-
तुम्ही शेवटपर्यंत धीर धरू शकताटेहळणी बुरूज—१९९९ | ऑक्टोबर १
-
-
१० ख्रिश्चन जीवनाच्या ज्या शर्यतीत धावत आहेत त्यात प्रेक्षक कोण आहेत? इब्री लोकांस पुस्तकाच्या ११ व्या अध्यायात ख्रिस्त-पूर्व काळातील यहोवाच्या विश्वासू साक्षीदारांची यादी सांगितल्यावर पौलाने लिहिले: “तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणहि . . . आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.” (इब्री लोकांस १२:१) पौलाने मेघ यासारख्या रूपकाचा उपयोग केला तेव्हा त्याने, ठराविक विस्ताराच्या व आकाराच्या मेघाचे वर्णन करणाऱ्या ग्रीक शब्दाचा उपयोग केला नाही. तर, कोशकार डब्लू. ई. वाईन यांच्यानुसार त्याने, “आकाशातील ढगाळ दिसणाऱ्या व असंख्य मेघांना” सूचित होणारा शब्द वापरला. स्पष्टतः, पौलाच्या मनात साक्षीदारांचा मोठा समूह होता; हा समूह इतका मोठा होता की तो मेघांप्रमाणे वाटत होता.
११, १२. (अ) ख्रिस्त-पूर्व काळातील विश्वासू साक्षीदार आपल्याला धीराने शर्यतीत धावत राहण्यास प्रोत्साहन कसे देतील? (ब) ‘मेघरूपी साक्षीदारांकडून’ आपण पूर्ण फायदा कशाप्रकारे मिळवू शकतो?
११ ख्रिस्त-पूर्व काळातील विश्वासू ख्रिस्ती आजचे खरोखरचे प्रेक्षक होऊ शकतात का? ते शक्य नाही. ते तर मृत्यूत निद्रा घेत आहेत व पुनरुत्थानाची वाट पाहत आहेत. परंतु, ते जिवंत होते तेव्हा यशस्वी धावपटू होते; त्यांचे उदाहरण बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आले आहे. आपण शास्त्रवचनांचा अभ्यास करतो तेव्हा जणू हे विश्वासू जन आपल्या डोळ्यांसमोर अक्षरशः उभे राहतात व शेवटपर्यंत शर्यतीत टिकून राहण्यास आपल्याला जणू काय प्रोत्साहन देत राहतात.—रोमकर १५:४.a
१२ उदाहरणार्थ, आपल्याला जगात मोठे स्थान मिळवण्याच्या संधी मिळतात तेव्हा, मोशेने इजिप्तमधील ऐश्वर्याचा त्याग कसा केला यावर विचार केल्याने कदाचित आपणही शर्यतीत धावत राहण्यास प्रवृत्त होणार नाही का? आपल्यावर आलेली परीक्षा खूपच कठीण वाटते तेव्हा, आपल्या पुत्राला बलिदान करण्याची अब्राहामाला आज्ञा देण्यात आली तेव्हा त्याला किती कठीण गेले असेल याचा विचार केल्याने आपल्याला निश्चितच विश्वासाच्या स्पर्धेत हार न मानण्याचे उत्तेजन मिळू शकेल. हे ‘मेघरूपी’ साक्षीदार अशाप्रकारे आपल्याला कितपत प्रेरणादायक ठरणार आहेत ते, आपण आपल्या ज्ञानचक्षुंनी त्यांना किती स्पष्टपणे पाहतो त्यावर अवलंबून आहे.
१३. आधुनिक दिवसांतील यहोवाचे साक्षीदार आपल्याला जीवनाच्या शर्यतीत प्रेरणा कशी देत राहतात?
१३ या आधुनिक दिवसांतही आपल्या सभोवती यहोवाचे अनेक साक्षीदार आहेत. अभिषिक्त ख्रिश्चनांनी व स्त्रीपुरुषांच्या ‘मोठ्या लोकसमुदायाने’ विश्वासाची कितीतरी उत्तम उदाहरणे मांडली आहेत! (प्रकटीकरण ७:९) या मासिकात आणि वॉच टावर प्रकाशनांत आपण वेळोवेळी त्यांच्या जीवन कथा वाचू शकतो.b त्यांच्या विश्वासावर आपण मनन करतो तेव्हा शेवटपर्यंत धीर धरण्याचे प्रोत्साहन आपल्याला मिळते. शिवाय, विश्वासूपणे यहोवाची सेवा करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रजनांचा व आप्तजनांचा पाठिंबा असणे किती सुखदायक आहे! होय, जीवनाच्या शर्यतीत आपल्याला प्रोत्साहन देणारे अनेकजण आहेत.
वेग सुज्ञपणे ठरवा
१४, १५. (अ) आपण आपल्या धावण्याचा वेग सुज्ञपणे ठरवणे महत्त्वाचे का आहे? (ब) ध्येय ठेवताना आपण समजदार का असले पाहिजे?
१४ लांब पल्ल्याच्या शर्यतीत म्हणजे मॅरेथॉन शर्यतीत धावताना धावपट्टूने त्याचा वेग सुज्ञपणे ठरवला पाहिजे. न्यू यॉर्क रनर नावाच्या एका मासिकाने म्हटले, “सुरवातीलाच वेगाने धावण्यास सुरू केल्याने तुम्हाला कदाचित यश मिळणार नाही. तुम्हाला एकतर शेवटचे अनेक मैल जोराचा यत्न करावा लागेल किंवा शर्यत मध्येच सोडावी लागेल.” मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेल्या एकाने म्हटले: “शर्यतीच्या तयारीनिमित्त असलेल्या एका भाषणाला मी उपस्थित राहिलो होतो तेव्हा वक्त्याने स्पष्टपणे ताकीद दिली होती: ‘वेगाने धावणाऱ्यांबरोबर तुम्हीही धावण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जमेल त्या वेगाने धावा. नाहीतर तुम्ही थकाल आणि कदाचित तुम्हाला शर्यत मध्येच सोडून द्यावी लागेल.’ या सल्ल्याचे पालन केल्यामुळे मी माझी शर्यत पूर्ण करू शकलो.”
१५ जीवनाच्या शर्यतीत, देवाच्या सेवकांना जोराचा यत्न करावा लागेल. (लूक १३:२४) पण शिष्य याकोबाने लिहिले: “वरून येणारे ज्ञान . . . समजूत होण्याजोगे . . . आहे.” (याकोब ३:१७) इतरांची सुंदर उदाहरणे आपल्याला आणखी प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देत असली तरी, समजूतदारपणा आपल्याला, आपल्या क्षमता आणि परिस्थिती यांच्या सुसंगतेत वास्तविक ध्येये ठेवण्यास मदत करील. शास्त्रवचने आपल्याला आठवण करून देतात: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.”—गलतीकर ६:४, ५.
१६. नम्रता आपल्याला वेग ठरवण्यास मदत कशी करू शकते?
१६ मीखा ६:८ मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आला आहे जो विचारप्रवर्तक आहे: “देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्वर तुजजवळ काय मागतो?” नम्रतेत, आपल्या मर्यादांची आपल्याला जाण असणे समाविष्ट आहे. आपली ढासळत चाललेली तब्येत किंवा वाढते वय यांमुळे देवाच्या आपल्या सेवेवर काही मर्यादा आल्या आहेत का? असल्यास, निराश होऊ नका. आपल्याजवळ ‘जे नाही त्यानुसार नव्हे तर जे आहे त्यानुसार’ यहोवा आपले परिश्रम व त्याग स्वीकारतो.—२ करिंथकर ८:१२; पडताळा लूक २१:१-४.
-
-
तुम्ही शेवटपर्यंत धीर धरू शकताटेहळणी बुरूज—१९९९ | ऑक्टोबर १
-
-
अंत जवळ येत असता
२०. अंत जसजसा जवळ येतो तसतसे जीवनाची शर्यत आणखी कठीण कशी होऊ शकते?
२० जीवनाच्या शर्यतीत धावताना आपल्याला आपला प्रमुख शत्रू, दियाबल सैतान याचाही सामना करावा लागतो. आपण अंताच्या जसजसे जवळ जात आहोत तसतसे तो आपला वेग कमी करण्याचा किंवा आपल्यासमोर अडथळे निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. (प्रकटीकरण १२:१२, १७) ‘अंतसमयाला’ चित्रित करणारी युद्धे, दुष्काळ, रोगराई आणि इतर कष्टमय गोष्टींनी वेढलेले असता, विश्वासू, राज्याचे समर्पित उद्घोषक म्हणून आपले काम चालू ठेवणे इतके सोपे नाही. (दानीएल १२:४; मत्तय २४:३-१४; लूक २१:११; २ तीमथ्य ३:१-५) शिवाय, कधीकधी आपण अपेक्षा करतो त्यापेक्षाही कितीतरी दूर अंत आहे असे आपल्याला वाटेल; आपण जीवनाच्या शर्यतीत खूप वर्षांपूर्वी प्रवेश केला असल्यास असे वाटणे साहजिक आहे. तरीपण, अंत हा येणारच याची देवाचे वचन आपल्याला हमी देते. त्याला विलंब होणार नाही, असे यहोवा म्हणतो. अंत आपल्या दृष्टीसमोर आहे.—हबक्कूक २:३; २ पेत्र ३:९, १०.
२१. (अ) जीवनाच्या शर्यतीत आपण धावत राहतो तसे कोणती गोष्ट आपल्याला दृढ करील? (ब) अंत जवळ येत असता आपला काय दृढ निश्चय असला पाहिजे?
२१ तेव्हा, जीवनाच्या शर्यतीत विजयी होण्याकरता आपण यहोवा प्रेमळपणे आपल्याला पुरवत असलेल्या आध्यात्मिक भरणपोषणातून शक्ती मिळवली पाहिजे. शिवाय, आपल्याबरोबर धावणाऱ्या आपल्या सहविश्वासूंसोबत नियमित संगती केल्यामुळे मिळणाऱ्या उत्तेजनाचीही आपल्याला आवश्यकता आहे. कडक छळ व अचानक ओढवणाऱ्या परिस्थितींमुळे शर्यतीत धावणे आपल्याला कठीण जात असले तरी, यहोवा आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देत असल्यामुळे आपण शेवटपर्यंत धीर धरू शकतो. (२ करिंथकर ४:७) आपण या शर्यतीत विजयी व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे हे माहीत होणे किती दिलासा देणारे आहे! “आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल,” हा भरवसा ठेवून आपण “आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने” धावत राहण्याचा दृढ निश्चय करू या.—इब्री लोकांस १२:१; गलतीकर ६:९.
-