वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • पुनरुत्थान—एक पक्की आशा!
    टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०२० | डिसेंबर
    • १२. पहिले पेत्र ३:१८, २२ या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे येशूचं पुनरुत्थान हे आधी होऊन गेलेल्या पुनरुत्थानांपेक्षा वेगळं कसं होतं?

      १२ पौलने स्वतः येशूला दृष्टान्तात पाहिलं होतं. त्यामुळे त्याला याची पक्की खातरी होती, की “ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आलं [होतं].” पण येशूचं पुनरुत्थान हे आधी झालेल्या पुनरुत्थानांपेक्षा वेगळं होतं. कारण ज्यांचं आधी पुनरुत्थान झालं होतं, ते नंतर पुन्हा मेले. पण येशूच्या बाबतीत तसं घडलं नाही. त्याच्याबद्दल पौल म्हणाला: “तो मरण पावलेल्यांपैकी पहिलं फळ आहे.” येशूला पहिलं फळ का म्हटलं आहे? एक कारण म्हणजे, अदृश्‍य शरीरात पुनरुत्थान होणारा तो पहिला होता. आणि दुसरं म्हणजे, पुनरुत्थानानंतर मानवांपैकी स्वर्गात जाणारासुद्धा तो पहिला होता.—१ करिंथ. १५:२०; प्रे. कार्यं २६:२३; १ पेत्र ३:१८, २२ वाचा.

  • पुनरुत्थान—एक पक्की आशा!
    टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०२० | डिसेंबर
    • १६. पौलने येशूला “पहिलं फळ” का म्हटलं?

      १६ पौलने आपल्या पत्रात म्हटलं, की ख्रिस्त हा “मरण पावलेल्यांपैकी पहिलं फळ आहे.” हे खरं आहे, की येशूच्या आधी लाजरचं आणि इतर जणांचं पृथ्वीवर पुनरुत्थान करण्यात आलं होतं. पण येशू हा पहिलाच  होता ज्याला अदृश्‍य शरीर देऊन उठवण्यात आलं होतं आणि ज्याला सर्वकाळाचं जीवन देण्यात आलं होतं. येशूची तुलना, इस्राएली लोक देवाला देत असलेल्या पहिल्या पिकाच्या अर्पणाशी केली जाऊ शकते. तसंच, येशूला “पहिलं फळ” म्हणण्याद्वारे पौलला असं म्हणायचं होतं, की येशूनंतर इतरांचंही स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान केलं जाणार होतं. येशूप्रमाणेच, पुढे त्याच्या प्रेषितांना आणि इतर अभिषिक्‍त शिष्यांना स्वर्गातल्या जीवनासाठी उठवलं जाणार होतं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा