-
“खरा पाया असलेल्या शहराची” तुम्ही वाट पाहत आहात का?टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०२० | ऑगस्ट
-
-
अब्राहामने यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास असल्याचं कसं दाखवलं? (परिच्छेद ५ पाहा)
५. देवाने रचना केलेल्या “शहराची” अब्राहाम वाट पाहत होता हे आपण कशावरून म्हणू शकतो?
५ देवाने ज्या “शहराची,” किंवा राज्याची रचना केली त्याची अब्राहाम वाट पाहत होता हे त्याने कसं दाखवून दिलं? एक म्हणजे, पृथ्वीवरच्या कोणत्याही राज्याचा तो नागरिक बनला नाही. तो कुठल्याही एका ठिकाणी स्थायिक झाला नाही. आणि कोणत्याही मानवी राजाला त्याने कधीही आपला पाठिंबा दिला नाही. तर, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत राहिला. याशिवाय, त्याने स्वतःचं राज्य उभं करण्याचाही कधी प्रयत्न केला नाही. याउलट, तो यहोवाच्या आज्ञा पाळत राहिला आणि त्याचं अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहत राहिला. या सगळ्या गोष्टींतून अब्राहामने दाखवून दिलं, की त्याचा यहोवावर मजबूत विश्वास आहे. देवाचं अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहत असताना अब्राहामला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, आणि त्याच्या या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो, हे आता आपण पुढे पाहू या.
-
-
“खरा पाया असलेल्या शहराची” तुम्ही वाट पाहत आहात का?टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०२० | ऑगस्ट
-
-
७. यहोवा आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करेल असा भरवसा अब्राहामला का ठेवावा लागणार होता?
७ यहोवा आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करेल असा भरवसा अब्राहामला ठेवावा लागणार होता. का? कारण ऊर शहरातलं आपलं सुरक्षित आणि आरामदायी घर सोडल्यानंतर अब्राहाम आणि सारा आता कनान देशात खुल्या मैदानांमध्ये तंबूंत राहत होते. तिथे आधीसारखं त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मजबूत भिंती आणि कालवे नव्हते. उलट, आता ते अशा परिस्थितीत राहत होते जिथे शत्रू सहज त्यांच्यावर हल्ला करू शकत होते.
८. अब्राहामसमोर कोणत्या अडचणी आल्या?
८ अब्राहाम नेहमी देवाच्या इच्छेप्रमाणे वागला. पण तरीसुद्धा त्याला काही अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्या जीवनात अशी एक वेळ आली जेव्हा त्याला आपल्या कुटुंबाचं पोट भरणं मुश्कील गेलं. कारण ज्या देशात यहोवाने त्याला पाठवलं होतं त्याच देशात एक मोठा दुष्काळ पडला होता. दुष्काळ इतका भयंकर होता, की काही काळासाठी त्याला आपल्या कुटुंबाला घेऊन इजिप्तमध्ये राहायला जावं लागलं. पण तिथे गेल्यावरसुद्धा त्याला आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला. इजिप्तच्या राजाने, म्हणजे फारोने अब्राहामच्या पत्नीला स्वतःकडे ठेवून घेतलं. हे खरं आहे, की यहोवाने साराला फारोच्या हातून सोडवलं. पण तोपर्यंत अब्राहामला किती मनस्ताप झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो.—उत्प. १२:१०-१९.
९. अब्राहामच्या कौटुंबिक जीवनात कोणत्या समस्या निर्माण झाल्या?
९ अब्राहामच्या कौटुंबिक जीवनातसुद्धा काही गंभीर समस्या निर्माण झाल्या. त्याची पत्नी सारा हिला मूल होत नव्हतं. आणि या गोष्टीचं दुःख अनेक वर्षं त्यांच्या मनात होतं. आपल्याला मुलं असावीत म्हणून शेवटी साराने, आपली दासी हागार ही बायको म्हणून अब्राहामला दिली. पण आपण गरोदर आहोत हे समजल्यावर हागार साराला तुच्छ लेखू लागली. त्या दोघींमधले संबंध इतके बिघडले की शेवटी हागार घर सोडून पळून गेली.—उत्प. १६:१-६.
१०. इश्माएल आणि इसहाकच्या बाबतीत असं काय घडलं ज्यामुळे अब्राहामला यहोवावर भरवसा ठेवणं कठीण जाऊ शकलं असतं?
१० शेवटी सारा गरोदर राहिली आणि अब्राहामपासून तिला एक मुलगा झाला. अब्राहामने त्याचं नाव इसहाक ठेवलं. अब्राहामचं आपल्या दोन्ही मुलांवर, म्हणजे हागारपासून झालेल्या इश्माएलवर आणि इसहाकवर प्रेम होतं. पण इश्माएल इसहाकला छळत होता. त्यामुळे इश्माएला आणि हागारला घरातून घालवून देण्याशिवाय अब्राहामसमोर दुसरा पर्याय उरला नाही. (उत्प. २१:९-१४) पुढे अनेक वर्षांनंतर यहोवाने अब्राहामला इसहाकचं बलिदान द्यायला सांगितलं. (उत्प. २२:१, २; इब्री ११:१७-१९) या दोन्ही परिस्थितींत अब्राहामला हा भरवसा ठेवायचा होता, की यहोवाने त्याच्या दोन्ही मुलांच्या बाबतीत जी अभिवचनं दिली होती ती तो नक्की पूर्ण करेल.
११. अब्राहामला धीराने वाट का पाहावी लागली?
११ अब्राहामच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. या संपूर्ण काळादरम्यान त्याला धीराने वाट पाहावी लागणार होती. त्याने आणि त्याच्या कुटुंबाने ऊर शहर सोडलं तेव्हा तो ७० पेक्षा जास्त वर्षांचा असावा. (उत्प. ११:३१–१२:४) जवळपास १०० वर्षं त्याने कनान देशात प्रवास केला आणि तो ठिकठिकाणी तंबूंमध्ये राहिला. शेवटी १७५ वर्षांचा असताना त्याचा मृत्यू झाला. (उत्प. २५:७) पण जो कनान देश त्याच्या वंशजांना द्यायचं अभिवचन यहोवाने दिलं होतं, ते पूर्ण होताना त्याने पाहिलं नाही. आणि ज्या “शहराची,” म्हणजे देवाच्या राज्याची तो वाट पाहत होता ते स्थापन होईपर्यंत तो जिवंत राहिला नाही. पण तरीसुद्धा, अब्राहामबद्दल बायबल म्हणतं, की तो “म्हातारा होऊन सुखाने मरण पावला.” (उत्प. २५:८, NW) अब्राहामसमोर अनेक अडचणी आल्या, पण तरीसुद्धा त्याने यहोवावर आपला विश्वास टिकवून ठेवला. तसंच, यहोवाने दिलेली अभिवचनं पूर्ण होईपर्यंत तो धीराने वाट पाहत राहिला. अब्राहाम धीराने वाट का पाहू शकला? कारण त्याच्या संपूर्ण आयुष्यात यहोवाने त्याचं संरक्षण केलं होतं आणि त्याला एका मित्रासारखं वागवलं होतं.—उत्प. १५:१; यश. ४१:८; याको. २:२२, २३.
-