वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • वडिलांनो, सर्वात महान मेंढपाळांचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज—२०१३ | नोव्हेंबर १५
    • ४. या लेखात कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा केली जाईल?

      ४ तर मग, ख्रिस्ती मेंढपाळांनी कळपातील मेंढरांशी कशा प्रकारे व्यवहार करावा? मंडळीतील सदस्यांना पुढाकार घेणाऱ्‍या वडिलांच्या “आज्ञेत” राहण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. पण त्याच वेळेस वडिलांनाही अशी आज्ञा देण्यात आली आहे, की “त्यांच्या हाती सोपवलेल्या लोकांवर” त्यांनी “धनीपण” गाजवू नये. (इब्री १३:१७; १ पेत्र ५:२, ३ वाचा.) मग, वडील कळपावर धनीपण न गाजवता मंडळीत पुढाकार कसा घेऊ शकतात? दुसऱ्‍या शब्दांत, मंडळीतील वडील देवाने दिलेल्या अधिकाराच्या मर्यादेत राहून मेंढरांची काळजी कशी घेऊ शकतात?

  • वडिलांनो, सर्वात महान मेंढपाळांचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज—२०१३ | नोव्हेंबर १५
    • ९. प्रेषितांची अयोग्य विचारसरणी सुधारण्यासाठी येशूने काय म्हटले?

      ९ मेंढपाळ असणे म्हणजे इतरांवर अधिकार गाजवणे असे याकोब व योहान या प्रेषितांचे मत होते. म्हणूनच, त्यांनी देवाच्या राज्यात आपल्याला श्रेष्ठ स्थान देण्यात यावे अशी येशूजवळ विनंती केली. पण त्यांची विचारसरणी अयोग्य होती हे दाखवण्यासाठी येशूने त्यांना म्हटले: “यहुदीतर लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखवणे आवडते आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते. पण तुमचे वागणे तसे नसावे! जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा दास झाले पाहिजे.” (मत्त. २०:२५, २६, ईझी-टू-रीड व्हर्शन) इतरांवर सत्ता गाजवण्याची किंवा इतरांवर हुकूम सोडून आपल्या अधिकाराचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती प्रेषितांनी टाळायची होती.

      १०. येशू वडिलांकडून काय अपेक्षा करतो, आणि या बाबतीत पौलाने उत्तम उदाहरण मांडले असे का म्हणता येईल?

      १० येशूने आपल्या कळपाशी ज्या प्रकारे व्यवहार केला त्याच प्रकारे ख्रिस्ती वडिलांनीही करावा अशी तो त्यांच्याकडून अपेक्षा करतो. बांधवांवर अधिकार गाजवण्याऐवजी वडिलांनी त्यांचे दास होऊन त्यांची सेवा करण्यास तयार असले पाहिजे. प्रेषित पौलाने अशा प्रकारची नम्र मनोवृत्ती दाखवली. इफिसस मंडळीच्या वडिलांना त्याने असे म्हटले: “मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळत आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हाला ठाऊक आहे.” इफिसस मंडळीच्या वडिलांनीदेखील अशाच नम्र व प्रामाणिक भावनेने बांधवांना साहाय्य करण्याचा प्रयत्न करावा अशी पौलाची इच्छा होती. म्हणूनच त्याने म्हटले: “सर्व गोष्टींत मी तुम्हाला कित्ता घालून दाखवले आहे की, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना साहाय्य करावे.” (प्रे. कृत्ये २०:१८, १९, ३५) करिंथ येथील बांधवांना पौलाने सांगितले की तो त्यांच्या विश्‍वासावर सत्ता गाजवू इच्छित नव्हता. उलट, त्यांना आनंदाने यहोवाची सेवा करता यावी म्हणून तो एक नम्र सहकारी या नात्याने कार्य करत होता. (२ करिंथ. १:२४) नम्र होऊन बांधवांसाठी परिश्रम करण्याच्या बाबतीत पौलाने आजच्या काळातील वडिलांकरता खरोखर एक उत्तम उदाहरण मांडले.

  • वडिलांनो, सर्वात महान मेंढपाळांचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज—२०१३ | नोव्हेंबर १५
    • “कळपाला कित्ते व्हा”

      [२९ पानांवरील चित्र]

      वडील आपल्या कुटुंबातील सदस्यांना सेवाकार्याची तयारी करण्यास साहाय्य करतात (परिच्छेद १३ पाहा)

      १३, १४. वडिलांनी कोणकोणत्या बाबतींत कळपासाठी उदाहरण मांडले पाहिजे?

      १३ मंडळीतील वडिलांनी त्यांच्या हाताखाली सोपवलेल्यांवर अधिकार गाजवू नये असा सल्ला दिल्यानंतर प्रेषित पेत्राने त्यांना “कळपाला कित्ते व्हा” असे प्रोत्साहन दिले. (१ पेत्र ५:३) वडील कशा रीतीने कळपाला कित्ते होऊ शकतात? “अध्यक्षाचे काम करू [पाहणाऱ्‍या]” बांधवाने ज्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत, त्यांपैकी दोन अटींचा विचार करा. पहिली, त्याने “स्वस्थचित्त” असले पाहिजे. याचा अर्थ, बायबलमधील तत्त्वांविषयी व ती जीवनात कशा प्रकारे लागू करावीत याविषयी त्याला स्पष्ट समज असली पाहिजे. तो उतावीळ नसून, त्याला शांतपणे विचार करून निर्णय घेता आले पाहिजेत. दुसरी अट ही, की तो “आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा” असा असला पाहिजे. बायबल म्हणते, “ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा संभाळ कसा करील?” म्हणून, मंडळीतील एखाद्या वडिलाचे कुटुंब असल्यास त्याने आपल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे देखरेख केली पाहिजे. (१ तीम. ३:१, २, ४, ५) बांधवांना वडिलांमध्ये हे गुण दिसतात तेव्हा त्यांच्यावर भरवसा ठेवण्याची त्यांना प्रेरणा मिळते.

      १४ क्षेत्र सेवेत पुढाकार घेण्याद्वारेही मंडळीतील वडील बांधवांपुढे चांगले उदाहरण ठेवतात. या बाबतीत येशूचे अनुकरणीय उदाहरण वडिलांसमोर आहे. पृथ्वीवर असताना येशूने राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराला खूप महत्त्व दिले. हे कार्य कसे करावे हे त्याने शिष्यांना आपल्या उदाहरणाद्वारे शिकवले. (मार्क १:३८; लूक ८:१) आज, जेव्हा प्रचारक वडिलांसोबत मिळून प्रचाराचे कार्य करतात तेव्हा त्यांना खूप प्रोत्साहन मिळते; या महत्त्वाच्या कार्याबद्दल वडिलांचा आवेश पाहून आणि लोकांना शिकवताना ते ज्या पद्धतींचा वापर करतात ते पाहून प्रचारकांना खूप काही शिकायला मिळते. वडिलांवर अनेक जबाबदाऱ्‍या असूनही जेव्हा ते प्रचाराच्या कार्यात आवेशाने सहभाग घेण्यासाठी परिश्रम करतात तेव्हा मंडळीतील सर्व बांधवांना असेच करण्याचे प्रोत्साहन मिळते. वडील मंडळीच्या सभांची चांगली तयारी करतात व त्यांत सहभाग घेतात. तसेच, राज्य सभागृहाची स्वच्छता व दुरुस्ती यांसारख्या इतर कार्यांतही उत्साहाने सहभाग घेतात. अशा प्रकारे, ते बांधवांकरता उत्तम उदाहरण मांडतात.—इफिस. ५:१५, १६; इब्री लोकांस १३:७ वाचा.

      [३० पानांवरील चित्रे]

      वडील क्षेत्र सेवाकार्यात सहभाग घेण्याच्या बाबतीत बांधवांसमोर उत्तम उदाहरण मांडतात (परिच्छेद १४ पाहा)

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा