-
‘मेलेले उठविले जातील’टेहळणी बुरूज—१९९८ | जुलै १
-
-
७. (अ) पौलाने कोणत्या मुख्य वादावर लक्ष केंद्रित केले? (ब) पुनरुत्थित येशूला कोणी पाहिले?
७ पहिले करिंथकरच्या १५ व्या अध्यायाच्या पहिल्या दोन वचनात पौल आपल्या चर्चेचा विषय सांगतो: “बंधुजनहो, जी सुवार्ता मी तुम्हास सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरहि राहत आहा. जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. . . . नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.” करिंथकर सुवार्तेत स्थिर झाले नसते तर त्यांनी सत्य स्वीकारूनही फायदा झाला नसता. पौल पुढे म्हणतो: “मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला; तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले; आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला; त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला; त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत; त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला; आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाहि सर्वांच्या शेवटी दिसला.”—१ करिंथकर १५:३-८.
-
-
‘मेलेले उठविले जातील’टेहळणी बुरूज—१९९८ | जुलै १
-
-
१०. (अ) येशूने आपल्या शिष्यांना दिलेल्या शेवटल्या भेटीचा काय परिणाम झाला? (ब) “जणू काय अकाली जन्मलेला” शौल याला येशूने कसे काय दर्शन दिले?
१० योसेफ आणि येशूची आई मरीया यांचा पुत्र याकोब, येशूच्या पुनरुत्थानाचा आणखी एक उल्लेखनीय साक्षीदार आहे. पुनरुत्थानापूर्वी याकोबाचा अजूनही त्याच्यावर विश्वास नव्हता. (योहान ७:५) पण, येशूने त्याला दर्शन दिल्यावर तो विश्वास ठेवू लागला आणि कदाचित त्याने आपल्या इतर बांधवांना परिवर्तन करण्यास मदत केली असावी. (प्रेषितांची कृत्ये १:१३, १४) येशूने आपल्या शिष्यांना दिलेल्या शेवटल्या भेटीवेळी, म्हणजे स्वर्गारोहण प्रसंगी त्याने त्यांना, “पृथ्वीच्या शेवटापर्यंत . . . साक्षी” होण्याचा आदेश दिला. (प्रेषितांची कृत्ये १:६-११) नंतर, ख्रिश्चनांचा छळ करणाऱ्या तार्सच्या शौलाला त्याने दर्शन दिले. (प्रेषितांची कृत्ये २२:६-८) “जणू काय अकाली जन्मलेला” शौल याला येशूने दर्शन दिले. हे जणू शौलाचे स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान झाल्याप्रमाणे होते; पुनरुत्थान व्हायच्या अनेक दशकांआधीच तो वैभवी प्रभूला पाहू शकला. या अनुभवामुळे, ख्रिस्ती मंडळीचा तो करीत असलेला खुनी विरोध जिथल्या तिथेच थांबला व त्याच्यामध्ये विलक्षण बदल झाला. (प्रेषितांची कृत्ये ९:३-९, १७-१९) शौलाचा प्रेषित पौल झाला; ख्रिस्ती विश्वासाच्या समर्थकांपैकी तो एक अग्रेसर समर्थक बनला.—१ करिंथकर १५:९, १०.
-