वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १२/१५ पृ. ३०
  • तुम्हाला आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • इतरांकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तो स्वतःच्या चुकांमधून शिकला
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तो स्वतःच्या चुकांतून धडा शिकला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १२/१५ पृ. ३०

तुम्हाला आठवते का?

अलिकडील टेहळणी बुरूजचे अंक वाचण्यास तुम्हाला आवडले का? तर मग, खालील गोष्टींना उजाळा देणे तुम्हाला मनोरंजक वाटेल:

◻ यहोवा त्याच्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यक्‍तिगत निवड करतो असा आत्मविश्‍वास आपल्याला का आहे?

आपल्या लोकांनी विशिष्ट समयी आपल्या इच्छेनुसार जावे म्हणून त्यांचे मार्गदर्शन करण्याकरता विशिष्ट गुण असलेल्या लोकांना विशिष्ट जबाबदारीकरता यहोवा निवडतो.—८/१५, पृष्ठ १४.

◻ आपण योनाच्या अनुभवावरून काय शिकू शकतो?

योना इतरांऐवजी स्वतःबद्दलच जास्त विचार करत होता. आपण आपल्या व्यक्‍तिगत भावनांना दुय्यम स्थान देण्याद्वारे योनाकडून धडा शिकू शकतो.—८/१५, पृष्ठ १९.

◻ “परमेश्‍वराचे [“यहोवाचे,” NW] नाम बळकट दुर्ग आहे” हे कसे म्हटले जाऊ शकते? (नीतिसूत्रे १८:१०)

देवाच्या नावात आश्रय घेणे म्हणजे यहोवावर भरवसा ठेवणे. (स्तोत्र २०:१; १२२:४) याचा अर्थ असा होतो की त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करणे त्याच्या नियमांना आणि तत्वांना उचलून धरणे तसेच त्याच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवणे आणि एकनिष्ठ भक्‍ती करणे. (यशया ५०:१०; इब्री लोकास ११:६)—९/१, पृष्ठ १०.

◻ प्रतिष्ठांपुढे साक्ष देण्याची पौलाची पध्दत आपल्यासाठी एक उल्लेखनीय उदाहरण कशाप्रकारे आहे?

राजा अग्रिपाबरोबर बोलताना पौलाने बुध्दीचा वापर केला, तो आणि अग्रिपा एकमत असलेल्या मुद्द्‌यावर त्याने जोर दिला. त्याप्रमाणेच सहजासहजी सत्य स्वीकारता यावे म्हणून आपण सुवार्तेच्या सकारात्मक पैलूंवर, सामान्य आशांवर जोर दिला पाहिजे. (१ करिंथकर ९:२२)—९/१, पृष्ठ ३१.

◻ यहोवाच्या सहनशीलतेचा फायदा कोणाकोणाला होतो?

यहोवाच्या सहनशीलतेमुळे कोट्यवधी लोकांना ‘यहोवाच्या दिवसातून’ बचावण्याची आज संधी दिली जात आहे. (२ पेत्र ३:९-१५) तसेच त्याच्या सहनशीलतेमुळे आपल्यापैकी प्रत्येकाला ‘भीत व कापत आपले तारण साधून घेण्याची’ संधी आहे. (फिलिप्पैकर २:१२)—९/१५, पृष्ठ २०.

◻ बायबलच्या भाषांतरात सेप्टुआजिंटचा महत्त्वाचा वाटा कशाप्रकारे होता?

या भाषांतराचा, यहोवा देव त्याचे राज्य, आणि त्याचा राजा येशू ख्रिस्त याचे ज्ञान पसरविण्यात मोठा वाटा आहे. सेप्टुआजिंटने पहिल्या शतकातील ग्रीक भाषिक यहुदी आणि विदेश्‍यांनी राज्याची सुवार्ता स्वीकारावी म्हणून महत्त्वपूर्ण पाया घातला.—९/१५, पृष्ठ ३०.

◻ उधळ्या पुत्राच्या दाखल्यातून आपल्याला देवाविषयी काय शिकण्यास मिळते?

पहिली गोष्ट म्हणजे, यहोवा “दयाळू व कृपाळू. . . मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे. (निर्गम ३४:६) दुसरी गोष्ट म्हणजे, दया दाखवली जावी म्हणून एखादी व्यक्‍ती हृदयपरिवर्तन करते तेव्हा तो “क्षमाशील” असतो. (स्तोत्र ८६:५)—१०/१ पृष्ठ १२, १३.

◻ यशया ६५:२१-२५ मध्ये भाकीत केलेली शांतीमय परिस्थिती केव्हा अस्तित्वात येईल?

आज आध्यात्मिक परादीसमध्ये यहोवाचे संघटित उपासक या नात्याने, अभिषिक्‍तजण आणि “दुसरी मेंढरे” देवाने दिलेल्या शांतीचा अनुभव घेत आहेत. (योहान १०:१६) आणि ‘देवाची इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होते तशी पृथ्वीवरही होईल’ तेव्हा ही शांती संपूर्ण पृथ्वीवर परादीस व्यापून टाकेल. त्यावेळी यशया संदेष्ट्याचे शब्द पूर्णपणे साकार होतील. (मत्तय ६:१०)—१०/१५, पृष्ठ २४.

◻ ख्रिश्‍चन लग्नाचा वाढदिवस साजरा करतात पण जन्मदिवस का नाही?

बायबल विवाहाला वाईट दृष्टिकोनात पाहात नाही. एखाद्याने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करावा की नाही ही त्यांची व्यक्‍तिगत बाब आहे. त्यांनी त्या प्रसंगाच्या आनंदावर विचार आणि दांपत्य या नात्याने यश मिळवण्याकरता कार्य करण्याचा दृढ निश्‍चय केला पाहिजे. बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेले जन्मदिवसाचे अहवाल केवळ मूर्तीपूजकांविषयीचेच आहेत व क्रुर घटनांशी त्यांचा संबंध जोडला जातो.—१०/१५, पृष्ठ ३०, ३१.

◻ पौलाने १ करिंथकर ३:१२, १३ मध्ये नमूद केलेल्या दाखल्यातील “अग्नी” कशाला चित्रित करतो, व सर्व ख्रिश्‍चनांनी कशाविषयी जागृत असले पाहिजे?

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक अग्नीपरिक्षा असते—म्हणजेच आपल्या विश्‍वासाची परिक्षा. (योहान १५:२०; याकोब १:२, ३) आपण ज्यांना सत्य शिकवू त्यांच्या विश्‍वासाची परिक्षा होईलच. आपण व्यवस्थितरित्या शिकवले नाही तर त्याचे दुःखद परिणाम घडू शकतात, असा पौलाने इशारा दिला. (१ करिंथकर ३:१५)—११/१, पृष्ठ ११.

◻कशाप्रकारे ‘नोहा देवाबरोबर चालला’? (उत्पत्ति ६:९)

देवाने जे त्याला सांगितले त्यानुसार वागण्याद्वारे नोहा देवाबरोबर चालला. यहोवाची इच्छा करण्यासाठी नोहाने आपले जीवन वाहून घेतल्यामुळे तो सर्वसमर्थ देवाबरोबर एक उबदार, जवळचा नातेसंबंध राखू शकला.—११/१५, पृष्ठ १०.

◻ दुष्टांवर देव केव्हा सूड उगवणार हे माहित नसल्यामुळे आपल्याला कोणत्या संधी मिळतात?

आपण यहोवावर मनापासून प्रीती करतो व त्याच्या मार्गात अनंतकाळ चालण्याची आपली इच्छा आहे हे शाबीत करण्यासाठी आपल्याला संधी मिळते. आपण देवाशी एकनिष्ठ आहोत व तो जे काही करील ते योग्यच असेल असा आपला भरवसा आहे हेही त्यावरून दिसून येते. शिवाय, यामुळे आपल्याला सावध व आध्यात्मिकरित्या जागृत राहण्यास मदत होते. (मत्तय २४:४२-४४)—११/१५, पृष्ठ १८.

◻ “देवाच्या पुत्राच्या नावावर विश्‍वास” ठेवणे याचा काय अर्थ आहे? (१ योहान ५:१३)

त्याचा अर्थ असा होतो की, ख्रिस्ताच्या सर्व आज्ञांचे पालन करणे आणि “एकमेकांवर प्रीती करावी,” ही देखील त्याची आज्ञा त्यामध्ये समाविष्ट आहे. (योहान १५:१४, १७) प्रेमामुळे लोकांचे चांगले करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे वांशिक, धार्मिक आणि सामाजिक पूर्वग्रह दूर होतात.—१२/१, पृष्ठ ७.

◻ यहोवाच्या साक्षीदारांचा “द्वेष” का केला जातो? (मत्तय १०:२२)

यहोवाच्या साक्षीदारांचा अन्यायीपणे तिरस्कार केला जातो त्याच कारणासाठी आरंभीच्या ख्रिश्‍चनांचा छळ करण्यात आला होता. पहिले कारण, यहोवाचे साक्षीदार धार्मिक विश्‍वास कशाप्रकारे आचरतात ते काहींना माहीत नसते. दुसरे कारण, यहोवाच्या साक्षीदारांवर खोटे आरोप करण्यात आले आहेत—धडधडीत खोटे आणि त्यांच्या विश्‍वासाचा विपर्यास केला जातो.—१२/१, पृष्ठ १४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा