वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • “प्रकट केलेल्या गोष्टी . . .आपल्या आहेत”
    टेहळणी बुरूज—१९८७ | मे १
    • १०. यहोवाचे प्रकटीकरणाविषयीचे कोणते नवे माध्यम होते?

      १० मग ते नवे माध्यम कोणते होते? पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात या विषयीची ओळख देताना असे लिहिले की, “जो युगादिकालाचा संकल्प [देवाने] आपल्या प्रभु येशू ख्रिस्त मध्ये सिद्धीस नेला आहे [तो], त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान . . . मंडळीच्या द्वारे आता कळवावे.” (इफिसकर ३:१०, ११) होय, ही ख्रिस्ती मंडळी, जिचा जन्म इ.स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या वेळी झाला तिला नव्या “प्रकट केलेल्या गोष्टी” सोपविण्यात आल्या. अभिषिक्‍त ख्रिस्ती एक गट या अर्थी “विश्‍वासू व बुद्धिमान दास” असे काम करू लागले. यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न देण्यासाठी यांची नियुक्‍ति करण्यात आली होती. (मत्तय २४:४५) ख्रिस्ती आता “देवाच्या रहस्याचे कारभारी” बनले होते.—१ करिंथकर ४:१.

      ११, १२. या नव्या माध्यमाकरवी काही कोणती नवी प्रकटीकरणे देण्यात आली?

      ११ त्या नव्या “पवित्र गूजां”ची केंद्रीय आकृति स्वतः येशू ख्रिस्त, वचनयुक्‍त संतान होता व तो सामोरा आला होता. (गलतीकर ३:१६) येशू “शिलो” होता, ज्याला मानवजातीवर राज्य करण्याचा अधिकार होता. आणि यहोवाने त्याला अशा राज्याचा राजा असे नियुक्‍त केले जे या पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना करील. (यशया ११:१–९; लूक १:३१–३३) शिवाय येशू हा यहोवाचा नियुक्‍त प्रमुख याजकही होता, त्याने मानवजातीकरता आपले निष्कलंक व परिपूर्ण जीवन यज्ञार्पण या अर्थी वाहिले. हा रक्‍ताचे पावित्र्य या तत्वाचा अत्यंत अद्‌र्भित अवलंब होता. (इब्री ७:२६; ९:२६) याकरवीच, विश्‍वास राखणाऱ्‍या मानवजातीला आदामाने गमाविलेले परिपूर्ण मानवी जीवन परत प्राप्त होण्याची आशा लाभली.—१ योहान २:१, २.

      १२ हे वचनयुक्‍त संतान एक मध्यस्त असेही ठरले व त्याने, जुन्या नियमशास्त्र कराराची जागा आता ज्या नव्या कराराने घेतली होती तो, आपले अनुयायी व त्याचा स्वर्गीय पिता यांच्यामध्ये आपल्या मध्यस्तीकरवी सम्पन्‍न केला. (इब्रीयांस ८:१०–१३; ९:१५) या नव्या कराराच्या आधारावरच नव्या बहरत असलेल्या ख्रिस्ती मंडळीने दैहिक इस्राएल राष्ट्राची जागा घेतली व ती स्वतः आध्यात्मिक इस्राएल, येशू बरोबरचे “अब्राहामाचे [आध्यात्मिक] संतान” आणि “प्रकट केलेल्या गोष्टी”ची कारभारी बनली. (गलतीकर ३:२९; ६:१६; १ पेत्र २:९) याशिवाय यहुद्यांना कधीही विचार आला नव्हता ती गोष्ट म्हणजे आता विदेश्‍यांनाही त्या नव्या आध्यात्मिक इस्राएलाचा भाग बनण्यासाठी आमंत्रित करण्यात आले! (रोमकर २:२८, २९) यहुद्यांना व विदेश्‍यांना एकत्रपणे सबंध पृथ्वीभरात येशूचे शिष्य बनण्याची नियुक्‍ति लाभली. (मत्तय २८:१९, २०) अशा “प्रकट केलेल्या गोष्टीं”नी आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केले.

      १३. या नव्या “प्रकट केलेल्या गोष्टी” भावी पिढीसाठी कशा राखल्या गेल्या?

      १३ काही काळातच, ख्रिस्ती मंडळीद्वारे या “प्रकट केलेल्या गोष्टी” ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या २७ पुस्तकात नमूदित झाल्या व याकरवी प्रेरित पवित्र शास्त्राचा खंड पुरा झाला. तरीपण या पुस्तकांमध्ये परत एकदा यहोवाच्या उद्देशासंबंधी असे भविष्यवाद मुद्रित झाले की ज्यांची समज पुर्णपणे पुष्कळ शतकानंतर ज्ञात होणार होती. परत एकदा शास्त्रवचनांचे लेखक अद्याप जन्मास न आलेल्या भावी पिढ्यांकरता खरीखुरी सेवा सादर करीत होते.

  • “प्रकट केलेल्या गोष्टी . . .आपल्या आहेत”
    टेहळणी बुरूज—१९८७ | मे १
    • १६. यहोवाचे आधुनिक माध्यम या अर्थी कोण असल्याचे सिद्ध झाले?

      १६ येशूने म्हटले की देवाचे राज्य यहुद्यांपासून काढून घेतले जाईल व “जे राष्ट्र त्याचे फळ देईल त्याला ते दिले जाईल.” (मत्तय २१:४३) पहिल्या शतकात ते राष्ट्र आध्यात्मिक इस्राएलांची नवी ख्रिस्ती मंडळी असल्याचे दिसले. आज त्या आरंभीच्या मंडळीसारखी फलप्राप्ती निपजविणारा केवळ एकच गट दिसून येत आहे. हे आध्यात्मिक इस्त्राएल मत्तय २४:४५–४७ मध्ये उल्लेखित असलेल्या “विश्‍वासू व बुद्धिमान दास” वर्गाचे सदस्य आहेत. सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणेच सध्याचे ख्रिस्तीजन ‘आपला उजेड पाडण्यास’ भ्याले नाहीत. (मत्तय ५:१४–१६) १९१९ पासून सुरुवात करून त्यांनी राज्याची सुवार्ता साक्ष म्हणून सर्व जगाला घोषित करण्याचे काम मोठ्या धैर्याने हाती घेतले. (मत्तय २४:१४) यांनी देवाच्या राज्याची फलप्राप्ती सामोरी आणल्यामुळे यहोवाने त्यांना “देवाचे नानाविध ज्ञान” याच्या बाबतीत अद्यावतपणाप्रत आणून समृद्धरित्या आशीर्वादित केले. —इफिसकर ३:१०.

      १७, १८. यहोवाने आपल्या आधुनिक माध्यमातर्फे कोणती प्रगतिशील समजावणूक शक्य केली?

      १७ अशाप्रकारे १९२३ मध्ये येशूने शेरडे व मेंढरे याविषयी दिलेल्या थोर भविष्यवादाची समज प्राप्त झाली आणि तेव्हाच, सबंध जग हे न्यायदंडाखाली आहे हेही कळले. (मत्तय २५:३१–४६) १९२५ मध्ये देवाच्या पृथ्वीवरील सेवकांना प्रकटीकरण अध्याय १२ची अचूक समज मिळण्याचा ठेवा मिळाला व त्याकरवी १९१४ या चिन्हांकित वर्षी नेमके काय घडले याचे त्यांना आकलन झाले. १९३२ मध्ये त्यांची समज आणखी खोलवर मुळावली गेली. यहोवाने हे प्रकटविले की यहुद्यांचे यरूशलेमास परतणे होऊन तेथे ते पुनर्स्थापित होतील यासंबंधी असणारे भविष्यवाद, जे कित्येक काळाअधी अविश्‍वासू बनले व ज्यांना यहोवाने त्यागिले त्या दैहिक इस्राएलांस अनुलक्षून नाहीत तर आध्यात्मिक इस्राएल, ख्रिस्ती मंडळीस अनुलक्षून आहेत. (रोमकर २:२८, २९) मग १९३५ मध्ये प्रकटीकरणाच्या ७व्या अध्यायात असणाऱ्‍या योहानाच्या दृष्टांतात दिसलेल्या “मोठा लोकसमुदाया” बाबतच्या अचूक समजप्राप्तीने अभिषिक्‍त जणांचे डोळे त्या लोकसमुदायाच्या भव्य एकत्रीकरणासाठी उघडले गेले. अजूनही हे काम चालूच आहे.—प्रकटीकरण ७:९–१७.

      १८ यामुळे जगव्याप्त प्रचाराच्या कामाची मोठी लाट उसळली गेली आणि “पृथ्वीवरील गोष्टी” एकत्रित करण्यामध्ये मोठी पराकाष्ठा दिसली. (इफिसकर १:१०) १९३९ मध्ये युरोपावर युद्धाचे ढग जमले तेव्हा तटस्थ राहण्याविषयीचे महत्व पूर्वी नव्हते इतक्या अधिक स्पष्टपणे सामोरे मांडले गेले. १९५० मध्ये यशया ३२:१, २ मधील “सरदार” यांची विस्तारीत स्वरूपाची ओळख मिळाली. १९६२ मध्ये “वरिष्ठ अधिकारी” यांची अचूक ओळख व ख्रिश्‍चनांचा त्यांच्याशी असणारा योग्य नातेसंबंध या गोष्टीही “प्रकट केलेल्या गोष्टी” मुळे अधिक स्पष्ट झाल्या. (रोमकर १३:१, २) यानंतर १९६५ मध्ये पार्थिव पुनरूत्थान व त्याचा कोणाला लाभ घडेल याची अधिक स्पष्ट समजावणूक मिळाली.—योहान ५:२८, २९.

      १९. यहोवाचा “दास” वर्ग देवाच्या वचनाचा आज खरा रखवालदार आहे हे कसे सिद्ध झाले?

      १९ याशिवाय या २०व्या शतकातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची मंडळी, “प्रकट केलेल्या गोष्टीं”चे लिखित संकलन असणाऱ्‍या देवाच्या वचनाचा खरा रखवालदार असल्याचे सिद्ध झाली. या मंडळीच्या प्रातिनिधिक सदस्यांनी पवित्र शास्त्राचे आधुनिक इंग्रजी भाषेत भाषांतर करण्याचे काम हाती घेतले व आज न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ दी होली स्क्रिपचर्स ११ भाषेत दिसले व त्यांच्या एकंदर ४,००,००,००० प्रती छापल्या गेल्या. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा “दास” वर्ग आंतराष्ट्रीयपणे शैक्षणिक कार्यक्रम चालवितो व तो पवित्र शास्त्र आधारित क्रमिक पुस्तके व मासिके छापतो. शिवाय तो साप्ताहिक सभा, नियमित संमेलने आणि विविध शाळा यांना सुद्धा संचालित करतो—हे सर्व काही सत्य शोधकांना “प्रकट केलेल्या गोष्टीं” विषयीचे अचूक ज्ञान मिळावे याकरता योजित आहे. खरेच, “धार्मिक जण” आता आध्यात्मिक अर्थाने “सूर्यासारखे चकाकत” असून आपल्या कारभारीपदाची योग्यता सिद्ध करीत आहेत.—मत्तय १३:४३.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा