-
बायबलचा अभ्यास करत राहायला तुम्हाला कशामुळे मदत होईल?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
५. विरोध झाला तरी हार मानू नका
कधीकधी काही जण तुम्हाला बायबल अभ्यास करण्यापासून रोखायचा प्रयत्न करतील. फ्रांचेस्कोचं उदाहरण पाहू या. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा.
फ्रांचेस्कोने तो शिकत असलेल्या गोष्टी आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला सांगितल्या तेव्हा त्यांना कसं वाटलं?
हार न मानल्यामुळे त्याला कोणते आशीर्वाद मिळाले?
२ तीमथ्य २:२४, २५ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
तुम्ही जे शिकताय त्याबद्दल तुमच्या घरच्यांना आणि मित्रांना काय वाटतं?
तुम्ही बायबल शिकताय यावरून काही जण नाराज झाले, तरी या वचनांप्रमाणे तुम्ही काय केलं पाहिजे? आणि का?
-
-
तुम्हीही इतरांना आनंदाचा संदेश कसा सांगू शकता?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
इतरांना आनंदाचा संदेश सांगताना तुम्ही काय बोलाल याकडेच नाही, तर ते कसं बोलाल याकडेही लक्ष द्या. २ तीमथ्य २:२४ आणि १ पेत्र ३:१५ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
इतरांशी बायबलबद्दल बोलताना, तुम्ही या वचनांमध्ये दिलेल्या सल्ल्याचा कसा उपयोग कराल?
तुमच्या घरच्यांना किंवा मित्रांना तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कदाचित पटणार नाहीत. अशा वेळी तुम्ही काय करू शकता? तुम्ही काय नाही केलं पाहिजे?
‘हेच बरोबर आहे’ असं म्हणण्याऐवजी, दुसऱ्यांच्या भावना न दुखवता, प्रश्न विचारून योग्य निष्कर्षावर पोहोचायला मदत करणं का चांगलंय?
-