-
यहोवाची सेवा एकचित्ताने कराटेहळणी बुरूज—१९८९ | ऑगस्ट १
-
-
दुसऱ्यांना श्रेष्ठ माना
११. कोणा ख्रिश्चनाच्या हृदयी पक्षपात तरळत असेल तर त्याने काय करावे?
११ पण तेच, कोणी ख्रिस्ती एका वंश वा राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत पक्षपाती वृत्ती धरुन आहे तर हे त्याचे बोलणे व कृति याकरवी कदाचित प्रदर्शित होईल. यामुळे मंडळीत, ती खासपणे भिन्न पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांनी मिळून बनलेली असल्यामुळे तिच्यामध्ये दुःखी भावना निर्माण होतील. अशाप्रकारचा ताण देवाच्या लोकांच्या ऐक्यावर आणण्याची इच्छा खरेपणाने कोणीही करणार नाही. (स्तोत्रसंहिता १३३:१-३) तद्वत, कोणा ख्रिश्चनांच्या अंतःकरणात पक्षपातीपणाचा भाव तरळत असेल तर त्याने अशी प्रार्थना करणे योग्य आहेः “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण. माझ्याठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा; आणि मला सनातन मार्गाने चालीव.”—स्तोत्रसंहिता १३९:२३, २४.
१२. आम्ही आमच्याविषयी किंवा आमच्यासारखीच पार्श्वभूमी असणाऱ्यांविषयी अहंकार का बाळगू नये?
१२ याशिवाय आम्ही वास्तववादी दृष्टीकोण ग्रहण केला पाहिजे की, आम्ही सर्वच अपूर्ण मानव आहोत आणि जर येशू ख्रिस्ताचे यज्ञार्पण झाले नसते तर आम्हापैकी कोणालाही देवासमोर उभे राहता आले नसते. (१ योहान १:८-२:२) तर मग, आम्हात इतरांपेक्षा वेगळेपण ते काय आहे? वस्तुतः आम्हाला काहीच देण्यात आलेले नाही तर आम्ही आमच्या स्वतःबद्दल किंवा आमच्यासारखी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांविषयी अहंकार का दाखवावा?—पडताळा १ करिंथकर ४:६, ७.
१३. आम्ही मंडळीच्या ऐक्यास कसा हातभार लावू शकतो, आणि फिलिप्पैकर २:१-११ पासून काय शिकायला मिळते?
१३ इतरांठायी दिसत असलेल्या चांगल्या गुणांविषयी आपली मान्यता व रसिकता व्यक्त केल्यास याकरवी आपण मंडळीच्या ऐक्याला हातभार लावू शकतो. यहुदी प्रेषित पौलाने विदेशी फिलिप्पैकरांना पत्र लिहिले तेव्हा त्याने त्यामध्ये आमच्यासाठीही विचाराला खाद्य दिले होते. तो म्हणालाः “तुम्ही . . . एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करु नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.” आम्ही कोणत्याहि वंशाविषयी वा राष्ट्राच्या लोकांबद्दल कोणती योग्य वृत्ती दाखवावी त्याचे उदाहरण येशू ख्रिस्तात दिसते. तो प्रबळ असा आत्मिक प्राणी होता तरीही तो ‘मनुष्यप्रकृतीचा असा प्रगट झाला’ आणि प्रत्येक वंश व राष्ट्रातील पापी मानवांसाठी वधस्तंभावरील मरण प्राप्त करण्याइतके त्याने स्वतःला लीन केले. (फिलिप्पैकर २:१-११) आता येशूचे अनुयायी या नात्याने आपणही प्रेमळ, लीन, तसेच कनवाळू होऊन आपणापेक्षा इतरांना श्रेष्ठ मानावयास नको का?
ऐका व निरिक्षण करा
१४. इतर आपणापेक्षा श्रेष्ठ आहेत याचा विचार करण्यात आपणाला कशी मदत मिळू शकते?
१४ दुसरे बोलतात तेव्हा आम्ही खरेच लक्ष दिले आणि त्यांच्या वागणूकीचे निरिक्षण केले तर इतर आम्हापेक्षा श्रेष्ठ आहेत हा विचार राखण्याची आपल्याला मदत मिळेल. उदाहरणार्थ, आम्हामधील सोबतचे वडील, जे दुसऱ्या वंशाचे असतील, त्यांना, ईश्वरशासित शाळेत आम्हापेक्षा उत्तम सूचना सादर करता येतात हे आम्हाला कदाचित प्रामाणिकपणे मान्य करावे लागेल. आम्हाला हे दिसेल की त्यांची भाषाशैली नव्हे तर त्यांच्याठायी असणारी आध्यात्मिकता यामुळे त्यांना आपल्या बांधवांना राज्याचे प्रभावी घोषक बनण्यात इतके चांगले परिणाम मिळत आहेत. याखेरीज, यहोवा त्यांच्या परिश्रमावर आशीर्वाद देत आहे हे उघड आहे.
१५. आमच्या सहउपासकांची विधाने आपण ऐकल्यावर आपल्याला कशाची जाण मिळेल?
१५ आम्ही आमच्या बंधुभगिनींसोबत बोलू वा सभांमध्ये ते देत असलेले अभिप्राय लक्षपूर्वक ऐकू तेव्हा आपल्याला कळेल की, यापैकी काहींना काही शास्त्रवचनीय सत्याची आम्हापेक्षा अधिक जाण आहे. त्यांच्याठायी बलवान बंधुप्रेम आहे, अधिक विश्वास आहे किंवा यहोवावर त्यांचा अधिक भाव असल्याचे दिसत आहे हे देखील आपणाला जाणवेल. मग, ते आमच्या विशिष्ठ पार्श्वभूमीचे असोत की नसोत, ते प्रीती व सत्कर्मे करावयाला उत्तेजन देत असतात, आमचा विश्वास मजबूत करण्यास मदत देतात आणि आमच्या स्वर्गीय पित्यावर अधिक पूर्णतेने आपला भाव ठेवण्याची चालना देत राहतात. (नीतीसूत्रे ३:५, ६; इब्रीयांस १०:२४, २५, ३९) यहोवाने त्यांना आपल्या जवळ केले आहे तर मग, आपणही तेच करावे.—पडताळा याकोब ४:८.
-
-
यहोवाची सेवा एकचित्ताने कराटेहळणी बुरूज—१९८९ | ऑगस्ट १
-
-
२०. प्रत्येक वंश व राष्ट्रातील आमच्या समविश्वासूंविषयीचा आमचा आदर कसा वाढीस लागेल?
२० खरेच, यहोवा प्रत्येक राष्ट्रातील व वंशाच्या त्याच्या सेवकांना आशीर्वाद देतो व त्यांचा संभाळ करतो हे निर्विवाद आहे. तो पक्षपाती नाही व यामुळेच आम्ही पक्षपाती असण्याला कोणतीही सबब वा कारण राहात नाही. आम्ही आमच्या प्रत्येक राष्ट्र व वंशांच्या बंधु-भगिनींच्या बाबतीत, ते ज्या ज्या विषयांमध्ये आपणापेक्षा श्रेष्ठ आहेत त्याचा विचार केला तर त्यांच्याविषयीचा आमचा आदर वाढतच राहील. ते देखील स्वर्गीय ज्ञानाचा अवलंब करीत असल्यामुळे पक्षपात व भेदाभेद त्यांच्याकडून होत नाही तर उलट सुंदर फलप्राप्ती निर्माण होते. (याकोब ३:१३-१८) होय, त्यांचा दयाळूपणा, औदार्य, प्रेम आणि इतर ईश्वरी गुण आम्हापुढे चांगले उदाहरण राखून आहेत.
-