऊन येशूचे शिष्य बनण्याची शक्यता होती. (१ करिंथ. १५:६) कदाचित त्याच वेळी येशूनं त्यांना, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा” अशी आज्ञा दिली असावी. त्यांना दिलेलं हे काम सोपं असणार नव्हतं.a सुवार्ता घोषित करण्याचं हे काम जास्त काळापर्यंत म्हणजे अगदी “युगाच्या समाप्तीपर्यंत” चालेल असंही येशूनं त्यांना सांगितलं होतं. आज जेव्हा तुम्ही सुवार्तेचा प्रचार करता, तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण करण्यात तुमचाही हातभार असतो.—मत्त. २८:१९, २०.
-
-
ख्रिस्ताच्या राज्य शासनाची शंभर वर्षं!टेहळणी बुरूज—२०१५ | नोव्हेंबर १५
-
-
a या लोकांपैकी बरेच लोक नंतर ख्रिस्ती बनले असावेत. आपण असं का म्हणू शकतो? कारण प्रेषित पौलानं ‘५०० बंधू’ असं म्हणून त्यांचा उल्लेख केला. त्यानं असंही म्हटलं: “त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत.” यावरून असं दिसतं की ज्यांनी येशूची ही आज्ञा प्रत्यक्ष ऐकली, त्यांपैकी बहुतेकांना पौल आणि इतर ख्रिस्ती ओळखत होते.
-