वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • तुमचे काम आगीत टिकून राहील का?
    टेहळणी बुरूज—१९९८ | नोव्हेंबर १
    • ४. (अ) ख्रिस्ती बांधकामात पौलाची काय भूमिका होती? (ब) येशू आणि त्याचे श्रोते यांना भक्कम पायांचे महत्त्व माहीत होते असे का म्हणता येऊ शकते?

      ४ इमारत स्थिर व टिकाऊ हवी तर तिचा पाया चांगला असला पाहिजे. म्हणून पौलाने लिहिले: “माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला.” (१ करिंथकर ३:१०) अशाच एका दाखल्याचा उपयोग करून येशू ख्रिस्ताने एका घराविषयी सांगितले जे, वादळात टिकून राहिले कारण ते बांधणाऱ्‍याने पायासाठी मजबूत जमीन निवडली होती. (लूक ६:४७-४९) पाया किती महत्त्वाचा असतो हे येशूला माहीत होते. यहोवाने पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तो तेथे उपस्थित होता.a (नीतिसूत्रे ८:२९-३१) येशूच्या श्रोत्यांनाही भक्कम पायांचे महत्त्व होते. भक्कम पाया असलेली घरेच केवळ पॅलेस्टाईनमध्ये केव्हा केव्हा येणाऱ्‍या पुरांत व भूकंपांत टिकून राहू शकत होती. परंतु पौल कोणत्या पायाचा विचार करीत होता?

  • तुमचे काम आगीत टिकून राहील का?
    टेहळणी बुरूज—१९९८ | नोव्हेंबर १
    • ७. पौलाने स्वतःचा उल्लेख ‘कुशल कारागिर’ असा केला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

      ७ अशा प्रकारचे शिकवणे आपण “कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे” केले असे पौल म्हणतो. असे म्हणण्याद्वारे पौल स्वतःचे गौरव करीत नव्हता. तर, यहोवाने त्याला कामाचे संघटन करण्याची किंवा आयोजन करण्याची अद्‌भुत देणगी दिल्याचे तो कबूल करतो. (१ करिंथकर १२:२८) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे आज आपल्याला चमत्कारिक देणगी देण्यात आलेली नाही हे कबूल आहे. शिवाय, आपण स्वतःला गुणयुक्‍त शिक्षक समजणार नाही. परंतु एका महत्त्वपूर्ण अर्थाने आपण गुणयुक्‍त शिक्षकच आहोत. अंमळ विचार करा: आपल्याला मदत करण्याकरता यहोवा आपला पवित्र आत्मा देतो. (पडताळा लूक १२:११, १२.) आणि आपली यहोवावर प्रीती आहे व त्याच्या वचनाच्या मूलभूत शिकवणींचे आपल्याला ज्ञान आहे. या खरोखरच अद्‌भुत देणग्या आहेत ज्यांचा इतरांना शिकवण्याकरता उपयोग केला जाऊ शकतो. तेव्हा, चांगला पाया घालण्याकरता आपण त्यांचा उपयोग करण्याचा दृढ निश्‍चय करू या.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा