वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश केला आहे का?
    टेहळणी बुरूज—२०११ | जुलै १५
    • ‘देवाचे वचन सजीव आहे’

      २०. कोणत्या दोन मार्गांनी आपण इब्री लोकांस ४:१२ हे वचन समजू शकतो? (तळटीप पाहा.)

      २० पौलाने इब्री लोकांस ४:१२ मध्ये ‘देवाचे वचन सजीव आहे,’ असे लिहिले तेव्हा तो बायबलविषयी बोलत नव्हता.d त्या अध्यायातील इतर वचनांवरून दिसते की तो देवाच्या प्रतिज्ञांविषयी बोलत होता. तो असे म्हणत होता की देवाच्या प्रतिज्ञा हमखास पूर्ण होतात. यहोवाने आपल्या वचनाविषयी असे म्हटले: “ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.” (यश. ५५:११) म्हणून, आपण अपेक्षा केलेल्या वेळी देव त्याच्या प्रतिज्ञा पूर्ण करत नाही, तेव्हा आपण धीराने वाट पाहिली पाहिजे. यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कार्य करत आहे याची आपण खातरी बाळगू शकतो.—योहा. ५:१७.

      २१. यहोवाची सेवा करत राहण्यास, इब्री लोकांस ४:१२ विश्‍वासू वृद्ध लोकांना कसे साहाय्यक ठरू शकते?

      २१ ‘मोठ्या लोकसमुदायातील’ अनेक जण कितीतरी वर्षांपासून यहोवाची सेवा करत आहेत. (प्रकटी. ७:९) या दुष्ट जगात वृद्ध होण्याची त्यांनी अपेक्षा केली नव्हती. पण, यहोवाची सेवा करण्यासाठी ते आजही सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. (स्तो. ९२:१४) त्यांना हे माहीत आहे की ‘देवाचे वचन सजीव आहे’ आणि यहोवाने दिलेली अभिवचने नक्कीच पूर्ण होतील. (इब्री ४:१२) त्यांना हे माहीत आहे की यहोवा, पृथ्वीबद्दल व मानवांबद्दल असलेला आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कार्य करत आहे. देवाचा उद्देश त्याच्याकरता खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचा उद्देश आपल्यालादेखील महत्त्वाचा आहे हे आपण दाखवतो तेव्हा त्याला आनंद होतो. देवाच्या विसाव्याच्या या सातव्या दिवशी, कोणतीही गोष्ट यहोवाला त्याचा उद्देश पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. आणि त्याला हे माहीत आहे की एक समूह या नात्याने त्याचे लोक त्याच्या उद्देशाच्या सामंजस्यात कार्य करत राहतील. तुमच्याविषयी काय? तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश केला आहे का?

  • तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश केला आहे का?
    टेहळणी बुरूज—२०११ | जुलै १५
    • c देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकातील पृष्ठे २३७-२३९ पाहा.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा