वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • “तो देवाला संतोषवीत असे”
    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७ | क्र. १
    • हनोखने त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली

      देवावर विश्‍वास नसलेल्या जगात विश्‍वासू हनोखला एकटं पडल्यासारखं वाटलं असेल. पण त्याच्या देवाने, यहोवाने त्याला सोडलं का? नक्कीच नाही. एके दिवशी यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकासोबत बोलला. देवाने त्याला त्या काळातल्या लोकांना संदेश देण्याचं काम दिलं. म्हणजेच देवाने हनोखला संदेष्टा म्हणून नेमलं आणि तो पहिला संदेष्टा होता ज्याचा संदेश बायबलमध्ये दिला आहे. आपण असं का म्हणू शकतो? कारण अनेक शतकांनंतर येशूच्या भावाला, हनोखचा संदेश लिहिण्याची प्रेरणा मिळाली.a

      हनोखने काय भविष्यवाणी केली? त्यात असं म्हटलं आहे: “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास, आणि भक्‍तिहीन लोकांनी अभक्‍तीने केलेल्या आपल्या सर्व भक्‍तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्‍तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभु आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.” (यहूदा १४, १५) हनोखचा विश्‍वास दृढ होता. या गोष्टी नक्की होतील अशी त्याची खातरी होती. त्याच्यासाठी या भविष्यवाणीत सांगितलेल्या गोष्टी देवाने जणू आधीच केल्या होत्या. एखादी गोष्टी भूतकाळात आधीच घडली आहे, अशाप्रकारे भविष्यवाणी करण्याचा हा नमुना नंतर झालेल्या अनेक भविष्यवाण्यांमध्ये आपण बघतो. थोडक्यात सांगायचं तर, संदेष्टा ज्या गोष्टीबद्दल बोलत असतो ती नक्की पूर्ण होणार, याची इतकी खात्री असते, की ती जणू झाली आहे असंच तिच्याबद्दल म्हटलं जाऊ शकतं!—यशया ४६:१०.

      हनोखने दुष्ट लोकांना प्रचार केला

      एका क्रूर जगात हनोखने देवाचा संदेश धैऱ्‍याने सांगितला

      हा संदेश सर्वांना सांगताना हनोखला कसं वाटलं असेल? या संदेशात किती जबरदस्त ताकीद दिली आहे ते पाहा. त्या लोकांचा, त्यांच्या कार्यांचा आणि ते ज्या प्रकारे ही कार्यं करत होते त्याचा धिक्कार करण्यासाठी, या संदेशात तीन वेळा “भक्‍तिहीन” आणि एकदा “अभक्‍तीने” असं म्हणण्यात आलं होतं. म्हणजे एदेन बागेतून बाहेर काढल्यानंतर लोकांनी जे जग निर्माण केलं ते पूर्णपणे भ्रष्ट झालं होतं. तसंच यहोवा “आपल्या लाखो पवित्र जनांसहित” म्हणजे देवदूतांच्या सेनेसोबत येईल, तेव्हा या जगाचा नाश केला जाईल असं या भविष्यवाणीत सांगितलं होतं. हनोखने न घाबरता आणि एकट्याने हा संदेश सर्वांना सांगितला. छोट्या लामेखने जर आपल्या आजोबांना हे काम करताना पाहिलं असेल, तर त्यांचं धैर्य पाहून तो नक्कीच थक्क झाला असेल.

      हनोखचा विश्‍वास पाहून आपण स्वतःला प्रश्‍न विचारू शकतो, की देव ज्या दृष्टीने या जगाला पाहतो तसाच मीही पाहतो का? हनोखने जो संदेश दिला तो जसा त्या काळात लागू होत होता तसाच आजही लागू होतो. हनोखच्या भविष्यवाणी प्रमाणे, यहोवाने त्या काळातल्या अविश्‍वासू जगावर, नोहाच्या दिवसात जलप्रलय आणला. पण तो विनाश भविष्यात येणाऱ्‍या मोठ्या विनाशाचा फक्‍त नमुना होता. (मत्तय २४:३८, ३९; २ पेत्र २:४-६) आज देव या अविश्‍वासू जगाचा योग्य न्याय करण्यासाठीदेखील त्याच्या देवदूतांसोबत तयार आहे. आपण सर्वांनी हनोखच्या सूचनेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ती सर्वांना सांगितली पाहिजे. कदाचित आपलं कुटुंब आणि आपले मित्र आपली साथ देणार नाहीत. कधीकधी आपल्याला एकटं पडल्यासारखं वाटेलं. पण जसं यहोवाने हनोखला कधीच एकटं पडू दिलं नाही, तसं तो आपल्या विश्‍वासू सेवकांना आजदेखील एकटं पडू देणार नाही!

  • “तो देवाला संतोषवीत असे”
    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७ | क्र. १
    • a काही बायबलचे विद्वान म्हणतात की यहूदाने ही वचनं, ‘हनोखचे पुस्तक’ या शंकास्पद पुस्तकातून घेतली आहेत. पण त्या पुस्तकात अशा काही कथा आहेत ज्यांना कोणताच शास्त्रीय आधार नाही. ते पुस्तक हनोखने लिहिलं असा चुकीचा समज आहे. त्यात हनोखच्या भविष्यवाणीचा जो अचूक उल्लेख आहे, तो कुठल्यातरी जुन्या लेखातून किंवा एका पिढीने दुसऱ्‍या पिढीला सांगितलेल्या माहितीमुळे लिहिला गेला असेल. पण तो कसा लिहिला गेला, हे जाणणं आता आपल्याला शक्य नाही. यहूदाने देखील त्या जुन्या लेखातून किंवा मिळालेल्या माहितीतूनच ही वचनं लिहिली असावी. किंवा त्याने हनोखबद्दल येशूकडून ऐकलं असेल, ज्याने हनोखचं जीवन स्वर्गातून पाहिलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा