वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • बायबलचा अभ्यास करत राहायला तुम्हाला कशामुळे मदत होईल?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • ४. बायबल अभ्यासाला महत्त्व द्या

      आजच्या धकाधकीच्या जीवनात कधीकधी आपल्याला वाटू शकतं की आपल्याकडे बायबल अभ्यास करायला वेळच नाही. मग अशा वेळी आपण काय करू शकतो? फिलिप्पैकर १:१० वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

      • तुमच्या मते जीवनात कोणत्या गोष्टी “जास्त महत्त्वाच्या” आहेत?

      • बायबल अभ्यास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?

      १. चित्रं: बादलीत दगड आणि रेती असलेली चित्रं. १. रेतीचा आणि दगडांचा ढीग. २. बादली रेतीने अर्धी भरलेली आहे. ३. बादलीत रेतीच्यावर काही दगड ठेवले आहेत आणि काही दगड खाली पडलेले आहेत. २. चित्रं: १. रेतीचा आणि दगडांचा तोच ढीग. २. बादली दगडांनी भरलेली आहे. ३. बादलीत दगड असूनही जवळजवळ पूर्ण रेती त्यात मावली आहे. उरलेली थोडीशी रेती खाली पडली आहे.
      1. १. बादलीत रेती टाकली आणि मग दगड टाकले तर ते मावणार नाहीत

      2. २. पण आधी दगड टाकले तर जवळजवळ सगळी रेती मावेल. तसंच, जर तुम्ही “जास्त महत्त्वाच्या” गोष्टी आधी केल्या तर त्या करण्यासोबतच इतर गोष्टींसाठीही तुमच्याकडे वेळ राहील

      आपल्या सगळ्यांमध्ये देवाला जाणून घ्यायची आणि त्याची उपासना करायची भूक असते. आणि ही भूक आपण बायबल अभ्यास करण्याद्वारे भागवू शकतो. मत्तय ५:३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

      • बायबल अभ्यासाला महत्त्व दिल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो?

  • यहोवाच्या दृष्टीने चांगलं मनोरंजन निवडा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • ४. वेळेचा चांगला उपयोग करा

      व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

      व्हिडिओ: तुमचा वेळ कुठे जातोय? (२:४५)

      • व्हिडिओमधला भाऊ काही चुकीचं पाहत नव्हता. तरीसुद्धा, तो आपल्या फावल्या वेळाचा जसा उपयोग करत होता, त्यामुळे त्याच्यावर कसा परिणाम झाला?

      फिलिप्पैकर १:१० वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

      • मनोरंजनात किती वेळ घालवावा हे ठरवण्यासाठी हे वचन आपल्याला कशी मदत करू शकतं?

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा