वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • तुमचे काम आगीत टिकून राहील का?
    टेहळणी बुरूज—१९९८ | नोव्हेंबर १
    • १३. पौलाच्या दाखल्यातील अग्नी कशाला चित्रित करते, व सर्व ख्रिश्‍चनांनी कशाविषयी जागृत असावयास हवे?

      १३ आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक अग्नीपरीक्षा असते; आपल्या विश्‍वासाची परीक्षा. (योहान १५:२०; याकोब १:२, ३) आपल्याला जशी एक गोष्ट माहीत असावयास हवी तशीच करिंथमधील ख्रिश्‍चनांना देखील एक गोष्ट माहीत असावयास हवी होती, की आपण ज्यांना सत्य शिकवू त्या सर्वांची परीक्षा होईलच. आपण व्यवस्थितरीत्या शिकवले नाही तर त्याचे दुःखद परिणाम घडू शकतात. पौलाने इशारा दिला: “ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल, त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल; परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल.”c—१ करिंथकर ३:१४, १५.

      १४. (अ) शिष्य बनवणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना “तोटा” कसा होऊ शकतो पण तरीसुद्धा ते अग्नीतून कसे काय वाचू शकतात? (ब) आपण हानी कमी कशी करू शकू?

      १४ खरेच किती गंभीर विचार! खूप परिश्रमानंतर एखाद्याला शिष्य बनण्यास मदत केल्यावर, त्याने मोहपाशासमोर किंवा छळात हार मानली आणि कालांतराने सत्याचा मार्ग सोडून दिला तर ती अतिशय दुःखाची गोष्ट असू शकते. अशा वेळी आपलीच हानी होते हे पौल कबूल करतो. एक मनुष्य जसा अग्नीत आपले सर्व काही गमावतो परंतु फक्‍त स्वतः मरता मरता वाचतो त्याप्रमाणे हा अनुभव अतिशय क्लेशकारक जणू “अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा” असू शकतो. तेव्हा, ही हानी आपण कशाप्रकारे कमी करू शकतो? बांधकामासाठी टिकाऊ साहित्यांचा उपयोग करा! आपल्या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात जाईल अशाप्रकारे आपण शिकवतो व बुद्धी, समज, यहोवाबद्दलचे भय आणि अस्सल विश्‍वास यांसारख्या मौल्यवान ख्रिस्ती गुणांचे महत्त्व जाणण्यास त्यांना प्रवृत्त करतो म्हणजेच, आपण टिकाऊ, अग्नीरोधक साहित्यांचा उपयोग करून बांधकाम करीत असतो. (स्तोत्र १९:९, १०; नीतिसूत्रे ३:१३-१५; १ पेत्र १:६, ७) हे गुण प्राप्त करणारे देवाची इच्छा पूर्ण करीत राहतील; अनंतकाळ जगण्याची पक्की आशा त्यांना आहे. (१ योहान २:१७) परंतु, पौलाचा दाखला आपण वास्तविकतेत कसा काय उतरवू शकतो? काही उदाहरणांचा विचार करा.

  • तुमचे काम आगीत टिकून राहील का?
    टेहळणी बुरूज—१९९८ | नोव्हेंबर १
    • c बांधकाम करणाऱ्‍यावर नव्हे तर बांधकाम करणाऱ्‍याच्या ‘कामाची’ पौल शंका करीत होता. मराठी कॉमन लँग्वेज भाषांतरात हे वचन अशाप्रकारे आहे: “ज्या मनुष्याचे त्या पायावर रचलेले बांधकाम टिकेल त्याला मोबदला मिळेल. ज्याचे बांधकाम जळून जाईल त्याची हानी होईल हे खरे पण तरीही तो स्वतः मात्र वाचेल. परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तो वाचेल.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा