वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अविश्‍वासापासून जपा
    टेहळणी बुरूज—१९९८ | जुलै १५
    • “आपली मने कठीण करू नका”

      १३. पौलाने कोणती ताकीद दिली आणि त्याने स्तोत्र ९५ कशाप्रकारे जोडले?

      १३ हिब्रू ख्रिश्‍चनांची अनुग्रहप्राप्त स्थिती लक्षात घेतल्यावर, पौलाने ही ताकीद दिली: “पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे ‘आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानांतील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका.’” (इब्री लोकांस ३:७, ८) पौल ९५ व्या स्तोत्रातील शब्द उद्धृत करीत होता आणि म्हणूनच “पवित्र आत्मा म्हणतो” असे तो म्हणू शकला.b (स्तोत्र ९५:७, ८; निर्गम १७:१-७) कारण बायबल हे देवाने आपल्या पवित्र आत्म्याकरवी प्रेरित केले आहे.—२ तीमथ्य ३:१६.

      १४. यहोवाने केलेल्या उपकारांप्रती इस्राएली लोकांची काय प्रतिक्रिया होती, आणि का?

      १४ मिसर देशातील गुलामीतून सुटका मिळाल्यावर इस्राएली लोकांना यहोवासोबत एका कराराच्या नातेसंबंधात प्रवेश करण्याचा मोठा सुहक्क देण्यात आला. (निर्गम १९:४, ५; २४:७, ८) देवाने त्यांच्यावर केलेल्या उपकारांबद्दल कृतज्ञता दाखवण्याऐवजी ते लवकरच विद्रोहीपणे वागू लागले. (गणना १३:२५–१४:१०) हे असे का झाले? पौलाने याचे नेमके कारण सांगितले: त्यांनी आपली मने कठीण केली. पण एकेकाळी देवाच्या वचनाप्रती संवेदनशील असणारी आणि त्यास प्रतिसाद देणारी मने कठीण कशी होतात? आणि असे होऊ नये म्हणून आपण काय करावे?

      १५. (अ) भूतकाळात आणि सद्यकाळात ‘देवाची वाणी’ कशाप्रकारे प्रकट झाली आहे? (ब) ‘देवाच्या वाणीच्या’ संबंधाने आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

      १५ पौलाने ताकीद देण्याआधी एक शर्त ठेवली, ती अशी की “जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर.” देव आपल्या लोकांसोबत मोशे आणि इतर संदेष्ट्यांच्या माध्यमाने बोलला. नंतर, यहोवा त्यांच्याशी आपला पुत्र, येशू ख्रिस्त याच्या माध्यमाने बोलला. (इब्री लोकांस १:१, २) आज आपल्याजवळ देवाचे संपूर्ण प्रेरित वचन, अर्थात पवित्र बायबल आहे. शिवाय, आध्यात्मिक अन्‍न “यथाकाळी खावयास देण्यासाठी” येशूने नेमलेला ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ देखील आहे. (मत्तय २४:४५-४७) अशा रितीने देव आजही बोलत आहे. पण आपण ऐकत आहोत का? उदाहरणार्थ पेहराव-शृंगार, मनोरंजन आणि संगीत यांविषयी मार्गदर्शन दिले जाते तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असते? आपण ‘ऐकतो’ का, अर्थात, जे आपण कानाने ऐकतो त्याकडे लक्ष देऊन त्याचे पालन करतो का? जेव्हाही मार्गदर्शन दिले जाते, तेव्हा सबबी सांगण्याची किंवा हरकत घेण्याची आपल्याला सवय असल्यास नकळत आपण आपली मने कठीण करण्याचा धोका पत्करत आहोत.

      १६. कोणता असा एक मार्ग आहे ज्याकरवी आपली मने कठीण होऊ शकतात?

      १६ तसेच, आपण जे करू शकतो आणि जे केले पाहिजे ते करण्यापासून जर अंग चोरतो तर याप्रकारे देखील आपली मने कठीण होऊ शकतात. (याकोब ४:१७) यहोवाने इस्राएली लोकांवर असंख्य उपकार केले होते तरीसुद्धा त्यांनी विश्‍वास दाखवला नाही; उलट त्यांनी मोशेच्या विरोधात विद्रोह केला, कनानविषयी नकारात्मकपणे बोलणाऱ्‍यांवर त्यांनी विश्‍वास ठेवला आणि वचनयुक्‍त देशात प्रवेश करण्यास नकार दिला. (गणना १४:१-४) त्यामुळे यहोवाने असे घोषित केले की ते ४० वर्षे अरण्यात भटकत राहतील—एवढ्या काळात त्या पिढीतील अविश्‍वासू लोक मरून जाणार होते. यहोवाला त्या लोकांचा अक्षरशः वीट आला, आणि तो म्हणाला: “‘हे सतत भ्रमिष्ट अंतःकरणाचे लोक आहेत, ह्‍यांनी माझे मार्ग जाणिले नाहीत; म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत.’” (इब्री लोकांस ३:९-११) यातून आपल्याला काही शिकण्यासारखे आहे का?

  • अविश्‍वासापासून जपा
    टेहळणी बुरूज—१९९८ | जुलै १५
    • १९. मार्गदर्शन लक्षपूर्वक न ऐकल्यास कशाप्रकारे गंभीर परिणाम होऊ शकतात? उदाहरण द्या.

      १९ त्याअर्थी यातून आपल्याला शिकण्यासारखा धडा हा आहे की आपण ‘त्याची वाणी न ऐकण्याची’ सवय स्वतःला होऊ दिली, अर्थात जर आपण यहोवाकडून त्याच्या वचनाच्या आणि विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या माध्यमाने येणाऱ्‍या मार्गदर्शनाकडे कानाडोळा केला, तर मग पाहता पाहता आपली अंतःकरणे संवेदनाशून्य, कठीण होऊन जातील. उदाहरणार्थ, एखाद्या अविवाहित जोडप्याची जवळीक जरा जास्तच वाढली असे समजा. आता त्यांनी जर या बाबीकडे दुर्लक्षच केले, तर काय परिणाम होईल? त्यामुळे त्यांना पुन्हा तेच करण्याचे टाळण्यास मदत मिळेल का, की उलट दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या हातून सहज तोच प्रकार पुन्हा घडेल? तसेच, संगीत किंवा मनोरंजनाचे प्रकार इत्यादी विचारपूर्वक निवडण्याबाबत जेव्हा दास वर्ग सल्ला देतो तेव्हा आपण तो आभारपूर्वक मान्य करून आवश्‍यक ते बदल करतो का? पौलाने आपल्याला आर्जवून सांगितले की आपण ‘एकत्र मिळणे सोडू नये.’ (इब्री लोकांस १०:२४, २५) हे मार्गदर्शन मिळूनही, काहीजण ख्रिस्ती सभांना फारसे महत्त्व देत नाहीत. त्यांना कदाचित असे वाटत असावे की काही सभा अधूनमधून चुकवल्यास किंवा काही विशिष्ट सभांना अजिबातच न गेल्यास काही फरक पडत नाही.

  • अविश्‍वासापासून जपा
    टेहळणी बुरूज—१९९८ | जुलै १५
    • b पौलाने ग्रीक सेप्टुअजिंटमधून हे वचन घेतले होते हे स्पष्ट आहे; त्यात “मरीबा” आणि “मस्सा” या इब्री शब्दांचे अनुक्रमे “कलह” आणि “परीक्षा पाहणे” असे भाषांतर केले आहे. वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड दुसरा पृष्ठे ३५० आणि ३७९ पाहा.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा