-
तुम्ही कशा प्रकारचा ‘आत्मा’ दाखवता?टेहळणी बुरूज—२०१२ | ऑक्टोबर १५
-
-
“आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्ही दाखवत असलेल्या आत्म्याबरोबर असो.” —फिले. २५, NW.
-
-
तुम्ही कशा प्रकारचा ‘आत्मा’ दाखवता?टेहळणी बुरूज—२०१२ | ऑक्टोबर १५
-
-
१. पौलाने आपल्या सहविश्वासू बांधवांना लिहिताना कोणती आशा व्यक्त केली?
प्रेषित पौलाने आपल्या सहविश्वासू बांधवांना लिहिताना, वारंवार ही आशा व्यक्त केली की मंडळ्या ज्या प्रकारचा आत्मा दाखवतात त्यास देवाची व ख्रिस्ताची मंजूरी असेल. उदाहरणार्थ, गलतीकरांस त्याने असे लिहिले: “आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्ही दाखवत असलेल्या आत्म्याबरोबर असो. आमेन.” (गलती. ६:१८, NW) “तुम्ही दाखवत असलेल्या आत्म्याबरोबर,” असे पौलाने म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?
२, ३. (क) पौलाने काही वेळा ‘आत्मा’ हा शब्द, कोणत्या अर्थाने वापरला? (ख) आपण दाखवत असलेल्या मनोवृत्तीविषयी आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
२ पौलाने या संदर्भात ‘आत्मा’ हा शब्द, एक प्रेरक शक्ती किंवा वृत्ती या अर्थाने वापरला आहे, जी आपल्याला विशिष्ट प्रकारे बोलण्यास अथवा वागण्यास लावते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती सौम्य, विचारशील, नम्र, उदार किंवा क्षमाशील असू शकते. “सौम्य व शांत आत्मा” आणि “शांत” वृत्ती असणे चांगले असल्याचे बायबल सांगते. (१ पेत्र ३:४; नीति. १७:२७) दुसरीकडे पाहता, आणखी एखादी व्यक्ती टोमणे मारणारी, भौतिकवादी, सहज वाईट मानणारी किंवा स्वतंत्र वृत्तीची असू शकते. याहूनही वाईट म्हणजे, काही लोक अशुद्ध, अवज्ञाकारी, इतकेच काय तर बंडखोर मनोवृत्ती दाखवतात.
३ त्याअर्थी, तुम्ही “दाखवत असलेल्या आत्म्याबरोबर प्रभू असो” असे जेव्हा पौलाने म्हटले, तेव्हा तो आपल्या बांधवांना देवाच्या इच्छेच्या व ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्त्वाच्या सामंजस्यात असलेली मनोवृत्ती दाखवण्याचे प्रोत्साहन देत होता. (२ तीम. ४:२२, NW; कलस्सैकर ३:९-१२ वाचा.) आज आपण स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘मी कशा प्रकारची मनोवृत्ती दाखवत आहे? देवाला आनंद होईल अशी मनोवृत्ती आणखी चांगल्या प्रकारे मला कशी दाखवता येईल? मंडळीच्या एकंदर सकारात्मक मनोवृत्तीला हातभार लावण्याच्या बाबतीत मला आणखी सुधारणा करता येईल का?’ उदाहरणार्थ, सूर्यफुलांच्या शेताचा विचार करा. शेताच्या एकंदरीत सौंदर्यात प्रत्येक फुलाचा वाटा असतो. त्या फुलांप्रमाणे, आपणही आपल्या मंडळीच्या एकंदरीत सौंदर्यात भर घालतो का? आपण नक्कीच तसे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मग, देव ज्या मनोवृत्तीमुळे आनंदित होतो ती दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो हे आता पाहू या.
-