-
ख्रिस्तासारखी प्रौढता प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का?टेहळणी बुरूज—२०१५ | सप्टेंबर १५
-
-
२ यहोवाबद्दल शिकून बाप्तिस्मा घेतल्यानंतर एका व्यक्तीची वाढ तेवढ्यावरच थांबत नाही, तर यहोवासोबतचं आपलं नातं आणखी घनिष्ठ करण्याचा ती प्रयत्न करत राहते. यासाठी एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती बनण्याचं ध्येय ती आपल्यासमोर ठेवते. इथं ज्या प्रौढतेबद्दल आपण बोलत आहोत, ती वयानुसार होणारी वाढ नव्हे; तर एक अशी आध्यात्मिक वाढ आहे जी यहोवासोबत असणाऱ्या आपल्या जवळच्या नात्यामुळे होते. इफिसमधल्या ख्रिश्चनांनी अशीच आध्यात्मिक प्रौढता प्राप्त करावी अशी प्रेषित पौलाची इच्छा होती. त्यानं विश्वासात एक असण्याचं आणि “प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत” पोचण्याकरता येशूबद्दल शिकत राहण्याचं प्रोत्साहन त्यांना दिलं.—इफिस. ४:१३.
३. इफिस मंडळीप्रमाणेच आज यहोवाच्या लोकांची परिस्थिती आहे, असं आपल्याला का म्हणता येईल?
३ पौलानं जेव्हा पत्राद्वारे इफिस मंडळीला ही गोष्ट कळवली, तेव्हा या मंडळीची सुरवात होऊन काही वर्षं झाली होती. त्या मंडळीत बरेच जण चांगले अनुभवी आणि प्रौढ ख्रिश्चन होते. पण तिथं असेही काही जण होते ज्यांना अजूनही प्रगती करण्याची गरज होती. म्हणजे त्यांना यहोवासोबतचं आपलं नातं आणखी मजबूत करण्याची गरज होती. आजही अनेक वर्षं विश्वासूपणे यहोवाची सेवा करून, ख्रिस्ती प्रौढतेप्रत प्रगती केलेले कित्येक बंधुभगिनी आपल्यामध्ये आहेत. पण आपल्या मंडळीत असेही काही जण आहेत ज्यांनी अजून म्हणावी तितकी प्रगती केलेली नाही. उदाहरणार्थ, दरवर्षी अशा हजारो लोकांचा बाप्तिस्मा होतो, ज्यांना अजूनही ख्रिस्ती प्रौढतेप्रत प्रगती करण्याची गरज आहे. मग तुमच्याबद्दल काय?—कलस्सै. २:६, ७.
-
-
ख्रिस्तासारखी प्रौढता प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का?टेहळणी बुरूज—२०१५ | सप्टेंबर १५
-
-
५ एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती येशूच्या “पावलांवर पाऊल ठेवून” त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असते. (१ पेत्र २:२१) येशूनं म्हटलं, की एका व्यक्तीनं पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण जिवानं आणि पूर्ण मनानं यहोवावर प्रेम करणं व आपल्या शेजाऱ्यावरही स्वतःसारखं प्रेम करणं फार महत्त्वाचं आहे. (मत्त. २२:३७-३९) आध्यात्मिक रीत्या प्रौढ असणारी व्यक्ती या सल्ल्याचं पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. तिच्या जीवनातून हे अगदी स्पष्टपणे दिसून येतं की तिच्यासाठी यहोवासोबत असणारं तिचं नातं आणि इतरांप्रती असणारं तिचं गाढ प्रेमच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.
-