वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • येशूचे नाव दृढ धरुन राहणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
    • ‘राखलेला मान्‍ना व पांढरा खडा’

      १७. ‘विजयी’ होणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी कोणते बक्षीस वाट पाहून होते आणि पर्गममधील ख्रिश्‍चनांनी कशावर मात करायची होती?

      १७ यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने दिलेला येशूचा सल्ला जे स्वीकारतात अशांसाठी एक भव्य बक्षीस वाट पाहून आहे. ऐका! “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन; त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल, ते तो खडा घेणाऱ्‍याशिवाय कोणालाहि ठाऊक होणार नाही.” (प्रकटीकरण २:१७) अशाप्रकारे, स्मुर्णा येथील ख्रिश्‍चनांप्रमाणेच पर्गम येथील ख्रिश्‍चनांना ‘विजयी’ होण्याचे उत्तेजन दिले आहे. जेथे सैतानाचे आसन आहे त्या पर्गममध्ये ज्या कोणाला विजयी व्हावयाचे आहे त्यांनी मूर्तिपूजा टाळलीच पाहिजे. त्यांनी बालाक, बलाम व निकलाइताचे शिक्षण याजशी संबंधित असणारी अनैतिकता, फुटीर पंथ आणि धर्मत्यागीपणा सोडून दिला पाहिजे. असे केल्यामुळे त्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना “गुप्त राखलेल्या मान्न्यातून” काही खावयास मिळेल. याचा काय अर्थ होतो?

      १८, १९. (अ) यहोवाने इस्राएलांना कोणता मान्‍ना दिला होता? (ब) कोणता मान्‍ना राखून ठेवला होता? (क) तो राखलेला मान्‍ना खाणे कशाला चित्रित करते?

      १८ मोशेच्या काळी अरण्यातील इस्राएलांचे पोषण होण्यासाठी यहोवाने मान्‍ना पुरविला होता. तो मान्‍ना गुप्त नव्हता, कारण शब्बाथाशिवाय तो दरदिवशी सकाळी थिजलेल्या बर्फाच्या थराप्रमाणे जमिनीवर पूर्णपणे आच्छादिलेल्या स्थितीत दिसत होता. इस्राएलांचे पोषण होण्यासाठी ती एक ईश्‍वरी तरतूद होती. याचे स्मरण राहावे यासाठी यहोवाने मोशेला या ‘भाकऱ्‍यांपैकी’ काही “[इस्राएलांच्या] पुढील पिढ्यांसाठी” सोन्याच्या भांड्यात भरुन कराराच्या पवित्र कोशामध्ये राखून ठेवण्यास सांगितले.—निर्गम १६:१४, १५, २३, २६, ३३; इब्रीयांस ९:३, ४.

      १९ किती योग्य असे द्योतक! हा मान्‍ना निवासमंडपाच्या परमपवित्र स्थानात लपवून ठेवण्यात आला होता व येथेच कोशासभोवती पसरलेल्या अद्‌भुत प्रकाशाद्वारे यहोवाचे अस्तित्व प्रतिध्वनित होत होते. (निर्गम २६:३४) हा राखलेला मान्‍ना खाण्यासाठी कोणासही त्या पवित्र जागेत डोकावण्याची अनुमती नव्हती. तथापि, येशूने म्हटले की, त्याचे विजय मिळवणारे अभिषिक्‍त अनुयायी ह्‍या “राखलेल्या मान्न्यातून” खातील. यांना देखील ख्रिस्ताप्रमाणेच, “खऱ्‍या गोष्टीचे प्रतिरुप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान ह्‍यात . . . नाही, तर . . . स्वर्गात” जायचे आहे. (इब्रीयांस ९:१२, २४) त्यांच्या पुनरुत्थानासमयी ते अविनाशीपण व अमरत्व परिधान करतात. ही यहोवाकडील एक अद्‌भुत तरतूद आहे जी अविनाशी ‘राखलेल्या मान्न्याला’ चित्रित करते. त्या विजयी होणाऱ्‍या लहान गटासाठी तो किती विशेष असा हक्क आहे!—१ करिंथकर १५:५३-५७.

      २०, २१. (अ) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पांढरा खडा देण्याचा काय अर्थ होत होता? (ब) वास्तविकपणे, केवळ १,४४,००० पांढरे खडे असल्यामुळे मोठ्या लोकसमुदायास कोणती आशा आहे?

      २० यांना “पांढरा खडा” देण्यात येणार होता. रोमी न्यायालयात न्यायदंड बजावताना खड्यांचा वापर केला जात असे.b पांढऱ्‍या खड्याचा अर्थ दोषमुक्‍तता, तर काळ्या खड्याचा अर्थ बहुधा मृत्युची शिक्षा असा होत होता. येशू पर्गममधील ख्रिश्‍चनांना “पांढरा खडा” देणार होता याचा अर्थ तो त्यांना निरपराधी, शुद्ध व स्वच्छ असे समजणार होता. पण येशूच्या शब्दांचा आणखी अर्थ होणार होता. रोमी काळात खड्यांचा वापर कोणा महत्त्वपूर्ण घटनांच्या स्थळी प्रवेश देण्यासाठी करीत. यास्तव पांढऱ्‍या खड्याचा त्या विजेत्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी खास अर्थ होत होता—कोकऱ्‍याच्या विवाहप्रसंगी स्वर्गात सन्माननीय स्थानासाठी प्रवेश. असे केवळ १,४४,००० खडे दिले जातात.—प्रकटीकरण १४:१; १९:७-९.

      २१ याचा अर्थ हा होतो का की, जर तुम्ही सोबतीच्या उपासकांतील मोठ्या लोकसमुदायापैकीचे आहात तर, तुम्हाला विचारात घेण्यात आलेले नाही? मुळीच नाही! स्वर्गातील प्रवेशासाठी तुम्हाला पांढरा खडा मिळत नाही तरी, तुम्ही टिकून राहिल्यास पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना करण्याच्या आनंदी कार्यात सहभाग मिळविण्यासाठी तुम्हाला मोठ्या संकटातून वाचविण्यात येईल. तुम्हासोबत या कार्यात सहभागी होण्यासाठी ख्रिस्तापूर्वीच्या काळातील विश्‍वासू जनांचे तसेच जे अलिकडेच वारले अशी दुसरी मेंढरे यांचे पुनरुत्थान करण्यात येईल. सरतेशेवटी मुक्‍तता पावलेले मृतजन, पृथ्वीवरील नंदनवनातील जीवनासाठी, पुनरुत्थानाची कृपापसंती मिळवितील.—स्तोत्र ४५:१६; योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९, १४.

      २२, २३. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना देण्यात येणाऱ्‍या खड्यावर लिहिण्यात आलेल्या नावाची अर्थसूचकता काय आहे आणि यामुळे कोणते उत्तेजन मिळाले पाहिजे?

      २२ त्या खड्यावर लिहिलेले नवे नाव काय आहे? नाव, एखाद्या व्यक्‍तीची ओळख देण्यास व एखाद्याला दुसऱ्‍यापासून वेगळे ओळखण्यासाठी उपयोगी पडत असते. या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना विजयी या नात्याने त्यांचे पृथ्वीवरील मार्गाक्रमण संपविल्यावर खडा दिला जातो. यास्तव हे स्पष्ट आहे की, त्या खड्यावरील नावाचा संबंध, स्वर्गात ख्रिस्तासोबत एकत्र येण्याचा जो विशेष हक्क त्याच्याशी आहे—स्वर्गीय राज्याचे जे वारसदार बनतात केवळ अशांनाच त्या बादशाही सेवेचे अत्यंत सलगीचे स्थान अनुभवण्याचा हक्क आहे. यास्तव, ते असे नाव, किंवा कार्याचा हुद्दा आहे की, जो ते “घेणाऱ्‍याशिवाय कोणालाहि ठाऊक नाही.”—पडताळा प्रकटीकरण ३:१२.

      २३ “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो” ते ऐकण्याचे व त्याचा अवलंब करण्याचे योहान वर्गाला केवढे उत्तेजन आहे! तसेच त्यांच्या सोबतीत विश्‍वासूपणे सेवा करीत असलेल्या मोठ्या लोकसमुदायास पृथ्वीवर असताना त्यांची सोबत अनुभवण्यास व त्यांच्याबरोबर यहोवाच्या राज्याची घोषणा करीत राहण्यासाठी हे किती उत्तेजनात्मक ठरते!

  • येशूचे नाव दृढ धरुन राहणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
    • [४५ पानांवरील चित्रे]

      कराराच्या कोशात काही मान्‍ना राखून ठेवण्यात आला होता. विजेत्या अभिषिक्‍त जनांना लाक्षणिक राखलेला मान्‍ना देण्याचा अर्थ त्यांना अमरत्व मिळते असा होतो

      [४५ पानांवरील चित्रे]

      कोकऱ्‍याच्या विवाहप्रसंगी प्रवेश मिळविणाऱ्‍यांसाठी पांढरा खडा आहे

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा