वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • बायबल आपल्याला एक आशा देतं
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • २. बायबलमध्ये भविष्याबद्दल काय सांगितलंय?

      बायबलमध्ये सांगितलंय की भविष्यात एक असा काळ येईल, जेव्हा “कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.” (प्रकटीकरण २१:४ वाचा.) आज गरिबी, अन्याय, आजारपण आणि मृत्यूमुळे लोक खूप निराश झाले आहेत. पण लवकरच या समस्या निघून जातील. बायबल सांगतं की मानव पृथ्वीवर एका नंदनवनात, म्हणजेच एका सुंदर परिस्थितीत कायम आनंदाने राहतील.

  • जगात वाईट गोष्टी आणि दुःख का आहे?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • ७. आपली सगळी दुःखं देव काढून टाकेल

      यशया ६५:१७ आणि प्रकटीकरण २१:३, ४ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

      • यहोवाने वचन दिलंय की सगळ्या वाईट गोष्टी आणि त्यांमुळे आलेलं दुःख तो कायमचं काढून टाकेल. हे समजल्यावर तुम्हाला कसं वाटतं, आणि का?

      तुम्हाला माहीत होतं का?

      सैतान पहिलं खोटं बोलला तेव्हा त्याने यहोवावर चुकीचे आरोप लावून त्याला बदनाम केलं. यहोवा न्यायाने आणि प्रेमाने शासन करत नाही असं म्हणून सैतानाने त्याचं नाव खराब केलं. लवकरच जेव्हा यहोवा मानवांची सगळी दुःखं काढून टाकेल, तेव्हा तो हे दाखवून देईल की त्याच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप खोटे आहेत. दुसऱ्‍या शब्दांत, तो हे सिद्ध करून दाखवेल की त्याचं शासनच सगळ्यात चांगलं आहे. यहोवाच्या नावावरचा कलंक मिटवून ते पवित्र केलं जाणं, यापेक्षा महत्त्वाची दुसरी कोणतीच गोष्ट या विश्‍वात नाही.—मत्तय ६:९, १०.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा